मुंबई-पुण्याच्या बाहेरून कोणी वाचक त्यांच्या वित्तीय नियोजनासाठी संपर्क करतात तेव्हा या सदराचे उद्दिष्ट अल्प प्रमाणात का होईना सफल झाले असे वाटते. लोकमान्य टिळकांसारखे राजकारणी, कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसुत, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर असे थोर पुरुष रत्नागिरी जिल्ह्य़ाने या देशाला दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक भारतरत्ने देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्य़ाला नररत्नांची खाण समजले जाते. या रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या रायगड जिल्हा सीमेवर मंडणगड तालुका आहे. या तालुक्यात म्हाप्रळ नावाचे लहानसे गाव आहे. गावात व्हीएसएनएल ब्रॉडबँड इंटरनेट सेवा २०१० मध्ये पोहोचली, यावरून गावात असलेल्या पायाभूत सुविधांची कल्पना येऊ शकेल. अशा गावात राहणाऱ्या कोणा वाचकाची वित्तीय नियोजनासाठी मेल येते तेव्हा या आíथक साक्षरतेचा वेलू गगनावरी गेला नाही तरी या वेलूने चांगले बाळसे धरल्याचे जाणवते.
म्हाप्रळमध्ये वैशंपायन आडनावाचे एक कुटुंब मागील तीन पिढय़ांपासून वास्तव्यास आहे. वैशंपायन कुटुंबात मागील तीन पिढय़ांपासून वैद्यकी सुरू आहे. या कुटुंबातील डॉ. प्रांजली (३५) व डॉ. पराग (३८) हे दाम्पत्यसुद्धा खासगी वैद्यकीय व्यवसायात असून या दाम्पत्यास तनिष्का (८) नावाची कन्या आहे. डॉ. पराग व डॉ. प्रांजली हे रत्नागिरी जिल्ह्य़ात वास्तव्याला असले तरी वैद्यकीय व्यवसाय रायगड जिल्ह्य़ातील माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे करतात. तिथे त्यांनी एक सदनिका खरेदी केली असून मागील दोन महिन्यांपासून ही सदनिका भाडेतत्त्वावर दिली आहे. यांचे मुख्य घर म्हाप्रळ येथे असून गोरेगाव येथे सदनिकेसाठी घेतलेल्या कर्जापकी अडीच लाखांची कर्जफेड शिल्लक आहे. डॉ. पराग व डॉ. प्रांजली यांचे जीवन विम्याचे कवच प्रत्येकी २० लाख रुपयांचे आहे. त्यांच्या पीपीएफ व इतर गुंतवणुकांचा तपशील सोबत दिलेला आहे.
डॉ. पराग वैशंपायन यांनी विचारलेले नेमके प्रश्न व या प्रश्नांची उत्तरे अशी –
टाटा एआयजीमध्ये मागील सहा वर्षांपासून गुंतवणूक करत आहे. या गुंतवणुकीतून ९० हजाराच्या हप्त्यांवर फक्त ५,००० इतका नफा मिळत आहे. या गुंतवणुकीचे काय करावे?
– या सहा वष्रे जुन्या शेअर अथवा रोखे बाजारात गुंतवणूक असलेल्या (मार्केट िलक्ड) योजनेकडे दोन प्रकारे पाहता येते. कुठल्याही अशा प्रकारच्या योजनेचे शुल्क सुरुवातीच्या काळात जास्त असते. म्हणजे १०० रुपये हप्ता भरला तर ६५ रुपयांची, दुसऱ्या वर्षी ७५ तर तिसऱ्या वर्षी ८५ रुपयांची युनिट्सच विमाधारकास मिळतात. सहा वर्षांनंतर १०० रुपयांच्या हप्त्याला ९५ रुपयांची युनिट्स विमाधारकाला मिळतात. म्हणून आता सर्व खर्च विमा कंपनीने वसूल केला असून १० वर्षांपर्यंत हप्ता भरणे योग्य ठरेल. दुसरा विचार असा की, जी गुंतवणूक बाजार सर्वोच्च स्थानी असतानासुद्धा जर नफा देत नसेल तर अधिक पसे गुंतविणे योग्य नव्हे. झाले तेवढे पुरे आहे. म्हणून हप्ते भरणे थांबविणे योग्य आहे. यापकी जो सल्ला पटेल तो आचरणात आणावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा