गेल्या वर्षी ज्या कंपन्यांची कामगिरी चांगली नव्हती त्यातील एक कंपनी म्हणजे टाटा केमिकल्स. खरे तर टाटा केमिकल्स ही सोडा अ‍ॅशचे उत्पादन करणारी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी. तसेच भारतीय बाजारपेठेतील मीठ आणि  युरिया व फोस्फेट्सचे उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. कंपनीचे भारताखेरिज युरोप, उत्तर अमेरिका तसेच आशियातील इतरही देशात उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीने नुकतेच लंडनमध्ये सोडा अ‍ॅश आणि कॅल्शियम क्लोराईडचे उत्पादन सुरू केले आहे. गेल्या वर्षी मंदीची झळ लागलेल्या टाटा केमिकल्सचा शेअर बाजारातील कामगिरीवरही परिणाम झाला परिणामी शेयरचा भाव २५% घसरला. यंदाच्या सहमाहीतही कंपनीची कामगिरी फारशी आकर्षक नसली तरीही उत्पादनांच्या चांगल्या मागणीमुळे २०१४-१५ मध्ये कंपनी उत्तम कामगिरी करून दाखविल अशी आशा आहे. सध्या तेजोमय असलेली रॅलीज इंडिया ही टाटा केमिकल्सची उप कंपनी आहे, हे ही गुंतवणुकदारांनी ध्यानात घेतले तर हा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटेल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने यंदा बाजारात आणलेली आय शक्ती उत्पादने. सध्या भारतीय बाजारपेठेत या उत्पादनाना चांगली मागणी असून पुढील वर्षीही कंपनी अजून उत्पादने बाजारात आणेल अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा