av-04
वर्ष २०१५ चे पहिले तीन महिने संपले आणि आता नवीन आíथक वर्षांला सुरुवात झाली. गेल्या वर्षी  गुंतवणूकदारांना ‘अच्छे दिन येणार’ असं वाटायला लागलं होतं. नवीन सरकार सत्तेवर येण्या आधीपासूनच त्याची चाहूल लागली होती. काही चाणाक्ष गुंतवणूकदारांनी त्यामुळे त्याच वेळी म्हणजे साधारण मार्च- एप्रिल मध्ये शेअर बाजारात प्रवेश घेऊन गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि थोड्याच कालावधीत भरपूर फायदा कमावून घेतला. यंदा मात्र कच्च्या तेलाच्या किमती गडगडून अगदी ४० डॉलपर्यंत उतरल्या, परिणामी महागाई नियंत्रणात आली, रिझर्व बँकेने दोनदा रेपो दरात कपात केली. यंदा अर्थसंकल्पदेखील बाजारानुकूल जाहीर झाला. मात्र तरीही शेअर बाजारात अपेक्षित तेजी दिसली नाही. मोजके शेअर्स सोडले तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये विशेष वाढ झाली नाही. बँकिंग क्षेत्र तर मंदीच्या दिशेने जातेय की काय असे वाटू लागले आहे. इंजिनीयिरग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तेजी दिसून आली असली तरीही ही तेजी किती काळ राहील याची शाश्वती नाही. युरोपीय महासंघातील देशांमध्ये मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला स्फुरण देण्यासाठी क्यूई (Quantitative Easing),  चीनमधील मंदीचे सावट, ग्रीसची अर्थव्यवस्था आणि अमेरिकची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हची संभाव्य व्याज दरातील वाढ अशा अनेक टांगत्या तलवारी शेअर बाजाराची दिशा ठरवत आहेत, ठरविणार आहेत. असे असले तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मात्र तेजीचा माहोल कायम राहील अशी आशा आहे. चांगल्या कंपन्यांतील दीर्घकालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते हे आपण अनुभवले आहेच. वानगीदाखल याच स्तंभातून दोन- तीन वर्षांपूर्वी सुचवलेल्या काही शेअर्सनी गुंतवणूकदार आणि वाचकांना किती फायदा करून दिला आहे  ते खलील तक्त्यातून पाहता येईल.

वर्षांच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यंदा आपण शक्यतो लार्ज कॅप शेअर्स पोर्टफोलियोसाठी निवडले आहेत. अशा शेयर्सना तेजी मंदीचा विशेष फरक पडत नाही. मात्र स्मॉल कॅप किंवा मिड कॅप प्रमाणे हे शेअर्स मोठा फायदाही देत नाहीत. अशा शेअर्समधील गुंतवणूक ही नेहमीच दीर्घ कालावधीसाठी असते. त्यामुळे हे शेअर्स सध्या तितकेसे फायद्यात दिसत नसले तरीही ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी सुचवली असल्याने हे शेअर्स राखून ठेवावेत. वाचकांच्या सोयीसाठी माझा पर्याय मी सुचवलेला आहेच.
stocksandwealth@gmail.co
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातलगांची प्रस्तुत लेखात सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने मानधन घेतलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा