कंपनीची शनिवार-रविवारची विक्री सरासरीपेक्षा अधिक असली तरी आठवडय़ातील कामकाजाच्या दिवशी विक्री वाढण्यासाठी कंपनीला प्रामुख्याने व्यावसायिक कामाने येणाऱ्या ग्राहकांवर अवलंबून राहावे लागते. या ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी सूट किंवा सवलती द्याव्या लागतात. सध्या कमी होत असलेल्या महागाईच्या दरामुळे कंपनीच्या कच्च्या मालाच्या (अन्नधान्याच्या) दरात घट झाल्याने कंपनीच्या नफाक्षमतेत वाढ होणे अपेक्षित आहे. वर्षांच्या उर्वरित काळात कंपनीने मेनलँड चायनाची सहा ते सात नवीन उपाहारगृहे उघडणे निश्चित केले आहे, तर ‘मेनलँड चायना आशिया’ या नाममुद्रेने दक्षिण आशियाई देशात आठ उपाहारगृहे सुरू करण्याचे योजिले आहे. ‘ओह! कलकत्ता’, ‘मचाण’, ‘सिगरी ग्लोबल ग्रील’ अन्य नाममुद्रांचीही प्रत्येकी तीन ते चार उपाहारगृहांची भर पडणार आहे. संख्येने वाढलेली उपाहारगृहे व कमी झालेल्या महागाईमुळे कंपनीची नफाक्षमता चार ते साडेचार टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे.
तरुणांची बहुसंख्या असलेल्या देशात शनिवार-रविवारी बाहेर जेवण घेणे अशा रूळलेल्या सवयी कंपनीच्या व्यवसायवृद्धीच्या पथ्यावर पडणार आहेत. म्हणून आपल्या गुंतवणुकीत स्पेशालिटी रेस्टॉरंट्सला स्थान हवे, अशी शिफारस आम्ही आमच्या ग्राहकांना करीत आहोत.
तरुणाईची जिव्हातृप्ती!
स्पेशालिटी रेस्टॉरंटस लिमिटेड ही कंपनी ‘मेनलँड चायना’, ‘ओह! कलकत्ता’, ‘मचाण’, ‘सिगरी ग्लोबल ग्रील’ या नाममुद्रांसहित एकूण १२ नाममुद्रांनी लोकप्रिय उपाहारगृहांची शृंखला चालविते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-12-2014 at 10:03 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speciality restaurants ltd shares