लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी)चे वाढते महत्त्व लक्षात घेता भारत सरकारने १९९८ मध्ये पेट्रोनेट एलएनजी या कंपनीची संयुक्त भागीदारीने स्थापना केली. गेल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम या ऊर्जा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांच्या एकत्रित गुंतवणुकीतून ही कंपनी उभी राहिली. रास लाफान एलएनजी या कतारमधील कंपनीशी एलएनजी पुरवठय़ाबाबत करार केल्यानंतर २००९मध्ये कंपनीने ऑस्ट्रेलियाच्या अॅक्सॉन मोबिल इंटरनॅशनल या कंपनीशी आणि २०११मध्ये गॅझ्प्रोम ग्लोबल एलएनजी या सिंगापूरच्या कंपनीशी एलएनजीच्या पुरवठा, खरेदी आणि विक्रीचे करार केले. भारतातील या सर्वात मोठय़ा एलएनजी कंपनीचे दहेज (गुजरात) येथे मोठे टर्मिनल आहे. येत्या तिमाहीत कोची (केरळ) येथील टर्मिनल कार्यान्वित होत असून दहेजमध्येही क्षमता वाढवण्यात येत आहे. नसíगक वायूची मागणी वार्षकि सरासरी ९% दराने वाढत असून पुरवठा मात्र ३% दराने कमी होण्याची शक्यता आहे. एलएनजी पुरवठय़ासाठी कंपनीचे करार दीर्घ कालावधीसाठी असल्याने पेट्रोनेट एलएनजीला त्याचा फायदाच होईल. गेल्या आíथक वर्षांकरिता ३१,४८७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,१४९ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या पेट्रोनेट एलएनजीकडून यंदाच्या आर्थिक वर्षांत १,३०० कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे. सध्या १२५ रुपयांच्या आसपास मिळणारा हा शेअर तुम्हाला २०% परतावा वर्षभरात देऊ शकेल.
ऊर्जा-सघन!
लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी)चे वाढते महत्त्व लक्षात घेता भारत सरकारने १९९८ मध्ये पेट्रोनेट एलएनजी या कंपनीची संयुक्त भागीदारीने स्थापना केली.
आणखी वाचा
First published on: 21-10-2013 at 08:56 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petronet lng