जानेवारी महिन्याच्या अतिथी विश्लेषक जीईपीएल कॅपिटलच्या दिशा हजारी यांची ‘बँकिंग’ क्षेत्राविषयी सकारात्मकता आहे आणि पहिल्या भागात त्यांनी येस बँकेविषयी विवेचन केले होते. याच ओघात आजच्या भागात त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेविषयी मत व्यक्त केले आहे.
मागील दहा तिमाहीत व्याजाच्या उत्पन्नात २१% हून अधिक वाढ दर्शविणारी ही बँक आहे. मागील महिन्यातच सरकारने परकीय अर्थसंस्थांसाठी या समभागात गुंतवणुकीसाठी असलेली मर्यादा वाढवून ४९% वरून ६२% केली आहे. बँकेची धोरणे वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून व्यवसायवृद्धी व्हावी अशीच आहेत. मागील वर्षांत तीन टप्प्यात बँकेने सेबीच्या अर्हताप्राप्त अर्थसंस्थांना भागविक्री केली आहे. सद्याचा भाव या अर्थसंस्थांना विक्री केलेल्या सरसरी किमतीपेक्षा कमीच आहे. सध्याच्या पुस्तकी किमतीचे गुणोत्तर १.७ पट आहे.  
रुपया सुदृढ होत असतानाच रिझव्‍‌र्ह बँकेनेही सकारात्मक पावले उचलत ऑक्टोबरमधील पतधोरणात ‘मार्जिनल लेंिडग फॅसिलिटी’चा दर पाऊण टक्क्याने कमी करत ९.५०% व नोव्हेंबरमधील पतधोरणात एक टक्का कपात करत सध्याच्या ८.५% वर आणला. या वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील कठोर धोरणाचा व तिसऱ्या तिमाहीत सल केलेल्या धोरणांचा परिणाम विशेषत: खासगी बँकांच्या समभागांच्या मूल्यांकनावर झाला. अ‍ॅक्सिस बँकेचा समभागही या घटनाक्रमाचा बळी निश्चितच ठरला आहे.

Story img Loader