निवृत्तीपश्चात जीवनाची तजवीज म्हणून उपलब्ध विविध गुंतवणूक पर्यायांपेक्षा ‘नवीन पेन्शन योजना (एनपीएस)’ अनेकांगाने सरस असल्याचे आपण लेखाच्या पूर्वार्धात (अर्थवृत्तान्त, १३ ऑक्टोबर २०१४) पाहिले. देशातील कामगारवर्गाच्या सुमारे ९० टक्के हिश्श्यासाठी उत्तर आयुष्यातील आर्थिक स्वावलंबन ठरणाऱ्या या योजनेत अगदी निरक्षर शेतमजूर आणि कोणत्याही बँकेत खाते नसलेल्या वंचितालाही सहभागी होता येईल, कसे ते सांगणारा उत्तरार्ध..
मागील लेखात नवीन पेन्शन योजनेत (एनपीएस) टियर वन खाते कसे उघडले जाते, हे जाणून घेतले आणि त्यातील दुसरा प्रकार म्हणजे टियर टू खात्याकडे वळू या. तथापि टियर टू योजनेची माहिती जाणून घेण्याआधी या योजनेचा कारभार कसा चालतो ते पाहू.
सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (सीआरकीए)
नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) या शेअर्ससाठीच्या डिपॉझिटरी संस्थेच्या उपकंपनीमार्फतच याचे व्यवहार पाहिले जातात. या संस्थेची पेन्शन प्राधिकरणाने केंद्रीय माहिती जपणारी / सांभाळणारी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. आपले डिमॅट खाते ज्याप्रमाणे कोणत्याही संस्थेत असले तरी त्याचे व्यवहार पाहणारी व आपल्या शेअर्सचा ताबा ठेवणारी संस्था ही एनएसडीएल किंवा सीडीएसएल ही असते, त्याचप्रमाणे पेन्शन खाते या एनएसडीएलमार्फत सांभाळले जाते. त्यांच्यामार्फत तुमच्या पेन्शन खात्यास विशिष्ट नंबर देण्यात येतो. ढफअठ हा नंबर कायमस्वरूपी एकमेवाद्वितीय (युनिक) असतो. आपण आपले खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत बदली केल्यावर हा नंबर बदलत नाही. तुमच्या खात्याबाबत संपूर्ण माहिती खालील वेबसाइटवर मिळते. ँ३३स्र्२://६६६.ल्लस्र्२ू१ं.ल्ल२’ि.ू.्रल्ल,
आपण खाते भारतात कोठेही बदली करू शकतो. उदा. आपण मुंबईत खाते एका बँकेत उघडले असेल व तुमची बदली दिल्लीत झाल्यास दुसऱ्या बँकेच्या तेथील शाखेत तुम्ही खाते फिरवू शकता. वरील वेबसाइटवर सर्व संस्थांच्या सर्व योजनांचे नक्त मालमत्ता मूल्य- एनएव्ही समजते. त्यानुसार आपण वर्षांतून एकदा आपले निधी व्यवस्थापक बदलू शकता. सर्व व्यवहारासांठी एसएमएस व ई-मेलद्वारे त्वरित माहिती मिळते. आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीत म्हणजे अॅक्टिव्ह किंवा स्वयंचलित (ऑटो) पर्यायात वर्षांतून एकदा बदल करता येतो.
इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेप्रमाणेच याचे केवायसी नियम आहेत; परंतु पॅनकार्ड आवश्यक असल्याचे नमूद केलेले नाही. एका व्यक्तीस एकच खाते उघडता येते. दरवर्षी किमान ६,००० रुपये न भरल्यास खाते गोठवले जाते व पुढील वर्षी १०० रुपये दंड भरून पुन्हा कार्यान्वित करता येते.
या खात्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही नोकरी करत असलेली संस्थासुद्धा या तुमच्या खात्यात रक्कम भरू शकते. ही रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या (बेसिक+डीए) च्या १०% पर्यंत व दीड लाख रुपये (८० क) मर्यादेत असल्यास तुम्हास त्यावर आयकर द्यावा लागत नाही व संस्थेसही रक्कम १००% खर्चात दाखवता येते. कंपन्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाव्यतिरिक्त हे खाते असल्याने काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या उत्तेजनार्थ रकमेचा काही भाग या खात्यात वर्ग करतात म्हणजे त्या रकमेवर कर्मचाऱ्यांना आयकर भरावा लागत नाही.
मुदतपूर्तीच्या वेळेस खाते चालू नसेल किंवा गोठवलेले असेल तर खाते फी भरून कार्यान्वित केल्यावरच रक्कम काढता येते. किंवा फी कापून रक्कम हातात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा