२०१५ चे अध्रे वर्ष संपले. नवीन सरकारचे नाविन्य ओसरू लागले असून गुंतवणूकदारांना घोषणापूर्तीची आस लागली आहे. त्यातच जागतिक मंदीबरोबरच देशांतर्गत गोंधळ वाढत चाललेला आहे. केवळ व्याज दर कपात करून आणि मॅट रद्द करून उद्योग धंद्यातील मंदी आवाक्यात येणार नाही. याचाच साहजिक परिणाम शेअर बाजारावरदेखील झालेला दिसतो. मोजके शेअर्स सोडले तर शेअर बाजारात मंदीचेच सावट दिसते. बँकिंग क्षेत्र, स्थावर मालमत्ता, पायाभूत सेवा आणि माहिती तंत्रज्ञान मंदीच्या दिशेने जाते की काय असे वाटू लागले आहे. नुकतेच मूडीज या आíथक विश्लेषण संस्थेने भारताचे गुंतवणूक मानांकन कमी केले आहे. चीनमधील मंदीचे सावट, ग्रीसची अर्थव्यवस्था, रिजव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केलेले जागतिक मंदीचे भाकीत आणि आता दुष्काळाचे सावट अशा अनेक टांगत्या तलवारी शेअर बाजाराची दिशा ठरवणाऱ्या असल्या तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मात्र तेजीचा माहोल कायम राहील, अशी अजूनही आशा आहे. अर्थात या अनिश्चित काळात शेअर बाजार खूपच दोलयमान राहील. अशा वेळी संधी मिळताच उत्तम कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे धोरण ठेवावे. चांगल्या कंपन्यांतील दीर्घ कालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते, हे आपण अनुभवले आहेच.
सध्या शेअर बाजारात काय घ्यावे यापेक्षा कुठले शेअर्स घेऊ नयेत ते समजणे महत्वाचे आहे. बँकिंग, स्टील, खाण या उद्योगातील शेअर्स मंदीमुळे खूपच खालच्या पातळीवर उपलब्ध आहेत. मात्र ज्या गुंतवणूकदारांची किमान ३-४ वष्रे थांबायची तयारी असेल किंवा ज्यांना धोका पत्करायचा असेल त्यांनीच इथे गुंतवणूक करावी. या खेरिज स्थावर मालमत्ता, पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक टाळावी. खरे तर शेअर्समधील गुंतवणूक ही नेहमीच दीर्घ कालावधीसाठी असते. त्यामुळे या स्तंभातून सुचवलेले काही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स सध्या तितकेसे फायद्यात दिसत नसले तरीही ते दीर्घ काळासाठी राखून ठेवावेत किंवा खरेदी करावेत. वाचकांच्या सोयीसाठी माझा पर्याय मी सुचवलेला आहेच.
stocksandwealth@gmail.com
(लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा