दी फायनान्शियल एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या संपादकपदी श्यामल मजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थविषयक पत्रकारितेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असलेले मजुमदार भारतीय अर्थव्यवस्थेचे नि:पक्ष अभ्यासक आहेत. यापूर्वीही मजुमदार यांनी एक्स्प्रेस समूहामध्ये अनेक वर्ष काम केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक व महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, देशांतर्गत राजकारण व जागतिक तणावसदृश्य परिस्थितीत मजुमदार पुन्हा एक्स्प्रेस समूहात १५ फेब्रुवारीपासून रुजू झाले आहेत. अशा वेळी त्यांच्या ज्ञानाचा फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वाचकांना चांगलाच लाभ होईल.

भारतातील पहिले अर्थविषयक वृत्तपत्र!

१९६१ साली सुरू झालेले फायनान्शियल एक्स्प्रेस भारतातील पहिले अर्थविषयक वृत्तपत्र असून भारतातील सर्वात मोठ्या अर्थविषयक वृत्तपत्र व न्यूज पोर्टलपैकी एक आहे. इंडियन एक्स्प्रेस समूह हा भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल न्यूज ग्रुपपैकी एक असून दर महिन्याला सुमारे २० कोटी वाचक जोडले गेले आहेत. या समुहाअंतर्गत दी इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता, जनसत्ता, लोकप्रभा, ieMalayalam, ieBangla आणि ieTamil प्रकाशित होतात.