भविष्यातील आर्थिक तरतुदींची काळजी घेतली जाते; तुमची स्वप्ने साकारली जातात; इच्छा पूर्ण होतात आणि मुख्य म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे ‘सर उठा के’ जगू शकता अशी आयुर्विम्याची समृद्ध योजना..
एडिंबर्ग येथे १८२५ मध्ये स्थापन झालेली स्टॅन्डर्ड लाईफ कंपनी आणि भारतातील गृहकर्ज, बँक, म्युच्युअल फंड अशा अनेक क्षेत्रांमध्ये मानाचे स्थान असलेला एचडीएफसी समूह यांच्या सहकार्याने २००० मध्ये भारतात स्थापन झालेल्या एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ या विमा कंपनीची एन्डाउमेंट प्रकारात मोडणारी ही जीवन विमा योजना. तिच्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, या योजनेमुळे भविष्यातील आर्थिक तरतुदींची काळजी घेतली जाते. तुमची स्वप्ने साकारली जातात. इच्छा पूर्ण होतात आणि मुख्य म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे ‘सर उठा के’ जगू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठळक वैशिष्टय़े :
१. ही विमा योजना १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला मिळू शकते.
२. विमा योजनेचा कालावधी ५ ते ४० वष्रेपर्यंत असतो.
३. हप्ता भरण्याचा कालावधी योजनेच्या कालावधीइतकाच असतो.
४. मॅच्युरिटीबाबत दोन पर्याय आहेत:
– विमा छत्राची रक्कम आणि सर्व प्रकारचे लाभांश इतकी रक्कम
– या सर्व लाभांबरोबरच ९९ वर्षांपर्यंतचे वाढीव विमा छत्र.
५. ही लाभांसकटची योजना आहे. त्यामुळे दरवर्षी विमा छत्राच्या रकमेच्या प्रमाणात घोषित केलेला लाभांश विमाधारकाच्या खात्यात जमा केला जातो. याबाबत कंपनीने कमीत कमी ३% लाभांशाची २०१२ पर्यंतची हमी दिलेली आहे. त्याचबरोबर अंतरिम आणि टर्मिनल लाभांशाचीही तरतूद आहे. परंतु हमी नाही.

उदाहरण –
* विमाधारकाचे वय : ३० वर्षे
* योजनेचा कालावधी : २० वर्षे
* हप्ता भरण्याचा कालावधी : २० वर्षे
* विम्याची रक्कम : रु. २१,३९,९१६
* वार्षकि हप्ता : रु. १,२०,०००
* सेवा कर : रु. ३,७०८
* हप्त्याची एकूण   रक्कम : रु. १,२३,७०८

विमा योजनेचे लाभ
१. योजनेच्या कालावधीमध्ये म्हणजे विमाधारकाच्या वयाच्या ५० व्या वर्षांपर्यंत त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला विमा छत्राचे रु. २१,३९,९१६ आणि त्या वर्षांपर्यंत त्याच्या खात्यात जमा झालेला लाभांश, इतकी रक्कम प्राप्त होणार.
विमा विक्रेत्याने सदर योजने संदर्भात दिलेल्या ‘इलस्ट्रेशन’मध्ये विमाधारकाच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये कोणत्या वर्षांला किती रक्कम (प्रत्याभूत आणि अप्रत्याभूत) मिळणार याचा ‘कॅश फ्लो’ दिलेला आहे. त्यानुसार १०व्या वर्षी मृत्यू झाला तर विमा छत्राचे रु. २१,३९,९१६, अधिक ज्याची हमी नाही, असे रु. ५,१३,५७६ (६% प्रमाणे) किंवा रु. ६,८४,७६८ (१०% प्रमाणे) म्हणजे एकूण रु. २६,५३,४९२ किंवा रु. २८,२४,६८४ इतकी रक्कम नामनिर्देशकाला प्राप्त होणार.
२. विमाधारक योजनाचा कालावधी तरून गेला तर त्याच्या वयाच्या ५१ व्या वर्षी त्याला रु. ३०,९२,१७३ आणि रु. ३५,९५,०४८ या दरम्यानची रक्कम प्राप्त होणार.

विश्लेषण :
या विमा योजनेमध्ये गुंतवणूक आणि विमा छत्र असे दोन प्रकारचे लाभ अंतर्भूत आहेत. अशा प्रकारच्या योजना मुख्यत्वे गुंतवणुकीच्या उद्देशाने घेतल्या जातात. म्हणून प्रथम या योजनेचा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करू या.
विमा विक्रेत्याने दिलेल्या ‘इलस्ट्रेशन’नुसार योजनेच्या तिसऱ्या वर्षांनंतर विमाधारकाच्या खात्यात ‘रिव्हरजनरी बोनस’ या मथळ्याखाली ६% किंवा १०% इतकी रक्कम जमा होते. (त्याखाली एक टिप्पणी आहे – प्रत्यक्ष रक्कम कंपनीच्या आíथक कामगिरीवर अवलंबून आहे. तक्त्यामधील रक्कम फक्त सादरीकरणासाठी आहेत.) ही रक्कम दाखविली आहे अनुक्रमे रु. ६४,१९७ आणि रु. ८५,५९६. विमा छत्राच्या रकमेसंदर्भात हिशेब केला तर प्रत्यक्षात जमा रक्कमेची टक्केवारी होते अनुक्रमे २.९९९% आणि ३.९९९%.
विमा योजनेच्या मॅच्युरिटीच्या रकमेचा (१०% च्या बिनहमीच्या रक्कमेसह रु. ३५,९५,०४८) विचार केला तर गुंतवणूकदाराने दरवर्षी रु. १,२०,००० प्रमाणे २० वष्रे जमा केलेल्या हप्त्याच्या रक्कमेवरील परताव्याचा दर होतो द.सा.द.शे. ३.७१%. सध्याच्या भाववाढीच्या तुलनेत अध्र्याहून कमी. त्यामुळे गुंतवणूक म्हणून ही विमा योजना लाभांपेक्षा नुकसानाकडेच जास्त झुकते, असे वाटते. कंपनीने भरघोस अंतरिम आणि टर्मिनल लाभांश दिला तर परताव्याचा दर थोडाफार वाढण्याची शक्यता आहे. परंतु कंपनी त्याबाबतीत कोणत्याच प्रकारची हमी देत नाही.

पर्याय :
१. या विमा इच्छुकाने त्याच कंपनीची (एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ) रु. १ कोटी विमाछत्राची, ३० वर्षांच्या कालावधीची, बिन नफ्याची ‘प्युअर टर्म’ विमा घेतली तर त्याला काय लाभ होतो त्याचा आढावा घेऊया.
वार्षकि हप्त्याची रक्कम रु. १०,९७१. ३० वर्षांच्या कालावधीची एकूण हप्त्याची रक्कम रु. ३,२९,१३०. संपूर्ण समृद्धीच्या २० वर्षांच्या कालावधीच्या एकूण हप्त्याची रक्कम रु. २४,००,०००. बचत रु. २०,७०,८७०. (२,४०,०००-३,२९,१३०) यापकी दरवर्षी १ लाख रुपये, ज्यामध्ये प्राप्तिकरात सूट आहे आणि परतावा करमुक्त आहे अशा गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामध्ये २० वष्रे गुंतविली तर विमाधारकाच्या खात्यात त्याच्या ५० व्या वर्षांनंतर रु. ५४,८९,२०० इतकी करमुक्त गंगाजळी तयार होते. ही रक्कम त्याने प्राप्तिकर वजा जाता निव्वळ ५.५०% टक्के परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवली तर त्याला आयुष्यभर मासिक रु. २५,००० च्या आसपास आवक चालू होऊ शकते.
२. या विमा इच्छुकाने भारतातील अव्वल नंबरच्या विमा कंपनीची याच ‘पॅरामीटर’ची योजना घेतली आणि वरीलप्रमाणेच हप्त्याच्या एकूण रकमेतील फरक हा वरील सुरक्षित पर्यायामध्ये २० वष्रे गुंतविला तर त्याची गंगाजळी होते रु. ३८,२०,५००.
सदर लेखाचा उद्देश पूर्णत: समीक्षात्मक असून माहिती त्या त्या वेबस्थळांवरून घेतलेली आहे.