जानेवारी ते डिसेंबर २०१३ या कालावधीत डॉलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युल फंड योजनांनी आजवरचा सर्वाधिक वार्षकि परतावा दिला आहे. डीएसपी ब्लँकरॉक युएस फ्लेक्झी कॅप इक्विटी फंड हा फक्त १३१ कोटींचे व्यवस्थापन पाहणारा फंडाने ४१.६०% परतावा दिला आहे. तर याच म्युच्युअल फंड घराण्याचा डीएसपी ब्लँकरॉक अॅग्रिकल्चर फंडाने १४% परतावा दिला आहे.
मागील वर्ष भरात अनेक फंड घराण्यांनी डॉलर मध्येगुंतवणूक करणाऱ्या अनेक योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिल्या. ‘व्हॅल्यू रिसर्च’ या म्युच्युअल फंडांची पत ठरविणाऱ्या कंपनीच्या धीरेन्द्र कुमार यांच्या मते, सर्वच डॉलरमधील मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांची कामगिरी अव्वल ठरलेली नाही. मागील वर्षी रुपया अवमुल्यनाचा फायदा या योजनांना मिळाला हे प्रमुख कारण आहे. परंतु निव्वळ अवमूल्यन नव्हे तर योजनांची गुंतवणूक नक्की कुठे आहे. हे ही महत्वाचे ठरते.
वेगवेगळ्या फंड घराण्यांनी विविध देशातील आíथक बाजारपेठातील मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या योजना आणल्या त्या योजना नक्की कुठे गुंतवणूक करणार आहेत हेही त्यांच्या चांगल्या किंवा वाईट परताव्याचे कारण ठरले आहे. काही योजना केवळ अमेरिकेत गुंतवणूक करणाऱ्या योजनांचा परतावा अमेरिकेसहीत ब्राझील, मॅक्सिको या तीन देशात गुंतवणूक करणाऱ्या योजनांच्या परताव्यापेक्षा खूपच सरस आहे. याची दोन करणे आहेत. पहिले – एसएनपी ५०० या निर्देशांकाने मागील अर्ध शतकातील सर्वोच्च कामगिरी केली हे आहेच; परंतु डॉलर ही डॉलर इंडेक्समध्ये सर्वाधिक वधारलेले चलन आहे. ‘ज्या भारतीय गुंतवणूकदारांनी अशा फंडात गुंतवणूक केली त्यांनातर स्वप्नवत परतावा मिळाला..’ गुंतवणूक विश्लेषक मििलद अंधृटकर म्हणतात, ‘फ्रॅकलीन टेम्पलटन युएस अपॉच्र्युनिटी फंडाने मागील वर्षभरात ५५.२४% तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्सपोर्ट अॅन्ड अदर सíव्हसेस फंडाचा मागील वर्षभराचा परतावा ४३% आहे.’ अंधृटकर म्हणाले, ‘कोणत्याही योजनेचा परतावात योजनेचा निधी कुठे गुंतविला जातो हे पाहणे आवशयक आहे. या सर्व योजना फंड ऑफ फंड्स प्रकारच्या योजना आहेत. म्हणजे भारतात जमा झालेला निधी एखाद्या परदेशात गुंतवणूक करणाऱ्या योजनेच्या युनिटमध्ये गुंतविला जातो. जसे, फ्रॅकलीन टेम्पलटन युएस अपॉच्र्युनिटी फंड हा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे तर फ्रॅकलीन टेम्पलटन फ्रॅकलीन युएस अपॉच्र्युनिटी फंड व डीएसपी ब्लँकरॉक वल्ड एनर्जी फंड हे दोन्ही कमोडीटी फंड आहेत.
या फंड संकल्पनेतील दोन फंड घराण्यांनी नवीन पर्याय उपलबद्ध करून दिले आहेत. पाईनब्रिज इंडिया या म्युच्युअल फंड घराण्याने पाईनब्रिज इंडिया युएस इक्विटी फंड ही योजनेची डिसेंबर महिन्यात प्राथमिक युनिसचे वाटप पूर्ण करून आता हा फंड पुन:र्खरेदीत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. तर रेलीगेर इंव्हेस्को या फंड घराण्याच्या रेलीगेर इंव्हेस्को पॅन युरोप फंड या योजनेची प्राथमिक विक्री २९ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. युरोपच्या मध्यवर्ती बँकेच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहनात्मक धोरणांना सदस्य देशांच्या सरकारांनी दिलेली साथ पाहता युरोपची अर्थव्यवस्था वेग पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील गुंतवणूकदार युरोपमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधीच्या शोधात आहेत. या संधीचा लाभ भारतीय गुंतवणूकदरांना घेता यावा यासाठी रेलीगेर इंव्हेस्को पॅन युरोप फंड ही योजना आहे.
पाईनब्रिज इंडिया युएस इक्विटी फंड या योजनेचे निधी व्यवस्थापक विक्रांत मेहता म्हणाले, ‘भारतात रुपया परिवर्तनीय नाही. दोन वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम डॉलरमध्ये खर्च करायचा तुमचा विचार आहे आणि तुम्ही रुपयाच्या डॉलरबरोबरच्या विनिमय दरात वाढ अपेक्षित आहात म्हणून आज तुम्ही डॉलर खरेदी करून ठेवण्याचा तुमचा विचार असेल तर इथल्या कायद्यामुळे शक्य नाही. डॉलर खरेदी करताना रिझव्र्ह बँकेला डॉलर खरेदी करण्यामागची करणे देणे आवश्यक आहे. आधी दोन वर्षांपासून तुम्ही नुसते रोख डॉलर खरेदी करून ठेऊ शाणार नाही. अशा वेळी डॉलर मध्ये गुंतवणूक करणऱ्या योजनेत तुम्ही गुंतवणूक केलीत की आपोआप तुम्हाला असलेली विनिमयदाराची झळ कमी करता येऊ शकेल.’
डीएसपी ब्लँकरॉकचे विक्री विभाग प्रमुख असेलेल्या अजित मेनन यांच्या मते, डीएसपी ब्लॅकरॉक फंड घराण्याकडे असलेले कौशल्य, अंतरराष्ट्रीय अनुभव याच्या जोरावर हे फंड विकसित केले आहेत. योग्य वेळी योग्य फंडाचा उपयोग करण्यासाठी अशी उत्पादने समजून घेता यायला हवीत.
म्युच्युअल फंड विश्लेषक अतुल कोतकर यांच्या मते, गुंतवणूक साधनाचे प्राथमिक व दुय्यम असे दोन प्रकार आहेत. रुपया व्यतिरिक्त चलनात गुंतवणूक करणाऱ्या योजना या दुय्यम प्रकारच्या योजना आहेत. तुमच्या गुंतवणुकीत रुपया हे प्राथमिक चलन असलेल्या योजना ८०% असावे तर डॉलर युरो व येन ही ज्या योजनांची प्राथमिक चलने आहेत अशा योजना २०% असाव्यात. २००८ ते २०१२ या कालावाधीत डॉलरची अन्य चलनाच्या तुलनेत घसरणच होत होती. अशा वेळी डॉलरमध्ये मालमत्ता असणाऱ्या योजनांचा परतावा नकारात्मकच होता. समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशात शिकायला जाणार असेल तर दोन तीन वष्रे आधीपासून अशा योजनात गुंतवणूक करावी. म्हणजे मे ते सप्टेंबर २०१३ या काळात अनपेक्षित रुपयाची घसरण झाली आणि अभ्यासक्रम सुरु होण्याच्या तोंडावर अनेकांची तारांबळ उडाली तशी उडणार नाही. परंतु प्रदीर्घ काळ आधीपासून अशा योजनांचा आधार घेऊ नये.