मागील अभ्यास वर्गामध्ये आपण पर्याय डावपेचांचे (Options Strategy) मूलभूत अंग, स्ट्राईकचे मनीनेस, तिथीरास इत्यादींचा अभ्यास केला. आज विकल्पांची संवेदनशीलता, ग्रीक्स इत्यादीचा अभ्यास करू.
मनीनेस नुसार, अॅट द मनी (At the money), इन द मनी (In The money), आऊट ऑफ द मनी (Out of the Money) अशा वेगवेगळ्या स्ट्राईकच्या विकल्पांची संवेदनशीलता (Sensitivities) वेगवेगळी असते त्यामुळे वेगवेगळ्या स्ट्राईकच्या भावांवर (Stike Price) वेगवेगळ्या प्रमाणात प्रभाव पडून त्याचे भाव कमी जास्त होत असतात कारण प्रत्येक स्ट्राईकची मनीनेसनुसार बाह्यभूत (Extrinsic Value) व अंतर्भूत किमत (Intrinsic Value) वेगवेगळी असते. उदा. एखाद्या शेअर्सचा बाजारभाव १,००० रुपये असेल व त्या शेअर्सच्या ९८० स्ट्राईकचा भाव ५० रु. व १०२० स्ट्राईकचा भाव १५ रु. असेल अशा वेळी जर शेअर्सच्या भावामध्ये १०० रुपयांची वाढ झाली तर ९८० व १०२० या स्ट्राईकच्या विकल्पांचा भाव सम प्रमाणात वाढणार नाही.
खालील तक्त्यावरून अंतर्भूत व बाह्यभूत किंमत कशी समजावी हे लक्षात येईल.
* विकल्पांची संवेदनशीलता (ऑप्शन्स सेन्सिटिव्हीटिज्) – ग्रीक्स (Greeks): ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. तिचा अभ्यास नसल्यास ऑप्शन्स ट्रेडर्सला आíथक नुकसान सोसावे लागते. Delta, Theta, Gamma, Vega, Rho, हे सर्व घटक ऑप्शन्स वरती प्रभाव करत असतात. त्यापकी जास्त महत्वाच्या घटकांची माहिती आपण खालील प्रमाणे घेऊ
* डेल्टा (Delta): शेअर्सच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे जे बदल ऑप्शन्सच्या किमतीमध्ये होतात ते बदल मोजण्याचे सूत्र म्हणजे डेल्टा. शेअर्सची किमत वाढली की कॉलची किमत वाढते. व पुटची किमत कमी होत असते त्यामुळे कॉलचा डेल्टा शून्य ते +१ असतो व पुटचा डेल्टा शून्य ते -१ असतो. वेगवेगळ्या स्ट्राईकचा मनीनेसप्रमाणे डेल्टा वेगवेगळा असतो. ATM स्ट्राईकच्या कॉलचा डेल्टा जवळपास ५०% असतो. तसेच खूप आतील (Deep ITM) कॉलचा डेल्टा ८० ते १००% पर्यंत असतो. तसेच खूप दूर (Deep OTM) च्या कॉलचा डेल्टा १०% ते ०% असतो. म्हणजेच शेअर्सची किंमत १००रुपयाने वाढल्यास ATM कॉल ५०रुपयाने, Deep ATM कॉलची किंमत १००रुपयाने व Deep OTM कॉलची किंमत १० ते २० रुपयाने वाढते. याच्या अगदी विरूद्ध पुटसंदर्भात विचार करावा. (या संकल्पनेचा वापर करून कॉल व पुट चे विस्तार (Spreads) डावपेच आखता येतात व कॅपिटल सुरक्षित ठेऊन पसे कमावता येतात.
* थीटा (Theta): प्रत्येक दिवसागणिक ऑप्शन्सची किंमत कमी होत असते. प्रत्येक दिवसागणिक ऑप्शन्सची किंमत किती रुपयाने कमी होते ते मोजण्याचे सूत्र म्हणजे थीटा. ऑप्शन्सच्या किमतीमध्ये प्रत्येक दिवसागणिक घसरण होत असल्याने ऑप्शन्स घेणाऱ्यांसाठी थीटा नकारात्मक असतो व ऑप्शन्स विकणाऱ्यांसाठी थीटा सकारात्मक असतो.
प्रत्येक दिवसागणिक शेअर्सचा भाव व इतर गोष्टी जसाच्या तशा असल्या तरी प्रत्येक दिवसाला ऑप्शन्स कमी होईल म्हणजेच प्रिमीअम कमी होईल त्यामुळे ऑप्शन्स खरेदीदारास नुकसान व ऑप्शन्स विकणाऱ्यासाठी फायदा होईल. घसाऱ्याचा वेग एक्सपायरी जसजशी जवळ येईल तसा तसा वाढत असतो.
या संकल्पनेचा वापर करून स्प्रेड किवा कॅलेंडर स्प्रेडचे डावपेच आखता येतात.
*व्हेगा (श्ीॠं): शेअर्सच्या भावामध्ये मोठा फरक घडवणाऱ्या घटना जसे कोर्टाचे निर्णय, बजेट, रिझर्व बँकेचे पॉलिसी निर्णय, कंपन्याचे तिमाही/ वार्षकि ताळेबंद पत्रक घोषणा, इत्यादी मुळे शेअर्सचा भाव व इतर गोष्टी जसाच्या तशा असल्या तरी ऑप्शन्सच्या किमतीमध्ये होणारा बदल हा व्हेगा या संकल्पनेनुसार मोजत असतात. त्या मोजमापाला ध्वनित अस्थिरता (Implied Volatility) म्हणतात. अस्थिरता (Volatility) वाढणार असेल तर इतर सर्व गोष्टी समान असल्या तरी ऑप्शन्सचा भाव वाढत असतो कारण निर्णय काय येणार हे माहित नाही पण प्रचंड फायदा किवा नुकसान होणार असल्याने खूप मोठ्या गोंधळाची परिस्थिती म्हणजेच अस्थिरतेची वाढ होत असल्याने कॉल व पुट या दोघांचीही किंमत वाढत असते. व निर्णय झाल्याने उत्सुकता संपल्याने ध्वनित अस्थिरता एकदम कमी व्हायला लागते. या संकल्पनेचा वापर करून Straddle, Strangle अशा रणनीती घटनेच्या अगोदर विकत घेणे व घटना घडल्याबरोबर विकणे असे डावपेच आखता येतात.
प्रशिक्षणाच्या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या अनेक ट्रेडर्सशी बोलताना असे जाणवले की त्यांना ऑप्शन्सवर परिणाम करणाऱ्या गोष्टीं, टाइम व्हॅल्यू, ऑप्शन्स सेन्सिटिव्हीटिज्, म्हणजे डेल्टा, थीटा, गॅमा इत्यादी स्ट्राईक कसे निवडावे, कोणत्या स्ट्राईकची खरेदी विक्री करावी तसेच कोणत्या परिस्थितीमध्ये ऑप्शन्स खरेदी करावे व कोणत्या परिस्थितीमध्ये विकावे याची माहिती नाही, ही माहिती नसल्याने, पसे कमावण्याचा अतिशय सुंदर प्रकार असूनसुद्धा ट्रेडर्सचे नुकसान होते. त्यामुळे योग्य प्रशिक्षकाकडून ज्ञान घेऊनच ट्रेड करावे असा या ठिकाणी सल्ला द्यावा वाटतो.
ऑप्शन्समध्ये असणारे वरीलप्रमाणे अनेक गोष्टी, खरेदी करण्याचे अधिकार व व विक्री करणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, अनलिमिटेड नफा व अनलिमिटेड तोटा, अनेक एक्स्पायरी सायकल्स इत्यादीमुळे व्यवस्थित अभ्यास केल्यास बाजाराच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये धन लाभ करता येईल, असे अनेक डावपेच (strategies) उपलब्ध आहेत त्यांची नावे अतिशय मनोरंजक आहेत जसे Naked Call, Naked Put, Bull Spreads, Bear Spreads, Strangles, Straddles, Butterfly, Ratio Spread, Condor, Calendar Spread इत्यादी विविध संकल्पनेचा एकत्रित विचार करून अनेक डावपेच आखता येतात त्याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत.
(पुढील अभ्यास वर्गामध्ये चालू बाजारातील उदाहरणे घेऊन लाँग कॉल (LONG CALL) या डावपेचाचा सविस्तर अभ्यास करू व त्यावर होणाऱ्या विकल्पांची संवेदनशीलतेचा परिणाम (Options Greeks) उदाहरणाद्वारे समजून घेऊ.)
primeaocm@yahoo.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा