* रिझव्र्ह बँकेने डिसेंबर २०१३ मधील पतधोरण आढाव्यात थांबा आणि वाट पाहा धोरण अवलंबिले आणि भविष्यात वाटल्यास रेपो दर दरवाढीचा पर्याय खुला ठेवला. तुमची प्रतिक्रिया काय आहे?
– महागाईचा दर चढा असताना रिझव्र्ह बँकेने दर जरी स्थिर ठेवले तरी पुढील पतधोरणात किंवा त्याआधी योग्य वेळी योग्य ती पावले उचलण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. महागाईचा दर जरी चढा असला तरी या दरवाढीस मुख्यत्वे अन्नधान्याच्या किमतीतील वाढ कारण ठरली. किमतीत चढ किंवा उतार हा कायमचा नसतो. ही वाढ एखादा सुळका असू शकेल व लवकरच महागाईचा दर कमी होईल, असा आशादायक सूर रिझव्र्ह बँकेने लावला ते योग्यच झाले. नोव्हेंबरचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक व डिसेंबरचा महागाईचा निर्देशांक) पुढील आठवडय़ात जाहीर झाल्यानंतर त्यावर रिझव्र्ह बँक योग्य ती पावले उचलेल. कदाचित रेपो दर वाढवेलसुद्धा. हे सगळे या महिन्यातील आकडय़ांवर अवलंबून आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा