विद्यमान २०१३ सालाचे पहिले सहा महिने तरी शेअर बाजारासाठी चांगले गेलेले नाहीत. जागतिक बाजारातील मंदीखेरीज देशांतर्गत समस्या जसे रुपयाची घसरगुंडी, चालू खात्यातील वाढती तूट आणि घटते सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी), चलनवाढ वगैरे. त्यातच भरीला आटत चाललेली परकीय गुंतवणूक. या सर्वच कारणांचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम झाला, होत आहे. सुरुवातीला यंदाचे वर्ष शेअर बाजारासाठी उत्तम असणार असे भाकीत करणारे अर्थतज्ज्ञदेखील आता शेअर बाजाराचा निर्देशांक आहे त्या पातळीवर टिकू दे अशी प्रार्थना करीत आहेत.
गेल्या वर्षी याचा स्तंभातून आपण बहुतांशी एसएमई कंपन्या गुंतवणुकीसाठी सुचविल्या होत्या. यंदा मात्र आपण ‘लार्ज कॅप’वर जास्त भर दिला होता. तसेच २०१३ मधील सर्वच कंपन्या मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक म्हणून सुचविलेल्या आहेत. त्यामुळे पुढे दिलेल्या तक्त्यात सुचविलेल्या शेअर्सची आज काय परिस्थिती आहे ते सहज कळून येईल. अपोलो हॉस्पिटल्स, ल्युपिन आणि सुंदरम फायनान्स या तीन कंपन्यांची कामगिरी सर्वोत्तम झालेली दिसते. सर्वात जास्त नुकसान सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांतील गुंतवणुकीत झालेले आहे. मात्र या गटातील एनएमडीसीमध्ये अजून भाव कमी होण्याची शक्यता नसल्याने तो आता (आणखी) खरेदीसाठी आकर्षक वाटतो. पॉवर फायनान्सदेखील सद्य भावात अजून खरेदी करायला काहीच हरकत नाही. बाकी सर्वच शेअर्स आणखी काही काळ राखून ठेवावेत आणि योग्यवेळी तुमचे भाव-लक्ष्य गाठल्यावर विकून टाकावेत.
यंदाही गुंतवणुकीवरील परताव्यासाठी ‘आयआयआर फॉम्र्युला’ वापरला आहे. सहा महिने तेही सद्य वादळी वध-घटीच्या बाजारात, पोर्टफोलियोच्या कामगिरीच्या मापनाचा खूपच थोडका कालावधी निश्चितच आहे. त्यातही सहा महिन्यांपूर्वी एक साथ, तर आठवडय़ाला एक अशा तऱ्हेने सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने ही खरेदी झाली आहे. तरी यातून ‘आयआयआर फॉम्र्युला’ वापरूनन पुढे येणारे चित्र बघितले तर, सेन्सेक्सचा वार्षिकीकृत परतावा हा या कालावधीत उणे २.०९% तर आपल्या पोर्टफोलियोचा परतावा तुलनेने सरस म्हणजे ४.७६% असा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा