– संजय पेडणेकर
उत्तर: आयकर कायद्यानुसार १८ वर्षांखालील (अजाण) व्यक्तींचे उत्पन्न त्यांच्या पालकांच्या (ज्यांचे उत्पन्न जास्त आहे) उत्पन्नामध्ये मिळविले जाते व त्यावर त्या पालकाला कर भरावा लागतो. या उत्पन्नामध्ये मुलाने मिळविलेल्या अंगमेहनतीचे काम, कौशल्याचे काम, विशेष कौशल्य, किंवा विशेष ज्ञानापासून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश (कलम ८० यू अन्वये) होत नाही.
जे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात जोडायचे आहे, त्यावर तुमच्या माहितीप्रमाणे कमाल १,५०० रु. वजावट प्रत्येक १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी जरूर मिळते. परंतु आपण त्या व्यतिरिक्त जरी भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये गुंतवणूक केली तरी, ती आपल्या गुंतवणुकीमध्येच धरण्यात येईल. जी अर्थातच तुम्हाला कमाल रु. १ लाखांच्या मर्यादेपर्यंत (तुमचे व मुलाचे मिळून) करता येईल. मुलाच्या भविष्य निर्वाह निधी योजनेमधील गुंतवणुकीची वेगळी वजावट मिळणार नाही. त्यामुळे मुलाचे उत्पन्न हे ५,२०० रु. वजा १,५०० रु. असे ३,७०० रु. इतके दाखवावे लागेल आणि आपणाला ८० सी कलमाअंतर्गत वजावटीच्या गुंतवणुकीमध्ये अतिरिक्त ४,००० रु. वजावट मिळू शकेल.
‘कर’ समाधान
आयकर कायद्यानुसार १८ वर्षांखालील (अजाण) व्यक्तींचे उत्पन्न त्यांच्या पालकांच्या (ज्यांचे उत्पन्न जास्त आहे) उत्पन्नामध्ये मिळविले जाते व त्यावर त्या पालकाला कर भरावा लागतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-02-2014 at 08:15 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tax related problems and solution