जानेवारी महिन्याच्या अतिथी विश्लेषक जीईपीएल कॅपिटलच्या दिशा हजारी या ‘बँकिंग’ क्षेत्राविषयी सकारात्मक आहेत आणि त्यांनी पाच बँकांविषयी विवेचन केले आहे. येस बँक आणि अॅक्सिस बँक या नव्या पिढीच्या बँकांनंतर आजच्या भागात जनमानसात रूळलेल्या सार्वजनिक बँकांविषयी..
पंजाब नॅशनल बँक :
स्टेट बँकेनंतरची सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बँक असलेली ही बँक अनुत्पादित कर्जाच्या दबावाने काहीशी झुकली आहे. परंतु चालू आíथक वर्षांचे अर्धवार्षकि निकाल पाहिले तर ‘कासा’मध्ये तब्बल ४% वाढ होत ४०.७% झाले आहे. अनुत्पादित व पुनर्रचित कर्जापोटी तरतूद जरी वाढली तरी ठोक अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ५.१% तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे ३.०७% झाले आहे. ‘पीई’ व ‘प्राईस टू बुक व्हॅल्यू’ या निकषांवर सर्वात स्वस्त असलेला हा समभाग आपल्या गुंतवणुकीचा भाग असायला हवा.
स्टेट बँक :
स्टेट बँक वगळून पोर्टफोलियो पूर्णत्वाला जात नाही. बँक निफ्टीतील सर्वात प्रभावी घटक व मागील तिमाही निकालात व्याजाच्या उत्पन्नात १२% झालेली वाढ, नवीन पुनर्रचित कर्जामध्ये ३९% झालेली घट ही या गुंतवणूक करण्यामागील कारणे आहेत. तिसऱ्या तिमाही निकालात चढय़ा व्याजदरामुळे रोख्यांच्या किंमतीत झालेली घट व रुपयाच्या अवमूल्यानामुळे नफा क्षमता कमी झालेली दिसू शकते. आत्ताच नव्हे तर जेव्हा बाजारात सोयीची वेळ पाहून जरूर खरेदी करावा असा हा शेअर आहे.
पंजाब नॅशनल बँक :
जानेवारी महिन्याच्या अतिथी विश्लेषक जीईपीएल कॅपिटलच्या दिशा हजारी या ‘बँकिंग’ क्षेत्राविषयी सकारात्मक आहेत आणि त्यांनी पाच बँकांविषयी विवेचन केले आहे.
First published on: 20-01-2014 at 07:40 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab national bank and sbi