majha-portfolio321सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स ही स्टार्चचे उत्पादन करणारी भारतातील एक जुनी आणि मोठी कंपनी आहे. स्टार्चव्यतिरिक्त  कंपनी डेक्स्ट्रीन, डेक्स्ट्रोज, मोनो हायड्रेट डेक्स्ट्रोज, सॉर्बटिॉल, लिक्विड ग्लुकोज, माल्ट्रो डेक्स्ट्रीन इ. विविध प्रकारची उत्पादने करते. स्टार्चचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात होतो. यात प्रामुख्याने बेकरी, चॉकलेट्स, आइस्क्रीम, मध, शीत पेये तसेच फ्रोजन फूड्स, रेडी टू इट व इन्स्टंट फूड्स आणि इतर हवा बंद उत्पादने येतात. सध्या चंगळवादाचा जमाना असल्याने प्रीझव्‍‌र्हेटिव्हज् मोठय़ा av-04प्रमाणात वापरले जातात. या खेरीज पेपर, गम, वस्त्रोद्योग, रंग, अल्युमिनियम, तेल आणि बांधकाम अशा अनेक क्षेत्रात स्टार्च किंवा तत्सम पदार्थाचा मोठा वापर होताना दिसतो. भारतात एकूण चार उत्पादन केंद्रे असणाऱ्या या कंपनीने गेल्या दोन वर्षांत सुमारे १०० कोटी रुपये खर्चून आपला विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवला आहे. पश्चिम बंगाल येथील मालदा आणि हिमाचल प्रदेश येथील उत्पादन क्षमता तिपटीने वाढवल्याने त्याचे फायदे येत्या आíथक वर्षांच्या अखेरपासून दिसू लागतील. स्टार्चसाठी लागणारा प्रमुख कच्चा माल म्हणजे मका. जगभरातील मक्याच्या किमती खाली आल्याने त्याचाही मोठा फायदा कंपनीला होईल. बदलत्या जीवनशैलीनुसार आकाराला येत असलेल्या बाजारपेठेप्रमाणे कंपनीच्या उत्पादनांना येती काही वष्रे मोठी मागणी राहील अशी अपेक्षा आहे. ३० सप्टेंबर २०१४ अखेर कंपनीच्या तिमाही उलाढालीत १६% वाढ होऊन ती १३१.३८ कोटी रुपयांवर गेली आहे तर, नक्त नफ्यात ५९% वाढ होऊन तो ५.४५ कोटींवर आला आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी राखून ठेवावा असा हा शेअर आहे.

Story img Loader