भारतात प्राचीन काळापासून कर आकारले जात होते याचा उल्लेख मनुस्मृती आणि अर्थशास्त्रामध्ये आढळून येतो. राजा महाराजांच्या काळापासून उत्पन्नावर आणि खर्चावर विविध कर आकारले जात. त्याकाळीसुद्धा विक्री कर, अबकारी कर, रस्ते कर असे कर आकारले जात होते त्याची नावे निराळी होती. हे कर धान्य, पशुसंपत्ती, सोने वगरेच्या रूपाने घेतले जात.
आधुनिक भारतात प्राप्तिकराची सुरुवात १९२२ पासून झाली. तेव्हापासून प्राप्तिकर कायदा, १९२२ अस्तित्वात आला. या कायद्यात वेळोवेळी कालानुरूप अनेक बदल करण्यात आले. १ एप्रिल १९६२ पासून नवीन प्राप्तिकर कायदा प्राप्तिकर कायदा, १९६१ अंमलात आला. हा कायदा आजतागायत लागू आहे. या कायद्यात दरवर्षी अनेक बदल सुचविले जातात. या कायद्याच्या प्रशासनामध्ये सुद्धा अनेक बदल केले गेले. प्रत्येक करदाता हा फाईल क्रमांक आणि जीआयआर नंबर वरून ओळखला जायचा. करदात्याची माहिती, त्याचा फोटो वगरे माहिती प्राप्तिकर खात्याकडे नव्हती.
करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन पर्मनन्ट अकाऊंट नंबर (‘पॅन’) ची कल्पना १९९४ मध्ये पुढे आली. या मध्ये करदात्याची संपूर्ण माहिती, फोटो, जन्म तारीख वगरेची नोंद केली जाते. या मुळे काही गरप्रकारांना आळा बसला. हा एक महत्वाचा टप्पा समजला जातो. प्रत्येक करदाता हा त्याच्या ‘पॅन’ वरून ओळखला जाऊ लागला. ‘पॅन’ हा प्राप्तिकर खाते आणि करदाता यामधील महत्वाचा दुवा आहे. आता बरयाच व्यवहारांसाठी ‘पॅन’ ची माहिती देणे अनिवार्य केल्यामुळे प्राप्तिकर खात्याकडे या व्यवहाराची माहिती विविध सरकारी, खाजगी संस्था, बँक, वगरेंकडून मिळते. त्यामूळे प्राप्तिकर खात्याकडे आपल्या व्यवहाराची माहिती वेळोवेळी वार्षकि माहिती अहवाल (अकफ), उद्गम कर विवरण पत्र याद्वारे जात असते. ‘पॅन’ हे अनेक सरकारी आणि गर-सरकारी कामकाजामध्ये ओळखपत्र म्हणून स्वीकारले जाते.
एकापेक्षा जास्त ‘पॅन’ :
काही वेळेला करदात्याकडून चुकून एकापेक्षा जास्त वेळा ‘पॅन’ चा अर्ज केला गेला असेल किंवा प्राप्तिकर खाते, एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चरकडून चुकून एकापेक्षा जास्त ‘पॅन’ दिले गेले असतील तर त्वरित आपल्या अखत्यारीत प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे अर्ज करून तो रद्द करून घ्यावा किंवा प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन रद्द करावा. एका व्यक्तीच्या नावाने एकापेक्षा जास्त ‘पॅन’ असणे हा प्राप्तिकर कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. यासाठी १०,००० रुपये दंडाची तरतूद केली आहे.
तपशिलात बदल:
‘पॅन’ कार्ड वरील माहिती जर चुकीची असेल किंवा काही कारणाने बदलली असेल तर ‘पॅन’ बदलासाठी फोर्म भरून वर सांगितल्या प्रमाणे एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांच्या सेन्टर्स मध्ये आवश्यक कागदपत्रांसोबत दाखल करावा. या साठी सुद्धा शुल्क आकारले जाते. जो बदल करावयाचा असेल त्याप्रमाणे त्याचा पुरावा सोबत जोडावा लागतो. उदा. पत्ता बदलला असेल तर नवीन पत्त्याचा पुरावा, नाव बदलले असेल तर गझेट नोटिफीकेशन, जन्मतारीख चुकली असेल तर त्याचा पुरावा, इत्यादी. जर पत्ता बदलला असेल तर संबंधीत प्राप्तिकर अधिकारयाला कळवणे गरजेचे असते.
पूर्वी प्राप्तिकर खात्याने दिलेले ‘पॅन’ कार्ड हे श्व्ोत-धवल होते, जर काहीही बदल नसले आणि नवीन रंगीत कार्ड हवे असेल किंवा जुने कार्ड हरवले असेल तर जुन्या ‘पॅन’ कार्डाची प्रतसोबत, इतर कागदपत्रे जोडून नवीन ‘पॅन’ कार्ड साठी अर्ज करता येतो. या मध्ये पर्मनन्ट अकाऊंट नंबर बदलत नाही.
प्राप्तिकराचा इतिहास: पर्मनन्ट अकाऊंट नंबर‘पॅन’प्राप्तिकराचा इतिहास
भारतात प्राचीन काळापासून कर आकारले जात होते याचा उल्लेख मनुस्मृती आणि अर्थशास्त्रामध्ये आढळून येतो. राजा महाराजांच्या काळापासून उत्पन्नावर आणि खर्चावर विविध कर आकारले जात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-06-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permanent account number pan card