‘अवित्तीय’ म्हणजे पैशाच्या मोबदल्यात नसलेल्या पगारदारांना मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या सुविधांचे मूल्यांकन हे सुलभतेने आणि सुसूत्रतेने होण्यासाठी प्राप्तिकर कायदा आणि नियमामध्ये काही तरतुदी आहेत. या मूल्यांकनानुसार येणारी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या उत्पन्नात गणली जाते आणि त्यावर त्याला कर भरावा लागतो.
मागील लेखात आपण पगारदारांना मिळणाऱ्या वेतन, भत्ते आणि त्यावर असलेल्या प्राप्तिकराच्या तरतुदी आणि सवलतींचा आढावा घेतला. या लेखात आपण काही सुविधा आणि त्या संबंधाने कर वजावटीच्या गुंतवणुकीच्या पर्यायासंबंधी माहिती घेऊ.
सर्वसाधारणपणे नोकरदारांना मालकाकडून मिळणारे वेतन आणि भत्ते हे पशांच्या रूपात असतात त्यासाठी वेगळे मूल्यांकन करावे लागत नाही. हे भत्ते उत्पन्नात गणले जातात आणि त्यावर काही सवलती देखील मिळतात (ज्या संबंधाने मागील लेखात सविस्तर आढावा घेतला आहे). परंतु काही सुविधा या ‘अवित्तीय’ म्हणजे वस्तू किंवा सेवा रूपाने मिळत असल्यामुळे त्याचे मूल्यांकन हे साधारणपणे अवघड असते.
अवित्तीय म्हणजे पैशाच्या मोबदल्यात नसलेल्या सुविधांचे मूल्यांकन हे सुलभतेने आणि सुसूत्रतेने होण्यासाठी प्राप्तिकर कायदा आणि नियमामध्ये काही तरतुदी आहेत. या मूल्यांकनाप्रमाणे येणारी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या उत्पन्नात गणली जाते आणि त्यावर त्याला कर भरावा लागतो.
पगारदारांना मिळणाऱ्या काही सुविधा आणि या सुविधांच्या मूल्याप्रमाणे गणले जाणारे उत्पन्न खालील प्रमाणे :
असज्जित किंवा सुसज्जित घर:
असज्जित आणि सुसज्जित घर या साठी प्राप्तीकर कायद्यात वेगळ्या तरतुदी आहेत.
१. असज्जित घर: केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि परदेशातील/ दूतावासातील सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होत नाही) भाडेमुक्त असज्जित घर प्रदान केले असेल तर घरे वाटपाच्या नियमानुसार परवाना शुल्काएवढी रक्कम सुविधा म्हणून उत्पन्नात गणली जाते.
*इतर कर्मचाऱ्यांना जर मालकाने भाडेमुक्त असज्जित घर प्रदान केले आणि ते मालकाच्या मालकीचे असेल तर.
– हे घर २००१ सालच्या जनगणनेनुसार २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर वेतनाच्या १५%
– हे घर २००१ सालच्या जनगणनेनुसार १० लाख ते २५ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर वेतनाच्या १०%
– यापेक्षा इतर ठिकाणी असेल तर वेतनाच्या ७.५ % इतकी रक्कम सुविधा म्हणून उत्पन्नात गणली जाते.
* हे घर जर मालकाच्या मालकीचे नसेल तर वेतनाच्या १५% किंवा मालकाने भरलेली किंवा देय असलेली घरभाडे रक्कम या दोन रकमेपकी कमी असलेली रक्कम सुविधा म्हणून उत्पन्नात गणली जाते.
या तरतुदीसाठी वेतनामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता (जर वेतन कराराचा भाग असेल तर), बोनस, कमिशन, करपात्र भत्ते यांचा समावेश होतो.
माळी, झाडूवाला किंवा वैयक्तिक सेवक:
२. सुसज्जित घर: वर दर्शविण्यात आल्याप्रमाणे असज्जित घराच्या रकमेत अधिकची १०% फíनचरची रक्कम जर फíनचर मालकीचे असेल तर. परंतु मालकाने जर फíनचर भाडय़ाने घेतले असेल तर त्याने प्रत्यक्ष दिलेली किंवा देय रक्कम सुविधा म्हणून उत्पन्नात गणली जाते.
*जर असज्जित किंवा सुसज्जित घर कर्मचाऱ्याकडून आंशिक योगदान घेऊन अथवा माफक दरात मालकाने प्रदान केले असेल तर त्यासाठी प्राप्तिकर कायद्यात तरतुदी आहेत. वरीलप्रमाणे गणली गेलेली रक्कम वजा कर्मचाऱ्याकडून वसूल केलेली रक्कम सुविधा म्हणून उत्पन्नात गणली जाते.
माळी, झाडूवाला किंवा वैयक्तिक सेवक:
*या सुविधा पूर्णपणे करपात्र आहेत. जेवढी रक्कम मालकाने यासाठी खर्च केली आहे तेवढी रक्कम सुविधा म्हणून कर्मचाऱ्याच्या उत्पन्नात गणली जाते.
नोकरदारांमध्ये सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक आजमावली जाणारी सुविधा असल्याने, याबद्दल सर्वाना पुरेशी माहिती असावीच. पगारदार कर्मचाऱ्याने रजेच्या काळात आपल्या कुटुंबासमवेत भारतात कोठेही जाण्यासाठी केलेला प्रवास खर्च हा मालकाने मदतीच्या रूपाने दिल्यास खालील रक्कम ही करपात्र उत्पन्नात गणली जात नाही:
रजा प्रवास सूट (LTC):
*जर प्रवास हा विमानाने केला असेल तर, राष्ट्रीय विमान सेवेचे सर्वात जवळच्या मार्गाचे ‘इकॉनॉमी’ वर्गाचे भाडे किंवा खर्च केलेली रक्कम यापैकी जी कमी रक्कम असेल ती.
*जर प्रवास रेल्वेने केला असेल किंवा त्या मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध असेल तर वातानुकूलित पहिल्या दर्जाचे सर्वात जवळच्या मार्गाचे भाडे किंवा खर्च केलेली रक्कम यापैकी जी कमी रक्कम असेल ती.
*जर त्या मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध नसेल आणि सरकारमान्य प्रवासी वाहतूक पर्यायाचा वापर करून प्रवास केला असेल तर पहिल्या किंवा डिलक्स दर्जाचे सर्वात जवळच्या मार्गाचे भाडे किंवा खर्च केलेली रक्कम यापैकी जी कमी रक्कम असेल ती.
*जर त्या मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध नसेल आणि सरकारमान्य प्रवासी वाहतूक पर्यायाचा वापरून प्रवास केला नसेल तर वातानुकुलित पहिल्या दर्जाचे सर्वात जवळच्या मार्गाचे भाडे (रेल्वे प्रवास केला असे गृहीत धरून) किंवा खर्च केलेली रक्कम यापैकी जी कमी रक्कम असेल ती.
*यात फक्त चार वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोन प्रवास करमुक्त आहेत.)
*या तरतुदीसाठी कुटुंबामध्ये पती/पत्नी, मुले आणि भाऊ, बहिण, पालक जे नोकरदारावर अवलंबून आहेत यांचा समावेश होतो. १ ऑक्टोबर १९९८ नंतर जन्मलेल्या फक्त दोनच अपत्यांचा यात समावेश होतो. परंतु त्यापूर्वी जन्मलेल्या अधिकच्या मुलांना हे बंधन नाही. कुटुंबातील व्यक्तींनी नोकरदाराशिवाय प्रवास केला तर ही सवलत मिळत नाही. ही सवलत फक्त भाड्यासाठी मिळते, इतर खर्चासाठी (जसे राहण्या- खाण्याचा, हॉटेलचा खर्च) ही सवलत मिळत नाही. प्रत्यक्ष खर्च केला तरच ही सवलत मिळते.
जर मालकाने व्याजमुक्त किंवा सवलतीच्या दरात कर्मचाऱ्याला कर्ज दिले असेल तर या सुविधेवर कर भरावा लागतो. यासाठी भारतीय स्टेट बँकेचा त्या प्रकारच्या कर्जावरील वर्षांच्या पहिल्या दिवसाच्या व्याजदराप्रमाणे महिन्याच्या शेवटच्या दिवसाच्या कमाल रकमेवर गणलेले व्याज आणि मालकाने नोकरादाराकडून वसुल केलेले व्याज यामधील फरक ही रक्कम करपात्र आहे. मूळ कर्ज २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर आणि काही ठरावीक रोगांच्या वैद्यकीय उपचारासाठी घेतलेल्या सवलतीत किंवा व्याजमुक्त कर्जासाठी या तरतुदी लागू होत नाहीत. आणि या करपात्र उत्पन्नात गणल्या जात नाहीत.
(लेखक सनदी लेखाकार आहेत.)