चंद्र तेथे चंद्रिका। शंभू तेथे अंबिका।
संत तेथे विवेका। असणे की जे।
राव तेथे कटक। सौजन्य तेथे सोयरिक।
वन्ही तेथे वाहक। सामथ्र्य की दया ते धर्मु।
– संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरीतील वरील वेचा हा मराठीच्या पाठय़ पुस्तकात होता. मराठीच्या बर्डेबाईंनी माऊलींनी दिलेला दृष्टांताचे विवेचन करताना वर्गात म्हणाल्या, ‘प्रत्येकाचा एक धर्म (स्वभाव) असतो आणि सहसा हा स्वधर्म कोणीही बदलत नाही’. या आठवडय़ातील बाजाराची वाटचाल पाहिली तर बाजाराने त्याच्या धर्माचे पालन केले असेच म्हणावे लागेल. मागील एका आठवडय़ात सेन्सेक्समध्ये २०३.५० अंकांची भर पडली. परंतु ही भर पडताना ३९.७०, -४३०.६५, ३०.६२, ४९०.६७, ३४.३७, ३८.७९ इतके चढ-उतार झाले. एका मित्राने याचे वर्णन ‘रुठी हुई मेहबूबा’ असे केले. चढ-उताराचा विचार करता बाजाराने त्याच्या धर्माचे पालन केले असेच म्हणावे लागेल. शुक्रवारी सेन्सेक्स ५२ आठवडय़ाच्या उच्चांकावर बंद झाला. सामान्यत: नवीन उच्चांक गाठण्यापूर्वी कुठे स्थिरावेल हे सांगता येत नाही. म्हणून नवीन खरेदी की सावध पवित्रा हा विचार करावा.
मंगळवारी एप्रिल महिन्याचे महागाईचे आकडे जाहीर झाले. जानेवारीत नवीन वर्ष चालू झाल्यापासून महागाई टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. एप्रिल महिन्यात महागाई कमी होण्यात इंधने व उत्पादित वस्तू यांचे मोठे योगदान आहे. एप्रिल महिन्यात गहू, डाळी, कडधान्ये, फळे, अंडी, मांस-मासे यांच्या भावात घसरण झाल्यामुळे अन्नधान्यांच्या किमतीवर आधारित महागाई कमी झाली.
भारतात दोन प्रकारे इंधनाच्या किमती ठरतात. सरकारी नियंत्रण असलेल्या व नियंत्रणाबाहेरील. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल, विमानाचे इंधन, फन्रेस ऑइल, नैसर्गिक वायू, विना अनुदानित स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमती कमी झाल्या. तर डिझेलच्या किमतीत वाढ झाली. याचा परिणाम इंधनाच्या दरावर आधारित महागाईची दरवाढ मागील मार्च महिन्यात १०.२% वरून ८.८% झाली. उत्पादित वस्तूंवर आधारित महागाईचा दर मुख्यत्वे साखर व खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे झाला.
महागाई कमी होत असली तरी सोने आयातीमुळे परदेशी व्यापारी तूट वाढत आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती ‘टकमक कडय़ावर’ येऊन ठेपली आहे. त्वरित आणि ठोस उपाय केले तर ठीक. अन्यथा सोन्यामुळे कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. बुधवारचे कामकाज संपताना रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्यापारी बँकांनी रेपो दराने केलेली कर्ज उचल १,०९,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे प्रमाण रिझव्‍‌र्ह बँकेला अपेक्षित असलेल्या एकूण ठेवींच्या १% (६०,००० कोटी) पातळीच्या कितीतरी वर आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या जम्मू येथील बठकीनंतर गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी, अर्थव्यवस्थेत रोखतेची कमी असल्याची जाणीव असल्याचे सांगितले व तातडीची उपाययोजना म्हणून बँकांकडून १०,००० कोटी रुपयांची रोखेखरेदी जाहीर केल्याचे सांगितले. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुढील मध्य त्रमासिक पतधोरण आढावा बठकीची म्हणजे १७ जूनची वाटही न बघता रोख राखीव प्रमाणात कपात करेल, असेही ते म्हणाले. १७ जूनपूर्वी मे महिन्याच्या महागाईचे आकडे व एप्रिल महिन्याचे औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहीर होतील. याच सुमारास १५ जूनला कंपनी कराचा पहिला हप्ता भरला जाईल. तेव्हा रिझव्‍‌र्ह बँक दर कपात करेल या निष्कर्षांपर्यंत पोहोचता येणार नाही.
*  टाटा कॉफी
Lot can happen over cup of coffee हे वाक्य आजच्या तरुणांच्या बरोबरीने सगळ्यांनीच आपलेसे केले आहे. मागील आठवडय़ात कोणाला तरी भेटायचे होते. ती भेट औपचारिक स्वरूपाची होती. ज्या गृहस्थांना भेटायवचे होते तेच म्हणाले, Cafe Coffee Day  मध्ये भेटू. भेट औपचारिक असो अथवा सहज, शिळोप्याच्या गप्पा मारायच्या निमित्ताने कॉफी प्यायला भेटायची संस्कृती उदयाला येत आहे. गेल्या दशकात भारतात वेगवेगळया नाममुद्रेने कॉफी विकणाऱ्या दुकानांची साखळी भारतात उभी राहिली. मुंबई, पुण्यातून सुरू झालेली ही साखळी तुलनेने लहान परंतु दरडोई मोठे उत्पन्न असलेल्या शहरात पोहोचली आहे. भारतात कॉफीचा दरडोई वापर तुलनेने नगण्य आहे. भारतात दरवर्षी कॉफीची मागणी १०.६५% वाढत आहे. भारतात कॉफीचे उत्पादन कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या तीन राज्यात होते. एकूण उत्पादनाच्या ८०% उत्पादन कॉफी निर्यात होते.

‘टाटा कॅफे’, ‘म्हैसूर गोल्ड’, ‘मलबार’ या भारतात फारशा ज्ञात नसलेल्या परंतु जगाच्या कॉफीच्या जागतिक बाजारपेठेत एकत्रित १२% हून अधिक हिस्सा असणाऱ्या नामुद्रांची मालकी.
लहान भांडवली पाया, गुंतवणुकीतील धोके, शेती उत्पादन असल्यामुळे, वातावरणातील बदलाने नफा क्षमता कमी जास्त होऊ शकते.
‘अरेबिका’ व ‘रोबुस्टा’ या प्रकारच्या कॉफीबिया शेतकी जिन्नस (Agri Commodity) असल्यामुळे किमती कमी-जास्त होत असतात. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मजबूत होणे नफ्याच्या दृष्टीने नकारात्मक  
आहे. या कंपनीत प्रवर्तकांच्या खालोखाल एका मोठय़ा शेअर दलालाचाही हिस्सा आहे. या शेअर दलालास कंपनीच्या संचालक मंडळावर घ्यावे, असा त्याचा आग्रह आहे. ही बोलणी फिस्कटली आणि या दलालाने शेअर विकले तर भावात मोठी घसरण होऊ शकते. अथवा हा दलाल आपला हिस्सा अन्य कोणाला तरी अधिक भावात विकणार, असे ऐकायला मिळते. असे झाले तर भाव इथून २०-२५% वर जाऊ शकतो.
टाटा कॉफी ही कंपनी कॉफीच्या मूल्य साखळीतील (शेती, प्रक्रिया व विक्री) जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे कॉफीचे मळे हे कर्नाटक राज्यातील कुर्ग, हसन, चिकमंगळूर या जिल्ह्यात आहेत. कंपनीची ‘इन्स्टंट कॉफी’ प्रक्रिया केंद्रे हैदराबाद व मदुराई या दोन ठिकाणी असून त्यांची वार्षकि उत्पादन क्षमता ६,५०० टन आहे. कंपनीने ‘स्टारबक्स’ या विदेशी कंपनीबरोबर तांत्रिक सहकार्य व प्रक्रिया केलेल्या- भाजलेल्या कॉफीबिया पुरविण्यासाठीचा करार केला आहे. कॉफीच्या किमती मागणी पुरवठय़ानुसार ठरतात. कॉफीच्या बियांच्या किमती ५ वर्षांच्या निम्न स्तरावर असल्यामुळे व यावर्षी केनियातील कॉफी पिकाला रोगाची लागण झाल्याकारणाने उत्पादन ५०% कमी झाले आहे. अप्रत्यक्ष फायदा भारतातील कॉफी उत्पादकांना होणार आहे.
टाटा कॉफीने ‘एट ऑ क्लोक कॉफी’ हा जगातील चौथ्या क्रमांकाच्या नाममुद्रेवर ताबा मिळविला आहे. १० महिन्यांपूर्वी ‘सिंगल सव्‍‌र्ह कप’ या संकल्पनेला सुरुवात केली. अमेरिकेपाठोपाठ आता कॅनडात ‘एट ऑ क्लोक कॉफी’ व ‘सिंगल सव्‍‌र्ह कप’ या संकल्पनांचा विस्तार करण्यात येणार आहे. टाटा कॉफी निव्वळ कॉफी उत्पादक न राहता मूल्य साखळीत वरच्या पायरीवर प्रवेश केल्यामुळे नफा वाढेल. या वर्षांत १२-१५% नफा मिळविता येऊ शकेल. सध्याचे टाटा कॉफीचे मुल्यांकन बघता हा शेअर कोणाला महाग वाटतो. परंतु पुढील वर्षभरात पोर्टफोलिओमधील निर्देशांकापेक्षा सरस परतावा देणारी कंपनी ठरेल याबद्दल संदेह नाही.

टाटा कॉफी
सद्य बाजारभाव (१७ मे )    रु. १५५५.९०
एका वर्षांतील उच्चांक    रु. १,६७५
एका वर्षांतील नीचांक    रु. ८२५
प्रति समभाग मिळकत    रु. ६६.९०
किंमत/उत्पन्न (पी/ई)    २३.५ पट

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

गुंतवणूक करण्याची कारणे/धोके
*  जगातील सर्वात मोठी कॉफी कंपनी
*  गेली पाच वष्रे १८% हून अधिक विक्रीत वाढ
*  गेल्या पाच वर्षांत ३१.८७%
*  आवर्ती दराने निव्वळ नफ्यात वाढ

Story img Loader