गेले दोन आठवडे भारताच्याच नव्हे तर जगभरच्या भांडवली बाजाराचा मुख्य मापदंड असलेला अमेरिकेचा डाऊ जोन्स निर्देशांक निरंतर घसरणीला लागला आहे. अमेरिकेतील कथित ‘फिस्कल क्लिप’च्या परिणामासंबंधी तर्क-वितर्कातून हे अर्थातच घडत आहे. अमेरिकेतील धनाढय़ांवर वाढीव करदायित्व लादल्याने तेथील औद्योगिक मंदीला आणखीच खतपाणी घातले जाईल अशी भीती व्यक्त होत आहे. आपल्या निफ्टी निर्देशांकालाही याचे चटके जाणवत आहेत. जरी त्याने आपल्या अल्पावधीतील निसरडय़ा प्रवाहावर मात करून, पुढल्या ५८०० या उच्चांक पातळीकडे प्रवास कायम सुरू ठेवला असला तरी काही खरे दिसून येत नाही. मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी वित्तीय अरिष्टाशी सामना करताना आपल्या कडव्या भूमिकेला काहीशी मुरड घालण्याची तयारी दाखविली असली तरी श्रीमंतांना जास्तीचा कर भरावा लागण्याबाबत कोणतीही तडजोड त्यांना अमान्य दिसत आहे. यातून जगभरच्या शेअर बाजारातील चिंतातूरांचे मोहोळ आणखीच वाढत चालले आहे.
देशांतर्गत आपल्या अर्थमंत्र्यांनी गुरुवारी बँकांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत, गरजवंत सरकारी बँकांना पुनर्वित्ताच्या रूपात भांडवली सहाय्य करण्याचे अभिवचन दिले. या वृत्ताच्या परिणामी बँक निर्देशांकाने बाजाराला तात्पुरता आधार जरूर दिला. परंतु शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने ५६०० ही महत्त्वपूर्ण तांत्रिक पातळी भेदल्याचेही दिसून आले.
पुढे काय?
निफ्टी निर्देशांक सध्या एका नाजूक वळणावर आहे. निर्देशांकाने सप्ताहअखेर नेमक्या भाव प्रवाहाच्या
सप्ताहासाठी शिफारस
* हिंडाल्को : (सद्य दर १०९ रु.)
विक्री: लक्ष्य- रु. १०५-१०३
* आयटीसी : (सद्य दर २७४.६५ रु.)
विक्री : रु. २७२ खाली; लक्ष्य: रु. २६७-२६२
* भारती एअरटेल : (सद्य दर ३०१ रु.)
खरेदी: रु. ३०४ वर; लक्ष्य: रु. ३१४
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा