पोर्टफोलियोमध्ये वित्तीय कंपनी असावी की नाही या बाबतीत भिन्न मते आहेत. परंतु जेव्हा आपण परिपूर्ण पोर्टफोलियो म्हणतो तेव्हा त्यामध्ये शक्यतो सर्वच क्षेत्रांचा समावेश असावा असे वाटते. पोर्टफोलियोसाठी वित्तीय कंपनी निवडताना मात्र थोडा जास्तच रिसर्च आवश्यक आहे. कारण उत्तम वित्तीय कंपन्या तशा अभावानेच आढळतात. सुंदरम फायनान्स ही टीव्हीएस समूहाची आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असून हायर परचेस, वाहन कर्जे, लिजिंग इ. व्यवसायात ती कार्यरत आहे. गेले दशकभर वार्षकि १७% सरासरी वाढीने उत्तम आर्थिक कामगिरी तिने करून दाखवली आहे. कुठल्याही वित्तीय कंपनीसाठी सर्वात महत्वाचे असते ते अॅसेट क्वालिटी. गेले काही वष्रे सातत्य दाखवणाऱ्या या कंपनीचे कर्जथकीताचे प्रमाण- एनपीए २% पेक्षाही कमी आहे. त्यामुळेच कंपनीचे पतमापन आणि मूल्यांकनही उत्तम दर्जाचे आहे. गेल्याच वर्षी एकास एक प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप करून कंपनीने भागधारकांना सुखद धक्का दिला होता. ३१ डिसेंबर २०१२ अखेर तिमाहीत सुंदरमने नक्त नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५% वाढ नोंदविली आहे आणि नक्त नफा ११३.६५ कोटी रुपयांवर गेला आहे तर कंपनीच्या ठेवीतही वाढ होऊन आता त्या रु. १४०० कोटींवर गेल्या आहेत. नुकतेच जाहीर झालेले रिझव्र्ह बँकेचे पतधोरण सुंदरमच्या पथ्यावर पडेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची इतर सहयोगी कंपन्यातील गुंतवणूक. ‘सुंदरम बीएनपी परिबा’मध्ये ५०.१%, रॉयल सुंदरम जनरल इन्श्युरन्समध्ये ४९.५% आणि सुंदरम होम फायनान्समध्ये ५०.१% अशी मोठी गुंतवणूक सुंदरम फायनान्सने या कंपन्यांमध्ये केली आहे. या तिन्ही कंपन्या शेअर बाजारावर नोंद झालेल्या नसल्या तरीही येत्या काही वर्षांतच यातील निर्गुतवणूक कंपनीला प्रचंड फायदा मिळवून देईल. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुंदरम फायनान्स आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय वाटतो.
सुंदरम फायनान्स लिमिटेड
प्रवर्तक टीव्हीएस समूह
सद्य बाजारभाव रु. ४६७.८५
प्रमुख व्यवसाय बँकेत्तर वित्तीय सेवा
भरणा झालेले भाग भांडवल रु. १११.१० कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा ३७.८० %
पुस्तकी मूल्य : रु. १६१ दर्शनी मूल्य : रु. १०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) रु. ३७.६७
प्राइस अìनग गुणोत्तर (पी/ई) १३ पट
मार्केट कॅपिटलायझेशन रु. ५,३५० कोटी
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ५६० / रु. २९०
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३७.८०
परदेशी गुंतवणूकदार ४.१३
बँका / म्युच्युअल फंडस् ९.०५
सामान्यजन व इतर ४९.०२
पोर्टफोलियो : पोर्टफोलियोचा वित्तीय घटक
पोर्टफोलियोमध्ये वित्तीय कंपनी असावी की नाही या बाबतीत भिन्न मते आहेत. परंतु जेव्हा आपण परिपूर्ण पोर्टफोलियो म्हणतो तेव्हा त्यामध्ये शक्यतो सर्वच क्षेत्रांचा समावेश असावा असे वाटते. पोर्टफोलियोसाठी वित्तीय कंपनी निवडताना मात्र थोडा जास्तच रिसर्च आवश्यक आहे.
First published on: 11-02-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfoliofinancial part of finance