किर्लोस्कर समूह व पंजाब औद्योगिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे स्थापलेली स्वराज इंजिन्स ही कंपनी सध्या मिहद्र समूहाचा एक भाग आहे. मिहद्रच्या ट्रॅक्टरसाठी लागणारी इंजिन्स ही कंपनी बनवते. या कंपनीत मिहद्र समूहाचे ३३ टक्के तर किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे १७ टक्केभागभांडवल आहे.
कंपनी २० ते ५० अश्वशक्ती क्षमतेची इंजिन्स व एसएमएल इसुझू (पूर्वीच्या स्वराज माझदा) वाहनांसाठी सुटे भाग तयार करते. मुख्यत्वे मिहद्रच्या ‘मिहद्र स्वराज’ या नाममुद्रेने विकल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरना स्वराजची इंजिन वापरली जातात. भविष्यात कंपनी अधिक अश्वशक्तीच्या इंजिन गटात प्रवेश करीत असून मिहद्रच्या सर्व क्षमतेच्या ट्रॅक्टरना स्वराजची इंजिन वापरली जातील.
ट्रॅक्टर बाजारपेठेत अग्रस्थानी असलेल्या मिहद्रचा हिस्सा ४१ टक्के आहे. ट्रॅक्टर बाजारपेठेत नेतृत्वस्थानी असलेल्या कंपनीची उपकंपनी म्हणून स्वराज इंजिन्सला याचा नसíगक फायदा मिळत आहे. सध्या स्वराजच्या एकूण उत्पादनापकी ८५ टक्के उत्पादन महिंद्रच्या ट्रॅक्टरसाठी तर उर्वरित १५ टक्के उत्पादन किर्लोस्कर ऑइल इंजिन्सला पुरविले जाते. मागील पाच वर्षांत उत्पादन केलेल्या इंजिनची संख्या २८.५ टक्के चक्रवाढ दराने वाढली आहे. मिहद्रच्या ट्रॅक्टरची मागणी लक्षात घेता विक्रीच्या वाढीचा हाच कल काही काळ राहण्याचे संकेत कंपनी व्यवस्थापनाने दिले आहेत.
कंपनीने गेल्या वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत विक्रीत २०.८ टक्केतर करपश्चात नफ्यात २१.२ टक्केवाढ नोंदविली. इंजिन विक्रीच्या संख्येत फारसा बदल झाला नाही. घसारा व करपूर्व नफाक्षमता जवळपास पाव टक्क्याने तर करपश्चात नफाक्षमता जवळजवळ अध्र्या टक्क्याने घटली. विक्री वाढूनही कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ (२२ टक्के) व कर्मचारी खर्चात वाढ (२३ टक्के) नफाक्षमता घटण्यास कारण ठरली. कमी अश्वशक्तीची इंजिने जास्त संख्येने विकली जाणे हेसुद्धा एक नफाक्षमता घटण्यास कारण ठरले.
सध्या कंपनीची स्थापित क्षमता वार्षकि ७५ हजार इंजिने असून कंपनीने क्षमता विस्ताराचे काम हाती घेतले आहे. यातून प्रतिवर्ष १,०५,०० इंजिन उत्पादन होणार आहे. क्षमता विस्ताराचे काम येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबपर्यंत पूर्ण होऊन चालू वर्षांच्या चौथ्या तिमाहीत पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होईल. आíथक वर्ष २०१६ मध्ये ही क्षमता पूर्णपणे वापरली जाईल.
नवीन गुंतवणुकीसाठी हा समभाग महाग वाटत नाही. दोन वर्षे गुंतवणुकीचा कालावधी निश्चित केल्यास गुंतवणुकीवर २५ टक्के दराने नफा मिळविता येईल.
स्वराज इंजिन्स
” ६८५.५०
वार्षिक उच्चांक/नीचांक :
” ७७२/३८२
दर्शनी मूल्य: ” १०
पी/ई: १३.४१ पट
उत्पादन क्षमता वाढीनंतर ४०-५० अश्वशक्ती क्षमतेच्या इंजिनच्या उत्पादनात वाढणार असून नफाक्षमता २० ते २५ टक्क्यांनी सुधारणे अपेक्षित आहे. विक्रीत २८.५ टक्केवाढ व सर्व विस्तार योजनेंतर्गत गंगाजळी वापरून पूर्ण केल्यामुळे आजही कंपनी कर्जमुक्त आहे. या कारणाने संस्थात्मक गुंतवणूकदारांची या समभागात रुची असते. सध्याच्या किमतीशी लाभांशाची टक्केवारी ४.८१ टक्केम्हणजे बचत खात्यावरील व्याजदरापेक्षा अधिक आहे. तसेच किमतीशी २०१४ च्या अपेक्षित प्रति समभाग उत्सर्जनाचे प्रमाण १३.४१ पट आहे. २०१५ च्या उत्सर्जनाशी हेच प्रमाण १०.८० पट आहे.
दोन वर्षांत २५ टक्के नफा निश्चित
किर्लोस्कर समूह व पंजाब औद्योगिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे स्थापलेली स्वराज इंजिन्स ही कंपनी सध्या मिहद्र समूहाचा एक भाग आहे.
First published on: 14-04-2014 at 07:34 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaraj engines and shares information