गगनभेदि गिरिविण अणु न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दु:सहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
विदर्भातील बुलढाण्यात जन्मलेल्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या ओळी. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर या कवितेला राज्याच्या अधिकृत गीताचा दर्जा मिळाला. बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शाखेत प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर नुकतेच रुजू झालेल्या धवल पागोटे (२४) यांनी नियोजनासंबंधी मार्गदर्शन करण्याची विनंती करणारी मेल लिहिला आहे. या मेलमध्ये त्यांच्या वित्तीय ध्येयांचा त्यांनी उल्लेख केला आहे. वास्तवाचे भान न ठेवता लिहिलेली ही वित्तीय ध्येये वाचल्यानंतर ‘‘आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे’’ या ओळी आठवल्या. एक कवीकल्पना म्हणून एखादी इच्छा मनात धरणे व नियोजनाच्या दृष्टीने वास्तव म्हणून त्यांना स्वीकारणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक का व कसा ते या नियोजनाच्या निमित्ताने जाणून घेऊ.
धवल हे यवतमाळ जिल्ह्यातले असून त्यांनी यवतमाळ येथील विनाअनुदानित महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन या विद्या शाखेत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे वडील चिंतामण पागोटे (५६) हे शासनाच्या सेवेत नायब तहसीलदार पदावर असून ते २०१७ मध्ये सेवा निवृत्त होतील. निवृत्ती पश्चात त्यांना निवृत्तीवेतन मिळणार आहे. आई विजया (४६) गृहिणी असून लहान बहिण प्रणालीचा (२३) विवाह येत्या डिसेंबर महिन्यात योजला आहे. सप्टेंबर महिन्यात बँकेच्या सेवेत रुजू झालेल्या धवल यांना पहिले वेतन ३३ हजार रुपये वजावटीपश्चात मिळाले. या ३३ हजारातून त्यांचा वैयक्तिक खर्च १० हजार रुपये वजा जाता धवल यांना उर्वरित बचतीचे नियोजन करायचे आहे.
आíथक नियोजनाची सुरुवात जीवनविम्याने करतात. धवल यांच्यावर आज जरी आíथक जबाबदारी नसली तरी भविष्यात तेच कुटुंबाचा मुख्य आíथक स्रोत असणार आहेत. म्हणून धवल यांनी सर्वप्रथम विमा योजनेची खरेदी करावी. त्यांना ३५ वष्रे मुदतीच्या दोन कोटी रुपयांचे मुदत विमा घेण्याचे (टर्म इन्श्युरन्स) सुचविण्यात आले. क्लेम सेटलमेंट रेशोबाबतीत पहिल्या एक ते चार क्रमांकावर असलेल्या विमा कंपन्यांतून हे दोन कोटींचे विमाछत्र मिळविताना सर्वाधिक ३४,५६७ रुपये तर सर्वात कमी २८,७६५ रुपये असा वार्षकि हप्ता त्यांना भरावा लागेल. धवल यांनी या अव्वल चार क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या कंपन्यापकी त्यांना योग्य वाटेल अशा जीवन विमा पॉलिसीची निवड करावी. टप्प्याटप्प्याने त्यांनी विमाछत्र पाच कोटी करावायचे आहे. मात्र सर्व विमा योजनांची मुदतपूर्ती ही त्यांच्या वयाच्या साठीपेक्षा जास्त असू नये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा