बीएएसएफ ही जगातील एक अग्रगण्य रसायनिक कंपनी असून भारतातही विविध प्रकारची (शेतकी ते औद्योगिक) रसायनांचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून बीएएसएफ इंडिया ओळखली जाते. कंपनीच्या उत्पादंनांची श्रेणी इतकी मोठी आहे की कुठल्याही क्षेत्रातील मंदीचा फटका कंपनीला बसलेला नाही. नुकत्याच जाहिर झालेल्या निकालांनुसार मार्च २०१३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने रु. ८२१ कोटी विक्रीवर १३.३२ कोटी रूपयांचा नफा कामावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ६७% अधिक आहे. तर संपूर्ण आर्थिकवर्षांसाठी कंपनीने ३९४०.६३ (गेल्या वर्षी रु. ३५१५.९४) कोटी रुपयांच्या विक्रीवर रु. ११४.०८ ( गेल्या वर्षी १००.८६ रुपये) कोटी रूपयांचा नफा साध्य केला आहे.
गुजरातमधील दहेज येथे कंपनी सुमारे रु. १००० कोटीची गुंतवणूक पेट्रोलियम प्रकल्पात करीत आहे. हा प्रकल्प पुढील आर्थिकवर्षांत कार्यान्वित होत असून तेथे पोल्युरेथेन आणि पॉलिमरचे उत्पादनही होईल. दोन वर्षांपूर्वी कंपनीने तिच्या बीएएसएफ कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड, कन्स्ट्रक्शन केमिकल, बीएएसएफ पोल्युरेथेनेस इंडिया या तिन्ही अंगिकृत कंपन्यांचे विलींनीकरण स्वतत करून घेतले तसेच कोगनीस होिल्डग्स ही कंपनीही ताब्यात घेतली. चीन खालोखाल भारतातही कंपनीच्या उत्पादनांना मागणी वाढत असून येत्या काही वर्षांतच कंपनीच्या विस्तारीकरणाचा फायदा दिसून येईल. एक सुरक्षित आणि लाभदायी गुंतवणूक म्हणून बीएएसएफचा समभाग पोर्टफोलियोत असायलाच हवा.
बीएएसएफ इंडिया लिमिटेड
प्रवर्तक बीएएसएफ एसई, जर्मनी
सद्य बाजारभाव रु. ५८४.६५
प्रमुख व्यवसाय विविध रसायने, प्लास्टिक
भरणा झालेले भाग भांडवल रु. ४३.२९ कोटी
पुस्तकी मूल्य : रु. २६३.९० दर्शनी मूल्य : रु. १०/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) रु. २७.८
प्राइस अर्निंग गुणोत्तर (पी/ई) २१.२ पट
मार्केट कॅपिटल : रु. २५.४७ कोटी बीटा : ०.५
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ७७०/ रु. ५४८
पोर्टफोलियो : सुरक्षित अन् लाभदायीही!
बीएएसएफ ही जगातील एक अग्रगण्य रसायनिक कंपनी असून भारतातही विविध प्रकारची (शेतकी ते औद्योगिक) रसायनांचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून बीएएसएफ इंडिया ओळखली जाते. कंपनीच्या उत्पादंनांची श्रेणी इतकी मोठी आहे की कुठल्याही क्षेत्रातील मंदीचा फटका कंपनीला बसलेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-05-2013 at 12:33 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfolio basf safe and beneficiary also