राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, ‘मन की बात’ या आपल्या मार्च महिन्यातील कार्यक्रमात नमोंनी या कार्यक्रमात भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या हौतात्म्याचे स्मरण करीत सव्वाशे कोटी भारतीयांना नवा भारत घडविण्यासाठी ‘कॅशलेस’ होण्याचे आवाहन केले. निश्चलनीकरणानंतर देशात ‘कॅशलेस’चे वातावरण तयार झाल्याचा दावा करत दीड कोटी लोकांनी ‘भिम’ अॅप डाऊनलोड केल्याची माहिती दिली. काळ्या पैशाचे अस्तित्व संपविण्यासाठी लोकांनी नवभारताच्या निर्मितीला ‘कॅशलेस’ होत हातभार लावण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकरांच्या जन्मदिनी येत्या १४ एप्रिल रोजी ‘डिजिधन’ मेळाव्यांचा समारोप होणार असल्याची नमोंनी माहिती दिली. आपली अर्थव्यवस्था ‘कॅशलेस’साठी तयार आहे असे तुला वाटते काय? या प्रश्नाचे उत्तर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा