* भांडवली वस्तू या गटात मोडणारी स्विस ग्लासकोट इक्विपमेंट्स लि. ही एक छोटय़ा चणीची कंपनी. ग्लास वूल आच्छादनासाठी विविध रसायने आणि तेलशुद्धीकरण उद्योगात वापरावयाच्या उपकरणांची व सुटय़ा भागांची निर्मिती व विक्री ही कंपनी करते. देशांत आणि परदेशातील बाजारपेठेत कंपनीच्या उत्पादनांची विक्री होत आहे. कंपनीच्या प्रमुख उत्पादनांत इव्हॅप्युरेशन व्हेसल्स, ग्लास लाइन्ड रिअॅक्टर, हिट एक्स्चेंजर, ब्लेंडर्स, अॅजिटेटेड फिल्टर्स, प्रोसेस टँक, ग्लास लाइन्ड फिल्टर्स, कंडेन्सर्स, ग्लास लाइन्ड फिटिंग्ज व पाइप्स यांचा समावेश होतो. कंपनीची उत्पादने औषध निर्माण, डाइज व पिग्मेंट, रासायनिक खते या उद्योगात वापरली जातात. ग्लास वूल हे उत्पादन उष्णतेचे वहन होऊ नये म्हणून लोखंडी पाइप व इतर यंत्रसामग्रीवर रसायनाच्या सहाय्याने चिकटविले जाते.
गुजरात राज्यात १९९१ मध्ये स्विस ग्लासकोट या कंपनीचे कार्यान्वयन झाले. कंपनीचे भागभांडवल पाच कोटी रुपयांचे असून, भागभांडवलात प्रवर्तकांचा वाटा ३५.७२ टक्के आहे. १६.५१ कोटी रुपयांची तिच्याकडे रोख गंगाजळी आहे. कंपनीचे पुस्तकी मूल्य ३१ मार्च २०१४ रोजी ४५.२९ रुपये होते. सप्टेंबर २०१४ अखेर म्हणजे आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे कंपनीचे निकाल अव्वल आहेत. विक्री १६.१६ कोटींवरून २४.२९ कोटी रुपये झाली आहे. प्राप्तिकरापोटी तरतुदीत सुमारे ५० टक्क्य़ांनी वाढ होऊन निव्वळ नफाही ५० टक्क्य़ांनी वाढून १.१८ कोटी रुपये झाला आहे. संपूर्ण वर्षांची विक्री १०० कोटी आणि नफा पाच कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा