सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या अनेक नोकरदार व्यक्तींच्या मनात त्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेविषयी गैरसमज असतात. उदाहरणार्थ, पेन्शन करमुक्त मिळते किंवा पेन्शनच्या रकमेतून काही वजावटी म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन (जे फार वर्षांपूर्वी नोकरदार व्यक्तींना मिळत होतं ते) मिळतं का? पेन्शनर व्यक्तीने प्राप्तिकराचे विवरणपत्र भरायचे का? इ. इ. आजच्या लेखात अनकम्युटेड (Uncommuted) आणि कम्युटेड (commuted) पेन्शनविषयी प्राप्तिकर कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, कोणती पेन्शन किती मर्यादेपर्यंत करमुक्त मिळते ते पाहू या.
पेन्शन म्हणजे एखाद्या नोकरदार व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर त्याच्या एम्प्लॉयरकडून मिळणारी रक्कम! त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला लाईफ इन्शुरन्स कंपनी तसेच म्युच्युअल फंड योजनेमध्ये पैसे गुंतवल्यामुळेही पेन्शन मिळू शकते.
अनकम्युटेड पेन्शन म्हणजे ठरावीक कालावधीत मिळणारी (Periodical) पेन्शन! आणि कम्युटेड पेन्शन म्हणजे एकदम एकरकमी मिळणारी (Lumpsum) पेन्शन! अनकम्युटेड पेन्शन संपूर्णपणे करपात्र असते. अशा पेन्शनवर कोणतीही वजावट उदा. स्टँण्डर्ड रिडक्शन मिळत नाही. अनकम्युटेड पेन्शन आणि त्याची कर आकारणी प्राप्तिकर कायद्याच्या कोणत्या उत्पन्नात समाविष्ट होते ते खालील कोष्टकात दिले आहे.
आता कम्युटेड पेन्शनविषयी तरतुदी पाहू. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(१०ए) नुसार कम्युटेड पेन्शनविषयीच्या तरतुदी खालीलप्रमाणे आहेत.
१) एखाद्या सरकारी अथवा निमसरकारी नोकरदार व्यक्तीला मिळणारी कम्युटेड पेन्शन ‘सिव्हिल पेन्शन’ (कम्युटेशन) नियम किंवा केंद्र अथवा राज्य सरकारच्या एखाद्या योजनेनुसार संपूर्णपणे करमुक्त मिळते. उइऊळच्या ६-१-१९९२ च्या परिपत्रक ६२३नुसार सुप्रीम कोर्ट तसेच हायकोर्टच्या न्यायाधीशांनासुद्धा ही तरतूद लागू होते.
२) खाजगी क्षेत्रातील नोकरदार व्यक्तीला कम्युटेड पेन्शनबरोबर ग्रॅच्युईटीसुद्धा मिळाली असेल तर कम्युटेड पेन्शनच्या १/३ एवढी रक्कम करमुक्त मिळते.
३) खाजगी क्षेत्रातील नोकरदार व्यक्तीला कम्युटेड पेन्शनबरोबर ग्रॅच्युईटी मिळाली नसेल तर कम्युटेड पेन्शनच्या १/२ एवढी रक्कम करमुक्त मिळते.
वरील दोन तरतुदी समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. समजा- खाजगी क्षेत्रातून निवृत्त होताना एखाद्या व्यक्तीला दरमहा रु. १२,०००/- एवढी पेन्शन ठरली. त्यापैकी या व्यक्तीने रु. १०,०००/- एवढी पेन्शन कम्युट केली आणि समजा, या कम्युटेड पेन्शनची रक्कम झाली रु. ८,००,०००/-. या पैकी करमुक्त कम्युटेड पेन्शन पुढीलप्रमाणे असेल.
१. समजा, या व्यक्तीला ग्रॅच्युईटी मिळाली असेल तर :
करमुक्त पेन्शन- ८,००,०००      १२,०००
——– x  ————
 १००००              ३
= ३,२०,००० रुपये
२) समजा, या व्यक्तीला ग्रॅच्युईटी मिळाली नसेल तर :
करमुक्त पेन्शन- ८,००,०००      १२,०००
——– x  ————
 १००००              २
= ४,८०,००० रुपये
४) त्याचप्रमाणे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या पेन्शन फंडातून मिळणारी कम्युटेड पेन्शन तसेच कलम १० (२३ एएबी) नुसार इतर इन्शुरन्स कंपन्यांमधून मिळणारी कम्युटेड पेन्शनसुद्धा संपूर्णपणे करमुक्त मिळते.
लेखक गुंतवणूक व प्राप्तिकर नियोजन सल्लागार आहेत.
   अनकम्युटेड पेन्शन                 कुठे समाविष्ट होते?
१.  एम्प्लॉयरकडून मिळणारी     ‘पगार’ या उत्पन्नाखाली
२.  लाइफ इन्शुरन्स किवा म्युच्युअल    ‘इतर उत्पन्न’ या उत्पन्नाखाली
     फंडांमधून मिळणारी
३.  वारसदाराला वरील दोन     ‘इतर उत्पन्न’ या उत्पन्नाखाली
     प्रकारांमधून मिळणारी
४.  विधवा महिलेला पतीच्या निधनानंतर    ‘इतर उत्पन्न’ या उत्पन्नाखाली
     मिळणारी (फॅमिली पेन्शन)
पीपीएफचा  ‘ग्रोथ चार्ट’
कलम ८० सीनुसार मिळणारी वजावट घेण्यासाठी दरवर्षी रक्कम पीपीएफमध्ये गुंतविण्यासाठी पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न डॉ. सुमती यांच्यासमोर नेहमी असायचा. त्यावर कायदेशीर तोडगा म्हणजे त्यांनी पहिली ६ वर्षे नियमितपणे एक विशिष्ट रक्कम म्हणजे समजा रु. ७०,००० त्यांच्या पीपीएफ खात्यात जमा करायची आणि ६ वर्षांनंतर चार वर्षे अलिकडे असलेल्या रकमेच्या ५०% एवढी रक्कम खातेदाराला दरवर्षी काढता येते या तरतुदीचा फायदा घेऊन डॉ. सुमती यांनी सातव्या वर्षांपासून रु. ७०,००० खात्यातून काढावेत, असे सांगणारा पीपीएफ खात्याचा ‘ग्रोथ चार्ट’ या स्तंभात (अर्थ वृत्तान्त, १ एप्रिल २०१३)  देण्यात आला होता. त्यावेळी स्तंभात राहून गेलेल्या छपाईच्या चुका सुधारून, तो वाचकांसाठी पुन्हा देत आहोत.
वर्ष    ओपनिंग बॅलेन्स    गुंतवणूक    व्याज ८%    काढलेली रक्कम    क्लोजिंग बँलेन्स    करबचत
१    काही नाही    रु. ७०,०००    –    –    रु. ७०,०००    रु. २१,६३०
२    रु. ७०,०००    रु. ७०,०००    रु. ५,६००    –    रु. १,४५,६००    रु. २१,६३०
३    रु. १,४५,७००    रु. ७०,०००    रु. ११,६४८    –    रु. २,२७,२४८    रु. २१,६३०
४    रु. २,२७,२४८    रु. ७०,०००    रु. १८,१८०    –    रु. ३,१५,४२८    रु. २१,६३०    
५    रु. ३,१५,४२८    रु. ७०,०००    रु. २५,२३४     –    रु. ४,१०,६६२    रु. २१,६३०
६    रु. ४,१०,६६२    रु. ७०,०००    रु. ३२,८५३     –    रु. ५,१३,५१५    रु. २१,६३०    
७    रु. ५,१३,५१५    रु. ७०,०००    रु. ४१,०८१    रु. ७०,०००    रु. ५,५४,५९६    रु. २१,६३०    
८     रु. ५,५९,५९६    रु. ७०,०००    रु. ४४,३६८    रु. ७०,०००    रु. ५,९८,९६४    रु. २१,६३०
९    रु. ५,९८,९६४    रु. ७०,०००    रु. ४७,९१७    रु. ७०,०००    रु. ६,४६,८८१    रु. २१,६३०
१०    रु. ६,४६,८८१    रु. ७०,०००    रु. ५१,७५०    रु. ७०,०००    रु. ६,९८,६३२    रु. २१,६३०
११    रु. ६,९८,६३२    रु. ७०,०००    रु. ५५,०९१    रु. ७०,०००    रु. ७,५४,५२२    रु. २१,६३०
१२    रु. ७,५४,५२२    रु. ७०,०००    रु. ६०,३६२    रु. ७०,०००    रु. ८,१४,८८४    रु. २१,६३०
१३    रु. ८,१४,८८४    रु. ७०,०००    रु. ६५,१९१    रु. ७०,०००    रु. ८,८०,०७५    रु. २१,६३०
१४    रु. ८,८०,०७५    रु. ७०,०००    रु. ७०,४०६    रु. ७०,०००    रु. ९,५०,४८१    रु. २१,६३०
१५    रु. ९,५०,४८१    रु. ७०,०००    रु. ७६,०३८    रु. ७०,०००    रु. १०,२६,५१९    रु. २१,६३०
एकूण        १०,५०,०००    ६,०६,५१९    ६,३०,०००     १०,२६,५१९    ३,२४,४५०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा