प्रश्न: मी एक निवृत्त नागरिक आहे. माझे वय ६४ वष्रे आहे. निवृत्तीनंतर मिळालेले पसे मी सहकारी बँकेच्या मुदत ठेवीत आणि सूचीबद्ध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतविले आहेत. या शिवाय मी सहकारी बँकेचा सभासद आहे. मला सहकारी बँकेकडून आणि कंपन्यांकडून लाभांश मिळातो. माझे अंदाजित उत्पन्न २०१४-१५ या आíथक वर्षांत पुढीलप्रमाणे आहे. मला कोणते उत्पन्न करपात्र आहे ते सांगावे आणि त्यावर मला कर किती भरावा लागेल? बँकेतील ठेवीतून व्याज २,९०,००० रुपये, कंपन्यांकडून मिळणारा लाभांश २०,००० रुपये, सहकारी बँकेतून मिळणारा लाभांश ३२,००० रुपये, बचत खात्यावरील व्याज १५,००० रुपये. शेअर्स विक्रीतून झालेला दीर्घ मुदतीचा नफा १२,००० रुपये आणि अल्पमुदतीचा नफा २५,००० रुपये. मी एका शैक्षणिक संस्थेला १०,००० रुपयांची देणगी दिलेली आहे आणि त्यांनी मला कलम ‘८० जी’ चे प्रमाणपत्र दिले आहे.
एक वाचक
उत्तर: बँकेतील ठेवीतून मिळालेले व्याज हे करपात्र आहे. कंपन्यांकडून मिळालेला लाभांश हा करमुक्त आहे. सहकारी बँकेतून मिळालेला लाभांश मात्र करपात्र आहे. बचत खात्यावरील व्याज करपात्र असून त्यावर १०,००० रुपयांची सूट मिळते. शेअर्स विक्रीतून झालेला दीर्घ मुदतीचा नफा करमुक्त आहे (जर का शेअर बाजारामार्फत विक्री व्यवहार झाला असेल आणि त्यावर रोखे विनिमय कर (एसटीटी) भरला असेल तर), शेअर्स विक्रीतून झालेला अल्पमुदतीचा नफा करपात्र आहे. त्यावर कमी दराने कर भरावा लागतो (जर का शेअर बाजारामार्फत विक्री व्यवहार झाला असेल आणि त्यावर रोखे विनिमय कर (एसटीटी) भरला असेल तर). एकंदरीत आपल्याला भरावा लागणारा कर खालील प्रमाणे :
वाचक प्रश्न
मी एक निवृत्त नागरिक आहे. माझे वय ६४ वष्रे आहे. निवृत्तीनंतर मिळालेले पसे मी सहकारी बँकेच्या मुदत ठेवीत आणि सूचीबद्ध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतविले आहेत.
First published on: 17-11-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers question