टाटा समूहाच्या काही जुन्या उत्तम कंपन्यांपकी रॅलीज् ही एक नावाजलेली कंपनी. टाटा केमिकल्सची उपकंपनी असल्याने साहजिकच व्यवस्थापन टाटा समूहाकडेच आहे. देशात काही भागात दुष्काळ, खरीप आणि रब्बी पिकातील चढ-उतार, नीलम वादळ इ. कारणामुळे गेले आर्थिक वर्ष कंपनीसाठी तितकेसे चांगले नव्हते. तरी देखील नऊमाहीचे आíथक निष्कर्ष आधीच्या वर्षांतील नऊमाहीच्या तुलनेत खूपच चांगले आहेत. या काळात कंपनीच्या उलाढालीत ११% ने वाढ होऊन ती १,१७३ कोटी रुपयांवर गेली तर नक्त नफ्यातही २१% वाढ होऊन तो १०७.७६ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीच्या विस्तारीकरणाच्या योजनेप्रमाणे गुजरातमधील दहेज येथील कारखाना आता पूर्ण होऊन यंदाच्या आíथक वर्षांत त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. या खेरीज कंपनीकडून अनेक नव्या उत्पादंनांची चाचणी चालू असून त्यातील काही उत्पादने लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. गेल्याच आíथक वर्षांत कंपनीने १० नवीन उत्पादने आणली होती. येणारे आíथक वर्ष कंपनीसाठी उत्तम असेल असे वाटते?
गेल्या काही दिवसात मिड-कॅप शेअर्समध्ये झालेली पडझड पाहता सध्या १२० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला फायदा मिळवून देईल.
रॅलीज इंडिया लिमिटेड
प्रवर्तक टाटा केमिकल्स
सद्य बाजारभाव रु. ११९
प्रमुख उत्पादन खते, कृषी-रसायने
भरणा झालेले भाग भांडवल रु. १९.४४ कोटी
पुस्तकी मूल्य : रु. २८.५० दर्शनी मूल्य : रु. १/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) रु. ५.६
प्राइस अìनग गुणोत्तर (पी/ई) २१.५ पट
मार्केट कॅपिटल : रु. १,१६६ कोटी बीटा : ०.७
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. १६९/ रु. १११
शेअरहोिल्डग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५०.०९
परदेशी गुंतवणूकदार १०.८०
बँका / म्युच्युअल फंडस् ८.९०
सामान्यजन व इतर ३०.२१
पोर्टफोलियो : ब्रॅण्ड टाटाची पुण्याई
टाटा समूहाच्या काही जुन्या उत्तम कंपन्यांपकी रॅलीज् ही एक नावाजलेली कंपनी. टाटा केमिकल्सची उपकंपनी असल्याने साहजिकच व्यवस्थापन टाटा समूहाकडेच आहे. देशात काही भागात दुष्काळ, खरीप आणि रब्बी पिकातील चढ-उतार, नीलम वादळ इ. कारणामुळे गेले आर्थिक वर्ष कंपनीसाठी तितकेसे चांगले नव्हते.
First published on: 08-04-2013 at 12:11 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfolio rallis company brand of tata group