नियमित निवृत्तिवेतन ही संकल्पना आता इतिहासजमा होत असताना निवृत्तीविषयी नियोजन करणे हा प्रत्येक भारतीयासाठी आता जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.  राहणीमानाचा वाढता खर्च, सामाजिक आणि आíथकदृष्टय़ा सक्षम होण्याची स्पर्धा तसेच बदलत्या आíथक वातावरणात कोणालाही ज्या क्षणी तो कमावता होतो, त्याच क्षणापासून आपल्या निवृत्तीसाठी तरतूद करण्याची गरज भासते. नुकताच ‘मॅक्स लाइफ इन्शुरन्स आणि निल्सन’ने निवृत्तिवेतनाचा उपयोग आणि त्याविषयीचा दृष्टिकोन यांचा अभ्यास करण्यासाठी ३१ ते ५० वर्षे वयोगटातील १,०९१ पुरुषांचे सर्वेक्षण केले. यामध्ये असे दिसून आले की, भारतीय लोकांना त्याचे महत्त्व तर लक्षात आले आहे, पण ही संकल्पना अजूनही त्यांच्या पचनी पडत नाही. परिणामी, आता नोकरी करणाऱ्या लोकांनी जागे होऊन आपल्या निवृत्तीचे नियोजन करणे खूप गरजेचे, कारण याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.  
निवृत्ती :  संकल्पना आणि वास्तव
सर्वेक्षणानुसार आयुष्याचा एक भाग म्हणून त्याचा नकारात्मक असा परिणाम होण्यापेक्षा सकारात्मक परिणाम होण्यावर लोकांचा भर असतो. अधिकतर लोकांच्या मते निवृत्ती म्हणजे स्वातंत्र्य, मन:शांती तसेच आपल्या इच्छेनुसार आयुष्य जगणे होय. १० टक्के लोकांच्या मते त्यांना अधिक आíथक स्वातंत्र्य हवे आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या वेळी त्यांच्याकडे अधिक पसा असणे गरजेचे आहे. त्यातील १ टक्का लोकांनी हे मान्य केले की निवृत्त झालेल्या वर्षांत आíथक निकड भासण्याची गरज आहे. यातील विरोधाभास असा की जरी ७५ टक्के लोकांना असे वाटते की त्यांचे नियमित खर्च हे निवृत्ती नंतर वाढणार आहे, तरीही त्यातील अधिकतर लोकांनी आपल्या निवृत्तीनंतरच्या खर्चाची तरतूदच केलेली नाही.  
या अभ्यासानुसार २८ टक्के लोकांनी निवृत्तीसाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यातील अधिकतर लोकांनी रक्कम ही आयुर्वमिा उत्पादनात गुंतवली आहे, तर इतरांनी बँकेत डिपॉझिट, रिअल्टी आणि सोन्यात गुंतवणूक केली आहे. त्यातील केवळ ४ टक्के लोकांनी लाइफ इन्शुरन्स पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक केली असून त्यामध्ये गॅरेंटिड मंथली रिटर्न्‍स मिळतील. पर्याय पहिला – बाकी ७२ टक्के लोकांपकी ६० टक्के लोकांकडे कोणत्याही प्रकारचा बॅकअप प्लॅन नसून ते सध्याच्या रकमेवर किंवा मुलांवर अवलंबून आहेत.  
जाणिवेची पहाट
तुमच्या निवृत्तीसाठी केवळ बचत करणे योग्य नव्हे. जर योग्य प्रमाणात नियोजन केले नाही किंवा योग्य लक्ष्य समोर ठेवले नाही तर ५० टक्के लोकांनी एकरकमी किंवा आपल्या सोयीनुसार बचत करून काही पसा गोळा करून ठेवला होता, जो कोणत्याही व्यावसायिक आíथक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय गोळा करून ठेवले आहेत. यातील एक घातक पद्धत ही की ३७ टक्के गुंतवणूकदार हे निवृत्तीपूर्वी आपल्या निवृत्तीनंतरच्या रकमेचा अभ्यास करण्यास नकार देतात. वाढत्या महागाईत ही एक फारच घातक गोष्ट ठरते, महागाईत वाढ झाल्याने वाढता वैद्यकीय खर्च आणि बदलती जीवनशैली यावर उपाय नसतो. महत्त्वाची गोष्ट अशी की, निमशहरी भागातील लोकांनी महागाईकडे दुर्लक्ष केले असून त्यामुळे आपल्या निवृत्तीचे नियोजन करताना ५० टक्के गुंतवणूकदारांच्या मते वाढता वैद्यकीय खर्चही समाविष्ट असतो.  
सर्वसाधारणपणे भारतात निवृत्तीचे वय हे ५८ वर्षे इतके असते आणि लोकांचा असा समज आहे की ३९ व्या वर्षांपासून निवृत्तीचे नियोजन करणे गरजेचे असते. तरीही सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आíथक सल्लागारांच्या मते गुंतवणूक करण्यासाठी हे वय खूपच उशिराचे आहे. तरीही जेवढय़ा लवकर ही गुंतवणूक करावी तितकी सोपी निवृत्ती होण्यास मदत होते. तरुण वयात कुटुंबीयांबरोबरच आपला वैद्यकीय खर्च कमी असतो.  मग आपण निवृत्तीच्या नियोजनात जितका उशीर करू तितका खर्च वाढीस लागतो. सर्वेक्षणानुसार ६५ टक्के लोकांच्या मते जितक्या लवकर ते गुंतवणूक सुरू करतील तेवढा भविष्यात फायदा होऊ शकेल. यातील दर तिसऱ्या व्यक्तीच्या मते त्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या वेळी त्यांच्याकडे पसे कमी राहतील असा अंदाज त्यांना होता.  
नियोजनाची गरज
आपल्याला गरज असलेल्या आíथक गोष्टींची माहिती असल्यास आपल्याला आपल्या निवृत्तीच्या वेळेस किती रकमेची गरज भासेल या गोष्टीची माहिती अनेकांना उशिरा लक्षात येते. परिणामी, ते त्या दिशेने उशिरा पावले टाकू लागतात.  
सर्वेक्षणाच्या मते ७९ टक्के लोकांनी आयुर्वमिा हे उपकरण आपल्या निवृत्तीनंतरच्या पुंजीसाठी आवश्यक रक्कम निर्माण करण्यासाठी वापरले. त्याचबरोबर ५४ टक्के लोकांनी अनेक पॉलिसीज घेतल्या. ६४ टक्के गुंतवणूक न करणाऱ्या गुंतवणूकदारांनी बँकेची फिक्स्ड डिपॉझिट्स, रिअल्टी आणि सोन्याबरोबरच आयुर्वम्यिात गुंतवणूक केली आहे. अधिकतर गुंतवणूकदारांसाठी आयुर्वमिा हा एक चांगला पर्याय असून, त्यामुळे सुरक्षेबरोबरच, गॅरेंटिड, उच्च उत्पन्न आणि करसवलत गुंतवणूक करतानाही उपलब्ध होते.  
निवृत्तीसाठी गुंतवणूक एक निवड, एक चान्स नव्हे
केवळ आपल्या निवृत्तीच्या वेळी आपण श्रीमंत असू अशी आशा करणे चुकीचे आहे, त्यासाठी त्या दिशेने योजनापूर्वक काम करणे गरजेचे असून, त्यामुळे निवृत्तीनंतरचे आयुष्य हे काळजीमुक्त होऊन चांगली जीवनशैली उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठीच तुमच्या निवृत्तीचे नियोजन हे व्यावसायिक लोकांकडून जाणून घेऊन त्याचबरोबर योग्य प्रमाणात विविध उत्पादनांत गुंतवणूक करून आपल्या भांडवलाची सुरक्षा करून चांगले उत्पन्न मिळवण्याची गरज असते, म्हणूनच तुमच्या निवृत्तीसाठी योजना करण्यास कधीच उशीर झालेला नसतो. म्हणूनच तुम्ही हे पहा की खूप उशीर झालेला नाही ना!
(लेखक मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा