सरकारी ‘मिनी रत्न’ म्हणून मान मिळालेल्या या कंपनीला १४५ वर्षांचा इतिहास आहे. १ फेब्रुवारी १८६७ मध्ये जॉर्ज बामर आणि अलेक्झांडर लॉरी या दोघांनी कोलकाता येथे भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. आज सुमारे रु. २४०० कोटींहून अधिक उलाढाल असलेली ही कंपनी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कारखान्यासाठी पॅकेजिंगपासून अगदी ट्रॅव्हल आणि लॉजिस्टिक्सपर्यंत कंपनीची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. परंतु केवळ ‘कोलकाता फॅक्टर’मुळे कंपनीच्या चांगल्या कामगिरीचे प्रत्यंतर तिच्या शेअरच्या भावात दिसून येत नाही. सध्या भावाने उच्च पातळी गाठली असली तरीही हा शेअर प्रत्येक खालच्या पातळीवर खरेदी करून आपल्या पोर्टफोलियोचा हिस्सा बनेल असा प्रयत्न असायला हवा. यंदाच्या सहामाहीत कंपनीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करून ३४.४८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांकरिता २८०% लाभांश देणाऱ्या या कंपनीकडून येत्या आर्थिक वर्षांत किमान ३००% लाभांशाची अपेक्षा करायला हरकत नाही. सध्या कुणाच्या विशेष नजरेत नसलेला हा शेअर एक दिवस १००० रुपयाची पातळी गाठणार हे नक्कीच!    
बामर लॉरी अ‍ॅण्ड कं. लि.       रु. ६७९
मुख्य प्रवर्तक     :    भारत सरकार
मुख्य व्यवसाय     :    पॅकेजिंग, वंगण, रसायनांचे उत्पादन व लॉजिस्टिक्स
भरणा झालेले भागभांडवल     :    रु. १६.२९ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ६१.८० %
दर्शनी मूल्य     :     रु. १०    
पुस्तकी मूल्य     :     रु. ३८०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)    :    रु. ८८.५२
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    ७.४  पट
वर्षभरातील उच्चांक/नीचांक  :   रु. ६९२/४६३

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा