एक राहते घर असताना, घेतलेल्या दुसऱ्या घराचे गृहकर्ज फेडताना दिलेल्या संपूर्ण व्याजावर (यावर १,५०,००० रुपयांची मर्यादा नाही) कलम २४ नुसार उत्पन्नातून वजावट मिळू शकते.
* घर विकत घेतल्यावर त्यावर घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर आणि व्याजावर कर सवलत मिळते. ही सवलत व्यापारी गाळा घेतल्यावरसुद्धा मिळते का?
– सदानंद साखरे
उत्तर : व्यापारी गाळ्यासाठी जर कर्ज घेतले असेल तर फक्त त्यावर दिलेल्या व्याजाची वजावट उत्पन्नातून मिळू शकते. कर्जाच्या परतफेडीची वजावट मिळू शकत नाही.
* मी नुकताच सरकारी नोकरीतून निवृत्त झालो. मला मिळालेली काही रक्कम मी माझ्या बायकोच्या नावाने बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आहे. त्यावर मिळणारे व्याज हे माझ्या बायकोच्या करपात्र उत्पन्नात गणले जाईल की माझ्या करपात्र उत्पन्नात गणले जाईल?
– एक वाचक
उत्तर : प्राप्तिकर कायदा कलम ६४ प्रमाणे आपण आपल्या उत्पन्नातून केलेल्या मुदत ठेवीवरील व्याज हे आपल्या उत्पन्नात गणले जाईल जरी मुदत ठेव आपल्या बायकोच्या नावावर असली तरी.
* मी राष्ट्रीय बचतपत्र योजना १९८७ अन्वये माझ्या आणि बायकोच्या नावावर खाती उघडली होती. माझ्या खात्यासाठी बायको आणि पत्नीच्या खात्यासाठी माझे नामनिर्देशन (Nomination) केले गेले आहे. कोणा एकाचा मृत्यू झाल्यास पसे कोणाला मिळतील. त्यावर कर भरण्याची जबाबदारी कोणाची असेल?
– प्रा. राम म्हात्रे
उत्तर : राष्ट्रीय बचत योजना १९८७ अन्वये जमा असलेली रक्कम जर आपण काढली किंवा खाते बंद केले तर एकूण मिळालेली रक्कम (व्याज आणि मुद्दल) करपात्र आहे. यावर उद्गम कर -ळऊरसुद्धा होतो. जर आपले उत्पन्न करपात्र नसेल तर आपण फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५ एच देऊ शकता. जर या खात्यातील पसे खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसदाराला मिळाले तर ते उत्पन्न वारसदाराला करपात्र नाही. त्यावर त्याला कर भरावा लागत नाही.
* मी आता ज्या घरात राहतो त्या घरावर गृहकर्ज घेतले आहे. मी जर दुसरे घर घेतले आणि त्यासाठी गृहकर्ज घेतले तर मला कर सवलत मिळू शकेल का आणि कर सवलत मिळण्यासाठी घर घेणे उचित आहे का?
– सिद्धांत साठे
उत्तर : आपण जर दुसरे घर घेतले तर त्यावर आपल्याला गृहकर्जावर फेडताना दिलेल्या संपूर्ण व्याजावर (यावर १,५०,००० रुपयांची मर्यादा नाही) कलम २४ नुसार उत्पन्नातून वजावट मिळू शकते. कर्जाची (मुद्दल) परतफेड ही ८० क कलमानुसार कमाल १,००,००० रुपयांपर्यंत मिळू शकते (सध्याच्या घरावर भरत असलेल्या कर्जाची परतफेड, विमा, भविष्य निर्वाह निधी, वगरेही जमेस धरून). आपले एक राहते घर हे प्राप्तिकर उत्पन्नात गणले जात नाही. परंतु दुसऱ्या घरावर आपल्याला भाडे उत्पन्न दाखवावे लागेल (जरी घर भाडय़ाने दिले नसले तरी). शिवाय एका घरावर संपत्ती कर (Wealth TAX) भरावा लागेल (जर आपली एकूण संपत्ती ३० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर). त्यामुळे या गोष्टींचा विचार करून दुसरे घर घ्यावे.
* मी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीने मला सवलतीच्या दरात गृहकर्ज दिले आहे. कंपनीने माझ्या करपात्र उत्पन्नात व्याजाची सवलत गणली आहे. हे उचित आहे का?
– एक वाचक
उत्तर : जर आपण घरासाठी आपल्या कंपनीकडून सवलतीत कर्ज घेतले असेल तर त्या सवलतीच्या व्याजावर आपल्याला कर भरावा लागतो. भारतीय स्टेट बँकेच्या वर्षांच्या पहिल्या दिवसाचा गृहकर्जाच्या व्याजदरानुसार मुद्दल रकमेवर येणारे व्याज आणि आपल्याकडून घेतलेले व्याज यामधील फरक हा आपल्या उत्पन्नात गणला जातो. उदा. आपल्याला ६% व्याजदराने सवलतीत कर्ज मिळाले असेल आणि भारतीय स्टेट बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर ८% असेल तर दोन टक्के व्याजाची तुम्ही मिळविलेली सवलत ही आपल्या उत्पन्नात गणली जाईल आणि त्यावर आपल्याला कर भरावा लागेल.
* मी एका कंपनीत नोकरी करत होतो. ती कंपनी माझ्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कापून भविष्य निर्वाह आयुक्ताकडे भरत होती. ही कंपनी मी तीन वर्षांनंतर सोडली. मला मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर कर भरावा लागेल का?
– एक वाचक
उत्तर : आपली जर पाच वर्षांपेक्षा जास्त सलग नोकरी झाली असेल आणि जर कंपनीला भविष्य निर्वाह निधी कायदा लागू असेल तर आपल्याला मिळणारी रक्कम करमुक्त असते. जर आपण कंपनी पाच वर्षे पूर्ण होण्याआधी सोडली तर आपल्याला मिळणाऱ्या रकमेवर कर भरावा लागतो. मालकाकडून भरलेला निधी (Employers Contribution) आणि त्यावर जमा झालेले व्याज हे वेतन म्हणून गणले जाईल. आपल्या उत्पन्नातून भरलेला (Employees Contribution) ज्यावर आपण ८० क कलमाखाली वजावट घेतली आहे ती रक्कम आणि त्यावरील व्याज हे इतर उत्पन्नात गणले जाईल.
* कोणते आय कर विवरणपत्र कोणी भरावयाचे व कधी भरावयाचे याबद्दल माहिती द्या.
– एक वाचक
उत्तर : आयकर विवरणपत्रे ही आठ प्रकारचे असतात. फॉर्म १ हा वैयक्तिक करदाते ज्यांच्या उत्पन्नात पगार, व्याज आणि फक्त एका घराचे उत्पन्न (अथवा तोटा) यांचा समावेश आहे त्यांनाच भरता येतो. फॉर्म २ हा वैयक्तिक करदाते आणि िहदू अविभक्त कुटुंब ज्यांच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसाय यांचा समावेश नाही यांच्यासाठी आहे. म्हणजे ज्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये पगार, व्याज, भांडवली नफा किंवा तोटा, एक किंवा त्या पेक्षा जास्त घरांचा समावेश आहे किंवा मागील वर्षांचा तोटा (Carried Forward Loss), इत्यादींचा समावेश असेल त्यांना फॉर्म २ भरता येतो. फॉर्म ३ हा वैयक्तिक करदाते आणि िहदू अविभक्त कुटुंब जे भागीदारी संस्थेत भागीदार आहेत त्यांच्यासाठी आहे. फॉर्म ४ हा वैयक्तिक करदाते आणि िहदू अविभक्त कुटुंब ज्यांच्या उत्पन्नामध्ये धंदा किंवा व्यवसाय यांचा समावेश आहे त्यांच्यासाठी आहे. फॉर्म ४ एस हा वैयक्तिक करदाते आणि िहदू अविभक्त कुटुंब ज्यांच्या उत्पन्नामध्ये धंद्याचा समावेश आहे आणि त्यावर अनुमानित (Presumptive) कर भरला जातो त्यांच्यासाठी आहे. फॉर्म ५ हा भागीदारी संस्था, वैयक्तिक लोकांची संस्था, इत्यादींना भरता येतो. फॉर्म ६ हा कंपन्यांसाठी असतो. फॉर्म ७ हा धर्मादाय संस्था यांच्यासाठी आहे. विवरणपत्र फॉर्म १ ते ३ भरण्याची मुदत ही ३१ जुलपर्यंत आहे. ज्या भागीदार संस्था, वैयक्तिक करदाते आणि िहदू अविभक्त कुटुंब यांना लेखा परीक्षण बंधनकारक नसते त्यांना ३१ जुलपर्यंत विवरणपत्र दाखल करावे लागते. ज्या भागीदार संस्था, वैयक्तिक करदाते आणि िहदू अविभक्त कुटुंब यांना लेखा परीक्षण बंधनकारक असते त्यांना, कंपनीला आणि धर्मादाय संस्था यांना विवरणपत्र भरण्याची मुदत ३० सप्टेंबर ही असते.
* फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५ एच हे बँकेला कोण देऊ शकतो?
– अशोक पाबरेकर
उत्तर : बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याज त्या वर्षांत जर १०,००० रुपयांपेक्षा जास्त मिळत असेल तर बँक त्यावर उद्गम कर वजा (टीडीएस) करते. जर आपण बँकेला १५जी किंवा फॉर्म १५ एच भरून दिले तर बँक व्याजावर टीडीएस कापत नाही. १५जी हा फॉर्म जर अंदाजित उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर आणि व्याजातून मिळणारे (सर्व बँक, पोस्ट ऑफिस, वगरे मिळून) उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर आपण बँकेला देऊ शकता. तर १५ एच हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांसाठी (ज्यांचे वय साठ वर्षांपेक्षा जास्त आहे) आहे. ज्येष्ठ नागरिकांना हा फॉर्म व्याजातून मिळणारे उत्पन्न वार्षिक २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तरीसुद्धा देता येतो. परंतु अंदाजित उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या (म्हणजे २,५०,००० रुपये) मर्यादेपेक्षा कमी असले पाहिजे. हा फॉर्म वर्षांच्या सुरुवातीला दिल्यास बँक टीडीएस कापणार नाही. जर आपण फॉर्म १५जी किंवा फॉर्म १५ एच भरून देण्यापूर्वी बँकेने टीडीएस कापला तर हा कापलेली रक्कम बँक परत करू शकत नाही. म्हणून आगाऊ फॉर्म भरून द्यावा. हा फॉर्म देताना आपला ‘पॅन’ (Permanent Account Number – PAN) देणे गरजेचे आहे. बँकेकडे जर आपला ढअठ नसेल तर बँक व्याजावर २०% उद्गमकर कपात (TDS) करते.