गुंतवणुकीसाठी तुम्ही रिसर्च करताना अनेकदा ‘बीटा’ ही संज्ञा शेअरच्या संबंधात वापरलेली दिसली असेल. शेअर्समधील गुंतवणुकीसाठी ‘बीटा फॅक्टर’ फार महत्त्वाचा आहे. कारण ‘बीटा’मुळे एखाद्या शेअरचा चढ – उतार निर्देशांकच्या तुलनेत किती आहे ते मोजता येते. तुम्ही अनेक वेळा हे अनुभवलही असेल. शेअर बाजाराच्या अभ्यासासाठी ‘बीटा गुणोत्तर’ महत्त्वाचे मानले जाते. या गुणोत्तरमुळे एखादा शेअर निर्देशांकाच्या तुलनेत किती ‘व्होलाटाईल’ आहे ते कळते.
‘बीटा गुणोत्तर’ काढण्यासाठी निर्देशांक किंवा निफ्टीला १ बीटा मानले जाते. आता ज्या शेअरचा बीटा हा १ पेक्षा जास्त असेल तो शेअर, शेअर बाजाराच्या तुलनेत जास्त ‘व्होलाटाईल’ आहे. ज्या शेअरचा बीटा निर्देशांका इतकाच म्हणजे १ आहे तो शेअर निर्देशांकांनुसार वर – खाली होईल. तर ज्या शेअरचा बीटा हा १ पेक्षा कमी असेल त्याच्यावर निर्देशांकाच्या चढ – उताराचा विशेष परिणाम होणार नाही. अर्थात जितका बीटा जास्त तितका धोका आणि परतावाही जास्त. कमी बीटा असलेल्या शेअर्समधील गुंतवणूकही कमी जोखमीची मानली जाते.
उदा. वर्षभरात शेअर बाजाराने १०% परतावा दिला असेल आणि शेअर बाजारात नोंदणी झालेल्या एखाद्या शेअरने १२% परतावा दिला असेल तर त्या शेअरचा बीटा १.२ आहे.
शेअरमधील गुंतवणुकीच्या निर्णयासाठी बीटा गुणोत्तर महत्त्वाचे मानले जाते. मुख्यत्त्वे अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी बीटा निर्णायक ठरू शकतो. अर्थात बीटाचे गुणोत्तर हे ‘हिस्टॉरिकल डाटा’वर अवलंबून असल्याने केवळ बीटावर अवलंबून निर्णय घेणे योग्य नाही, हे ही इथे लक्षात घ्यायला हवे. वाचकांच्या महितीसाठी काही हाय/लो बीटा शेअर्सची नावे देत आहे.
कंपनीचे नाव बीटा
एचडीआयएल २.७
एनसीसी २.६
युनिटेक २.५
जीव्हीके पॉवर २.४
पॅन्टालून रिटेल २.४
पूंज लॉईड २.३
िहदुस्तान कन्स्ट्रक्शन कं. २.२
श्रेई इन्फ्रा २.१
कोलगेट ०.२
३ एम इंडिया ०.२
डॉ. रेड्डीज् ०.२
बायर क्रॉपसायन्स ०.२
क्रिसिल ०.१
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा