लॉकडाऊन काळात असंख्य ग्राहकांनी मोबाईल, वीजबिल किंवा इतर बिलं भरण्यासाठी ऑनलाईन बँकिंगचा पर्याय निवडला. अनेक ग्राहक Gpay, Phonepay अशा Online Payment पर्यायांचा वापर करू लागले. तर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी Auto-debit Payment या पर्यायाचा देखील वापर केला आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात सुमारे २ हजार कोटी रुपयांची सेवांबाबतची बिलं ही ऑटो डेबिट पेमेंड सुविधेच्या माध्यमातून चुकती केली जातात. पण आता ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. आणि फार लांब नाही, तर १ एप्रिलपासूनच ही सुविधा बंद होऊ शकते. द न्यूज मिनटने दिलेल्या वृत्तानुसार IAMAI अर्थात Internet And Mobile Association of India या सेवापुरवठादारांच्या संघटनेने तसा इशारा दिला असून देशातल्या अनेक बँकांना त्यासाठी कारणीभूत ठरवलं आहे.

काय आहे Auto-Debit Payment?

water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार रद्द, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या सेवा वापरत असतो. त्यांची बिलं वेळेवर भरली गेली नाहीत, तर संबंधित सेवा खंडित होऊ शकते. मग त्यात विजबिलांपासून ते Amazon, NetFlix सारखे OTT प्लॅटफॉर्म्सपर्यंत अनेक सेवांचा समावेश येतो. त्यामुळे अशा वेळी Online Payment चा एक भाग असलेली ऑटो डेबिट पेमेंटची सुविधा बँकांकडून दिली जाते. याचा अर्थ संबंधित सेवेची माहिती आपण बँकांनि पुरवलेल्या ठिकाणी भरली, की दर महिन्याला तयार होणारं बिल आपोआप आपल्या खात्यामधून भरलं जाणार. म्हणजे तेवढी रक्कम आपल्या खात्यातून वजा होणार. त्यामुळे बिल भरण्यास विसरल्यामुळे संबंधित सेवा खंडित होण्याची पाळी आपल्यावर येत नाही.

मग आताच अचानक काय झालं?

आत्तापर्यंत ही सेवा अगदी सुखेनैव सुरू होती. पण आता इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं बँकांची तक्रार केली आहे. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घालून दिलेल्या नियमांचं पालन बँकांकडून केलं जात नसल्यामुळे ही सेवाच बंद करण्याचा इशारा आयएमएआयनं दिला आहे. यामध्ये थेट बँक खात्यातून किंवा एटीएम कार्डमधून अदा केल्या जाणाऱ्या बिलांचा देखील समावेश आहे.

काय आहेत हे नवे नियम?

१. पेमेंटच्या तारखेपासून ५ दिवस आधी बँकांनी ग्राहकांना त्यासंदर्भात विचारणा करणारी माहिती द्यावी आणि ग्राहकांच्या परवानगीनंतरच खात्यातून पैसे वर्ग करावेत.

२. ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बिलं अदा करताना परवानगीसाठी बँकांनी ग्राहकांना वन टाईम पासवर्ड पाठवावा.

यासाठी आवश्यक प्रणाली तयार करण्यासाठी बँकांना ३१ मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही बँकांनी त्यावर कार्यवाही केली नसल्यामुळे त्याचा फटका लाखो ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वैयक्तिक ग्राहक आणि कंपन्यांचा देखील समावेश आहे. या परिस्थितीमध्ये अनेक सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना पेमेंट करण्याचे इतर मार्ग सुचवायला सुरुवात केली आहे.

BHIM UPI द्वारे पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागतोय? इथे करा तक्रार

काय आहे पर्याय?

जर बँकांनी योग्य ते बदल केले नाहीत, तर ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवठादाराच्या वेबसाईटवर किंवा इतर पेमेंट संकेतस्थळांवर जाऊन पेमेंट करावं लागणार आहे.

Story img Loader