दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षांत सेन्सेक्स, मागील वर्षीचा उच्चांक मोडीत आला होता. १९७९ पासून २००८ पर्यंत ३४ वर्षे दर चार वर्षे सुरू असलेला हा क्रम सरलेल्या २०१२ सालाने मोडून काढला. तरी विद्यमान वर्षांत सेन्सेक्सच्या प्रवासाच्या चार शक्यता सांगणारा लेख..
१९२९-३०च्या महामंदीनंतर आजवर जगातील शेअर बाजारांमध्ये दर चार ते साडेचार वर्षांत एक तेजी आणि एक मंदीचे आवर्तन सुरू असल्याचे दिसले आहे. परंतु या विश्लेषणात कोठेही ‘लीप’ वर्षांचा संदर्भ असल्याचे स्पष्ट दिसत नाही. भारतात बीएसई सेन्सेक्सने मात्र १९८० सालापासून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आणली आहे.
१ जानेवारी १९८६ पासून अस्तित्वात आलेला बीएसई सेन्सेक्स भारतीय शेअर बाजाराचा मापदंड म्हणून सर्वश्रूत आहे. १९७८-७९ मधील किंमती आधारभूत धरून महत्त्वाच्या सर्व उद्योगांना योग्य ते महत्व देत ३० कंपन्यांचा (बाजार मूल्यावर आधारीत) सेन्सेक्स गेली ३४ वष्रे एक विशिष्ट प्रारूप दर्शवीत होता, परंतु ३१ डिसेंबर २०१२ रोजी हे चित्र बदलताना दिसले आहे.
दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षांत सेन्सेक्स, मागील वर्षीचा उच्चांक मोडीत आला होता. १९७९मध्ये १३१.५९पर्यंत पोहचलेला सेन्सेक्स, १९८० या लीप वर्षांत १४८.१५ वर पोहचला, तर १९८३ मध्ये २५२.९२ अंशांवर असलेला उच्चांक १९८४ या लीप वर्षांत २८०.२० झाला. लीप वर्ष आणि बीएसई सेन्सेक्सच्या उच्चांकांचे नाते दाखविणाऱ्या तक्त्याप्रमाणे हीच घटना २००८ पर्यंत दर चार वर्षांनी पुन्हा पुन्हा घडताना दिसत होती, परंतु २०११ मधील २०,६६४.८० हा उच्चांक मात्र ३१ डिसेंबर २०१२ अखेर अबाधित राहून सेन्सेक्स प्रत्यक्षात १९,४२६.७१ अंशांवर बंद झालेला दिसत आहे.
या घटनेचा काय अर्थ लावायचा किंवा हा एक योगायोग म्हणून सोडून द्यायचे हे ठरवण्याइतपत संशोधन आजपर्यंत झालेले नाही. परंतु ३१ डिसेंबर २०१३ आणि पुढे येणाऱ्या लीप वर्षांनंतर मात्र काही निष्कर्ष काढता येतो का ते आपण सर्वानी पडताळून पाहणे गरजेचे आहे.
‘Technical analysis deals in probabilities, never certainties’ – या नियमानुसार २०१३-१४ मधील (सोबतच्या आलेखात दाखविल्याप्रमाणे दीर्घ मुदतीचा विचार केल्यास) बीएसई सेन्सेक्सचे विश्लेषण खालील तीन शक्यता दर्शविते:
१. सेन्सेक्स २१,११० आणि १५,००० या दरम्यान घुटमळत राहू शकतो. गेली तीन वर्षे सेन्सेक्स याच दरम्यान राहिल्यामुळे आणखी काही काळ परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. २१,११० ची पातळी सेन्सेक्सच्या दृष्टीने महत्वाची असेल. कोणत्याही महिनाअखेरीस २१,११०च्या वर बंद झालेला सेन्सेक्स २६,५०० ते २७,००० पर्यंतची मजल मारू शकेल.
३. परंतु तिसरी शक्यता सेन्सेक्स २१,११० च्या वर बंद न होता कोणत्याही महिनाअखेरीस १५,००० पेक्षाही खाली बंद होण्याची आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांच्या दृष्टीने प्रवेशासाठी ती एक सुवर्णसंधीच असेल. कारण या पडझडीमुळे २६,५०० ते २७,००० हे सेन्सेक्सचे उद्दिष्ट जरी काही काळ पुढे गेले तरी ते टळणार निश्चितच नाही. बाजाराची आजची तसेच येणाऱ्या काळातील स्थिती पाहता, तांत्रिकदृष्टय़ा खालील काही कंपन्यांवर लक्ष ठेऊन तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणे योग्य ठरेल असे वाटते.
गुंतवणूकदारांनो, या कंपन्यांवर लक्ष ठेवा..
एसकेएस मायक्रो फायनान्स
सद्य बंद भाव रु. १७१.९०
पहिले लक्ष्य रु. ५६०
दुसरे लक्ष्य रु. १०४०
तंत्र-विश्लेषण : ‘लीप इयर’ प्रघाताला ३४ वर्षांनंतर धक्का!
दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षांत सेन्सेक्स, मागील वर्षीचा उच्चांक मोडीत आला होता. १९७९ पासून २००८ पर्यंत ३४ वर्षे दर चार वर्षे सुरू असलेला हा क्रम सरलेल्या २०१२ सालाने मोडून काढला. तरी विद्यमान वर्षांत सेन्सेक्सच्या प्रवासाच्या चार शक्यता सांगणारा लेख..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sansex journey in leap year