प्राप्तिकर कायद्याच्या दृष्टिकोनातून ‘पगार’ या संज्ञेची व्याप्ती खूप मोठी आहे. या संज्ञेमध्ये मूळ वेतन (बेसिक) आणि महागाई भत्ता (डीए) सोबत इतर विविध भत्ते आणि परक्विझिट्स (विविध फायदे व लाभ) सुद्धा समाविष्ट असतात. त्याचबरोबर अ‍ॅन्युइटी, पेन्शन, ग्रॅच्युइटी, वेतन थकबाकी, अग्रिम वेतन यांचाही समावेश होतो. तसेच एखादी पगारदार व्यक्ती निवृत्त होताना त्या व्यक्तीला त्याच्या नावावर जमा झालेल्या रजेच्या मोबदल्यात जी रक्कम दिली जाते ती देखील ‘पगार’ या संज्ञेमध्ये समाविष्ट होते. त्या रकमेला ‘लीव्ह सॅलरी’ किंवा ‘लीव्ह एन्कॅशमेंट’ असे म्हणतात. एखाद्या नोकरदार व्यक्तीला निवृत्त होतेवेळी जर अशी रक्कम मिळाली तर त्यावर प्राप्तिकर कायद्यामध्ये कोणती करसवलत मिळते ते आजच्या लेखात पाहू या.
सर्वप्रथम नोकरदार व्यक्तीची दोन प्रकारात विभागणी करावी लागेल. एक म्हणजे केंद्र अथवा राज्य सरकारची नोकरी करणाऱ्या व्यक्ती आणि दुसरा वर्ग म्हणजे अशी सरकारी नोकरी न करणाऱ्या व्यक्ती.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम १० (१० एए) नुसार ज्या नोकरदार व्यक्ती केंद्र अथवा राज्य सरकारी नोकरीमध्ये आहेत अशा व्यक्ती ज्यावेळी निवृत्त होतात त्यावेळी त्यांना मिळणारी ‘लीव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम संपूर्णपणे करमुक्त असते.
केंद्र अथवा राज्य सरकारी नोकरी न करणाऱ्या पगारदार व्यक्तींसाठी त्यांना मिळणाऱ्या ‘लीव्ह एन्कॅशमेंट’बाबत वेगळी तरतूद आहे. अशा व्यक्तींना ही रक्कम संपूर्णपणे करमुक्त मिळत नाही. त्यासाठी करमुक्त रक्कम मोजण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार खालीलपैकी जी रक्कम कमी आहे ती रक्कम करमुक्त मिळते.
१. प्रत्यक्षात मिळालेली ‘लीव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम किंवा
२. काम केलेल्या प्रत्येक वर्षांसाठी ३० दिवसांच्या भरपगारी रजेची रक्कम किंवा
३. दहा महिन्यांचा सरासरी पगार (मूळ वेतन अधिक महागाई भत्ता मिळून) किंवा
४. रु. ३००,००० लाख
बिगर सरकारी नोकरदारांबाबत ही मोजणी पुढील उदाहरणातून समजून घेऊ या.
या ठिकाणी करदात्यांनी दोन-तीन महत्त्वाच्या तरतुदी लक्षात ठेवाव्यात. एक म्हणजे ‘लीव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम ती नोकरदार व्यक्ती निवृत्त होतानाच करमुक्त मिळते. दुसरे म्हणजे समजा सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मिळणारी ‘लीव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम (परिपत्रक ३०९, जुलै ३, १९८१ नुसार) करमुक्त मिळेल. तसेच एखाद्या नोकरदार व्यक्तीचे निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या नावे जमा झालेली ‘प्रिव्हिलेज्ड लीव्ह’ची रक्कम (परिपत्रक क्र. ३५/१/६५ आयटी बी नुसार) त्याच्या वारसदारांना मिळताना पूर्णपणे करमुक्त मिळते.
‘लीव्ह एन्कॅशमेंट’ची मोजणी : उदाहरण
बिगर सरकारी नोकरीत असलेल्या श्री. दाते यांचा दरमहा पगार : २२,००० रु.; एकूण सेवा काळ : २८ वर्षे; निवृत्तीसमयी जमा रजा : २५ महिने; त्यांनी वापरलेली रजा : १७ महिने आणि त्यांना मिळू शकणारी लीव्ह एन्कॅशमेंटची रक्कम : रु. ५,५०,००० अशी आहे.
वर दिलेल्या माहितीच्या आधारे श्री. दाते यांच्यासाठी करमुक्त ‘लीव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम खालीलप्रमाणे मोजली जाईल.
१.  प्रत्यक्षात मिळणारी लीव्ह एन्कॅशमेंट रक्कम :
                रु. ५,५०,०००
२. काम केलेल्या प्रत्येक वर्षांसाठी ३० दिवसांची भरपगारी रजेची रक्कम : ३०७२८ वर्षे = २८ महिने
    वजा : वापरलेली रजा (१७ महिने) = ११ महिने
    म्हणजेच ११ महिने ७ रु. २२,००० = रु. २४२,०००
३.  १० महिन्यांचा सरासरी पगार : १० ७ रु. २२,००० =
                रु. २२०,०००
४. निश्चित रक्कम =         रु. ३००,०००
या चार रकमांपैकी रु. २२०,००० ही रक्कम सर्वात कमी असल्याने ही रक्कम करमुक्त मिळेल आणि
रु. ३३०,००० (रु. ५५०००० वजा रु. २२०,०००) ही राहिलेली ‘लीव्ह एन्कॅशमेंट’ची रक्कम करपात्र ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा