नाटकातल्या माधवपुढे दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग प्रेक्षकांनी करमणूक म्हणून पाहिले असतील. आपल्या या लेखातील माधव सुद्धा गोंधळात पडलाय..या माधवाला इकडे जाऊ का तिकडे जाऊ असा पेच पडला आहे. एसएसए? की पीपीएफ? पण हे दोन संक्षिप्त शब्द म्हणजे दोन महिलांच्या पूर्ण नावातील अद्याक्षरांचे संक्षिप्त स्वरूप नसून सुकन्या समृद्धी खाते (एसएसए) आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) या दोन गुंतवणूक योजनांच्या नावांचे संक्षिप्त रूप आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्र्यांनी सुकन्या समृद्धी योजना जाहीर केली. ही योजना जाहीर झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी या योजनेची पब्लिक प्रोव्हिडंट फंड या योजनेबरोबर तुलना करायला सुरवात केली. माधवही या दोन योजनांपकी कोणती योजना घ्यावी? या विचारात पडला होता. त्याच्या मनातील संभ्रम दूर करण्याच्या हेतूने त्याच्यापुढे दोन्ही योजनांची वैशिष्टय़े (खालील दिलेला तक्ता पाहावा) समोर ठेवली.

खरं पाहायला गेलं तर या दोन्ही योजनांचा हेतू खूप चांगला आहे. पगारदार नोकरांना पीएफ असतो, इतर काही निवृत्तीपश्चात रकमा मिळण्याची शक्यता असते. जसे पेन्शन, ग्रॅच्युइटी वगरे. पण व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अशा रकमा मिळण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना प्राप्तीकर सवलत मिळावी आणि त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळासाठी तरतूद करता यावी म्हणून पीपीएफ योजना १९६८ साली सुरू झाली. अर्थात व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींबरोबरच पगारदार नोकरसुद्धा ही योजना घेऊ शकतात हा भाग वेगळा. सुकन्या योजनेचा हेतू मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी शिस्तबद्ध बचत करून एक मोठी रक्कम तयार करणे हा आहे आणि तो खूप महत्वाचा आहे.
दोन्ही योजनांमधील साधम्र्याचा विचार केला तर दोन्ही योजना गुंतवणूकदाराला शिस्तबद्ध बचत करायला उत्तेजन देतील अशाच आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही योजना कलम ८० सी नुसार मिळणाऱ्या कर बचतीसाठी उपलब्ध आहेत. पण पुढील काही मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे. हे मुद्दे मांडण्याचा उद्देश सुकन्या योजनेचे महत्त्व कमी करणे हा नसून केवळ काही मुद्यांच्या बाबतीत फरक दर्शविणे हा आहे.
तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गुंतवणूक योजनेमध्ये काही फायदे असतात तर काही उणीवा असतात. सद्य परिस्थितीत दीर्घ मुदतीसाठी बचत करता येतील अशा सुकन्या समृद्धी सारख्या व्याजाची निश्चितता असणाऱ्या योजना  गुंतवणूकदरांसाठी उपलब्द्ध होत आहेत हिच जमेची बाब आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना नियमित बचतीची सवय लागेल हे महत्वाचे. गुंतवणुकीचे अनेक नियम आहेत. त्यामधील एक नियम इथे नमूद करावासा वाटतो. तो असा-  A full range Lunch Plate is always better than just one item. शारीरिक तंदुरुस्ती साठी जसं चौरस आहार आवश्यक आहे तसच आíथक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी चौरस गुंतवणूक आवश्यक आहे. आयुष्य चक्रातील विविध उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी उपलब्द्ध असलेल्या विविध योजनांचा गुंतवणूकदारांनी उपयोग करून घेतला पाहिजे. ती काळाची गरजही आहे.
हाच नियम लक्षात ठेवून माधवला हेच सांगावेसे वाटते कि त्याने या दोन योजनांची तुलना करून मनात गोंधळ निर्माण करण्यापेक्षा आयुष्यचक्रातील विविध उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून दोन्ही योजनांमधे पसे गुंतवावेत. मुलीच्या उज्जवल भवितव्यासाठी यथाशक्ती सुकन्या समृद्धी योजना जरूर घ्यावी. ती घेताना प्राप्तीकर किती वाचतो आहे? प्राप्तीकरमुक्त व्याज आहे कि नाही हा विचार करू नये. आणि व्यक्तिगत प्राप्तीकर नियोजनासाठी आणि १५ वर्षांनंतर मोठं भांडवल तयार करण्यासाठी पीपीएफ मध्येही पसे गुंतवावेत. माधवनेही त्यावर साधक-बाधक विचार केला आणि दोन्ही योजनांची तुलना न करता दोन्ही योजनामध्ये पसे गुंतवण्याचे ठरविले. तुम्हीही तेच कराल ही अपेक्षा !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोखता (Liquidity) :   
पीपीएफ योजनेमध्ये सात वर्षांनंतर काही विशिष्ट प्रमाणात पसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. तेच सुकन्या योजनेमध्ये मुलगी १८ वर्षांची झाली तरच (५० टक्के) पसे काढता येतात.
व्याज:
सुकन्या योजनेमध्ये ९.२०% व्याज मिळते जे पीपीएफ योजनेमध्ये (सध्याच्या ८.७०% प्रतिवार्षकि मिळणाऱ्या) व्याजापेक्षा अधिक आहे. ते करमुक्त आहे की नाही याचा निश्चित खुलासा केंद्रीय महसूल खात्याकडून येणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ९.२०% दराने व्याज सातत्याने मिळेल की नाही याबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही.
मुदत:
सुकन्या योजनेचा एकूण कालावधी २१ वर्ष आहे तर पीपीएफ योजनेचा कालावधी १५ वर्ष (ज्या आíथक वर्षांत खाते उघडले ते आíथक वर्ष संपल्यापासून १५ वर्ष) आहे.
कर्जाची सुविधा :
पीपीएफ योजनेमध्ये काही विशिष्ट तरतुदीनुसार कर्ज मिळू शकते जे सुकन्या योजनेमध्ये मिळू शकत नाही.
नामांकन सुविधा:
सुकन्या योजनेमध्ये नामांकन सुविधा नाही. पीपीएफ योजनेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
लेखक प्राप्तीकर नियोजन सल्लागार
 dattatrayakale9@yahoo.in