राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सर्व निर्देशांकाचे व्यवस्थापन क्रिसिलची उपकंपनी ‘इंडिया इंडेक्स प्रॉडक्ट्स अॅण्ड सव्र्हिसेस’ ही कंपनी पाहते. क्रिसिल ही ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पूअर्स’ची (र&ढ) या जागतिक पतमापन व वित्तीय सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे भारतात प्रतिनिधित्व करते. र&ढ या शब्दाला वित्तीय जगतात मोठा मान आहे. ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पूअर्स’ने अमेरिकेची पत कमी करण्यास कमी केले नव्हते. क्रिसिलच्या संशोधन व सल्लासेवा विभागाने एक अहवाल २७ मे २०१३ रोजी प्रकाशित केला. या अहवालातील निष्कर्ष हे गुंतवणुकीतील प्रस्थापित मापदंडांना छेद देणारे ठरले. ‘दीर्घकालीन गुंतवणुकीत मिड-कॅप हे लार्जकॅपपेक्षा अधिक परतावा देणारे व कमी धोकादायक असतात’ असा निष्कर्ष या अहवालात काढला आहे. या अहवालात ठ्रऋ३८ ट्रूिंस्र् 50 व ठ्रऋ३८ यांच्या तुलनात्मक परताव्याचा तसेच वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या परताव्याच्या जोखमीचा अभ्यास करण्यात आला आहे. (अभ्यासाचे निष्कर्ष सोबतच्या तक्त्यात दिले आहेत.) ज्या परतावा व जोखीम यांच्या अभ्यासाचा वर उल्लेख केला आहे, तो विचार सर्वप्रथम हेन्री मार्कोवीट्झ या अर्थतज्ज्ञाने मांडला. याला ‘मार्कोवीट्झ थेअरी’ असे म्हटले जाते. संख्याशास्त्राचा उपयोग मार्कोवीट्झने शेअर बाजाराचा अभ्यास करण्यासाठी केला. या संशोधनाबद्दल मार्कोवीट्झला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. मर्यादित जोखीम (र८२३ीें३्रू फ्र२‘) घेतल्यास गुंतवणुकीचा परतावा वाढू शकतो. तेव्हा ज्या कोणाला मिड-कॅपमध्ये गुंतवणूक करावीशी वाटत असेल त्यांनी आठही शेअरमध्ये गुंतवणूक करावी. एखाद-दुसऱ्या शेअरमध्ये करू नये. शिवामूठच्या तक्त्यावरून हे लक्षात येईल की २० पकी १६ शेअरने लक्ष्य गाठले तर भारत फोर्ज व टाटा ग्लोबल ब्रेवरेजेस लक्ष्याच्या जवळ गेले; पण लक्ष्य गाठले नाही. तर जैन इरिगेशन व हैदराबाद इंडस्ट्रीज लक्ष्यापासून कोसो दूर राहिले. या २० शेअरच्या पोर्टफोलिओचा २८ डिसेंबर २०१२ रोजीचा वार्षकि परतावा ४६.५१% होता. आज हा परतावा -३.१५% आहे. म्हणजे या दिवशी सगळी मिड-कॅपमधील गुंतवणूक काढून घेतली असती तरी ४५% हून अधिक परतावा मिळाला असता. अनेकांनी तो काढलाही असेल. जे कोणी हे शेअर हृदयाशी कवटाळून बसले त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच. निष्णात वित्तीय सल्लागार आपली आíथक उद्दिष्टे पार पाडण्यास नेहमीच तत्पर असतो. परंतु सामान्य गुंतवणूकदारांना हे समजायला अजून किती काळ जावा लागेल? हे देवच जाणे.
मागील लेखात लिहिल्याप्रमाणे ‘शिवामूठचा सिक्वेल’ सुरू करण्याविषयी साशंकता होती. ‘लोकसत्ता’च्या नेहमीच्या वाचकांपकी संगमनेरचे अतुल कोटकर यांनी ‘शिवामूठचे प्रगतिपुस्तक’ पाठविले. त्यामुळे कुठलीही सबब न सांगता चार भागांची मालिका सुरू केली. अतुल हे ‘अर्थ वृत्तांत’मधील अनेक गोष्टी नोंदून ठेवत असतात व योग्य वेळी पोतडीतून काढूनही देतात. त्यांच्यासारखे वाचक लिहिण्याचा उत्साह टिकवून ठेवतात, त्याबद्दल त्यांचे आभार.
ल्ल बायोकॉन लिमिटेड
किरण मुझुमदार-शॉ या प्रवर्तक असलेल्या बायोकॉन कंपनीची कथा अतिशय रंजक आहे. ज्या कंपनीला कोणतीही बँक व्यवसाय सुरू करण्यास कर्ज देण्यास राजी नव्हती, त्या कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीच्या पहिल्या दिवशीच एकूण मागणी नोंदविलेल्या शेअरचे मूल्य १०० दशलक्ष डॉलर होते व सूचिबद्ध झाल्यावर पहिल्याच दिवशी या कंपनीचे बाजारमूल्य १.११ अब्ज डॉलर होते. बायोकॉन ही भारतातली सर्वात मोठी जैवतंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी मुख्यत्वे कर्करोग, मधुमेह या व्याधींवर संशोधन करून उपाय करणारी औषधे तयार करते. या कंपनीची स्थापना २९ नोव्हेंबर १९७८ ला झाली. सुरुवातीच्या काळात कंपनी पपईतून एन्झिन काढून त्याची विक्री करीत असे. पुढील काळात कंपनी विकसित होताना नवीन उत्पादने, संशोधन प्रकल्प यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले. आज ही कंपनी तिच्या संशोधनासाठी जगात ओळखली जाते. कंपनीने आपला व्यवसाय पाच उपगटात विभागला आहे. कंपनीचा मोठा महसूल आपली उत्पादने अमेरिका व युरोपच्या बाजारात उत्पादने विकून मिळतो. २००५-२०१० या काळात कंपनीने वेगवेगळ्या औषधांसाठी वेगवेगळ्या औषध नियंत्रकांकडून मोठय़ा संख्येने औषध विक्रीचे परवाने मिळवले. कंपनीने तिमाही निकालांच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांच्या वैद्यकीय चाचणीनंतर दोन नवीन औषधे चालू तिमाहीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यापकी एक सोरायसिस या त्वचेच्या विकाराच्या इलाजासाठी वापरले जाणारे औषध मागील आठवडय़ात विक्रीसाठी उपलब्ध झाले. भारतातील १.७५-२% लोकसंख्या या विकाराला बळी पडली असून सध्या फायझर व जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या बहुराष्ट्रीय कंपन्यांची औषधे इलाज करण्यासाठी वापरली जातात. या औषधांच्या निम्म्या किमतीत बायोकॉनचे औषधे उपलब्ध झाले आहे. अल्झायमर विकारावरच्या औषधाची चाचणी ‘इयु फेज-३’च्या शेवटच्या टप्प्यात असून हे औषध पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत युरोपच्या बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या शेअरचा भाव २०१४ च्या प्रति समभाग मिळकतीच्या १३ पट आहे. तर २०१५ च्या नऊपट आहे. आज मागील वर्षभरातील उच्चांकाच्या जवळ असलेला भाव एका वर्षांनंतर भाव ४२५-४५० दरम्यान असेल असा अंदाज आहे. लुपिन, सन फार्मा, डॉ. रेड्डीज् या भारतीय औषध निर्मात्यांच्या तुलनेत बायोकॉनचे वाजवी मूल्यांकन हेच या कंपनीचे शेअर खरेदीची शिफारस करण्यामागील हेतू आहे. ३० ऑगस्टपासून ही कंपनी ठ्रऋ३८ ट्रूिंस्र् 50 या निर्देशांकात समावेश होणार आहे. या निर्देशांकात नव्याने समाविष्ट होणाऱ्या कंपन्यांचे बाजारमूल्य १,००० ते ५,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असावे लागते.
मिडकॅप साठा उत्तरी कहाणी
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) सर्व निर्देशांकाचे व्यवस्थापन क्रिसिलची उपकंपनी ‘इंडिया इंडेक्स प्रॉडक्ट्स अॅण्ड सव्र्हिसेस’ ही कंपनी पाहते. क्रिसिल ही ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पूअर्स’ची (र&ढ) या जागतिक
First published on: 19-08-2013 at 09:03 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of midcap index