गाजावाजासह घोषित झालेल्या आर्थिक सुधारणांचे भवितव्य निश्चित करणारे संसदेचे महत्त्वाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. केवळ ते सुरू झाले आहे, सुरळीत वळणावर आलेले मात्र नाही असेच सध्या म्हणता येईल. दुसरीकडे अमेरिकेत पुन्हा निवडून आलेल्या ओबामा प्रशासनाच्या करविषयक कठोर उपाययोजनांचे त्या देशातच नव्हे तर जगभरात उमटणाऱ्या परिणामांबाबत भांडवली बाजारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आधीच मंदावलेल्या अर्थगतीला रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपात करून सहारा दिला जाईल की नाही, याचीही लवकरच तड लागणार आहे. गेली दोन वर्षे जागतिक वित्तीय संकट, चलनफुगवटा तसेच वित्तीय आणि व्यापार तुटीचे दुहेरी संकट, देशांतर्गत रोडावत चाललेला विकासदर या सर्वाच्या परिणामी शेअर बाजाराने एका मर्यादीत चौकटीत फेर धरलेला आपण पाहिले आहे. पण बाजारभावनांवरील हे नकारार्थी सावट लवकरच दूर सरेल आणि आगामी वर्ष हे भरभराटीचे आणि निर्देशांकाच्या नव्या उच्चांकाचे असेल, असे ठाम भाकीत ‘स्मार्ट प्रॉफिट’ या समभाग तसेच डेरिव्हेटिव्हज् गुंतवणुकीबाबत संशोधन व सल्ला सेवा देणाऱ्या प्रथितयश कंपनीने केले आहे. बाजाराचा आगामी कल कसा राहील, गुंतवणूक कुठून येईल आणि कोणत्या समभागात येईल या विषयी स्मार्ट प्रॉफिटच्या संचालिका अंकिता जैन यांनी त्यांच्या संशोधन चमूने केलेल्या अभ्यासाच्या हवाल्याने विस्तृत विवेचन मुलाखतीत केले आहे.-
*सध्याच्या नकारार्थी घटनांचे ताबडतोबीचे परिणाम काय याचा अंदाज बांधणे कठीण निश्चितच नसले तरी, आगामी बाजारस्थितीविषयी तुमचे अंदाज काय?
– एक गोष्ट स्पष्टच आहे की, सप्टेंबरमध्ये अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासून पी. चिदम्बरम यांनी आर्थिक सुधारणांबाब त जी धडाडी दाखविली आहे त्यातून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या डॉलर-पौंडांना त्यांनी आपल्या बाजाराकडे आकर्षित केले आहे. विदेशी गुंतवणुकदारांचा आपल्या बाजाराबाबत बनलेला सकारात्मक पवित्रा हा त्यांच्या गेल्या तीन महिन्यांतील निव्वळ गुंतवणुकीच्या प्रमाणावरून बांधता येईल. त्या आधी त्यांच्यात दिसलेला निराशेचा भाव दूर सरला आहे. आजही केंद्रातील सरकारचे आर्थिक सुधारणांच्या आघाडीवरील आणि डळमळलेल्या अर्थव्यवस्थेला ताळ्यावर आणण्याचे गांभीर्य स्पष्टपणे दिसत असून, विरोधकांचा त्याला अडसर मात्र कमजोर पडताना दिसत आहे. किराणा व्यापारातील विदेशी गुंतवणूक मर्यादेत वाढ आणि बँकिंग सुधारणा या कळीच्या मुद्दय़ांचा मार्ग चालू हिवाळी अधिवेशनातूनच खुला होईल, हे नि:संशय सांगता येईल. तसे जर झाले तर कासवगती धारण केलेल्या अर्थव्यवस्थेला यापुढे वेग मिळण्याचीच शक्यता दिसत असून, रिझव्र्ह बँकेचा पवित्राही जानेवारीत बदललेला दिसून येईल. आजवर कुंपणावर बसून किडुकमिडूक संधींचा लाभ उठवत असलेल्या देशी वित्तीय संस्थांकडूनही मग जोशाने गुंतवणूक सुरू होईल. बाजारापासून दूर राहिलेल्या सामान्य गुंतवणूकदारांमध्येही मग उत्साह संचारलेला दिसेल.
मुलाखत / शेअर बाजार : आगामी वर्ष भरभराट आणि नव्या उच्चांकाचे!
गाजावाजासह घोषित झालेल्या आर्थिक सुधारणांचे भवितव्य निश्चित करणारे संसदेचे महत्त्वाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. केवळ ते सुरू झाले आहे, सुरळीत वळणावर आलेले मात्र नाही असेच सध्या म्हणता येईल. दुसरीकडे अमेरिकेत पुन्हा निवडून आलेल्या ओबामा प्रशासनाच्या करविषयक कठोर उपाययोजनांचे त्या देशातच नव्हे तर जगभरात उमटणाऱ्या परिणामांबाबत भांडवली बाजारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2012 at 12:23 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year prospers and new hike