आशीष ठाकूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी रिझव्र्ह बँकेने व्याजदरात अर्धा टक्कय़ांच्या आसपास कपात करत बँकांना रोकड तरलता उपलब्ध करून दिली,त्यात बारा दिवसापूर्वीचा केंद्र सरकारचा वीस लाख कोटी आर्थिक मदतीचा दिलासा मिळविता येईल. या आकडेवारीत,आता विसाच्यापुढे आणखी किती शून्य येतील याचा अंदाज घेणे सुरू होते, तोच बरोबर उलट दिशेने बाजाराची वाटचाल. बाजाराची दिशा ‘शून्याकडून मोठय़ा शून्याकडे’ सरकत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स: ३०,६७२.५९ / निफ्टी:९०३९.२५
विविध आर्थिक सवलतींच्या वर्षांवात खरे तर निर्देशांकात भरीव सुधारणा होण्याची अपेक्षा असताना, निफ्टी निर्देशांकाचा साप्ताहिक बंद हा ८ मेपासून सलग तिसऱ्या सप्ताहात उतरत्या भाजणीतील नोंदविला जात आहे. हा चिंतेचा विषय आहे. येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा भरभक्कम आधार हे सेन्सेक्सवर ३०,०००आणि निफ्टीवर ८,८०० असा असेल. उपरोक्त स्तर निर्देशांकांनी राखल्यास निर्देशांकांचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० असे असेल. मेअखेर ते जूनच्या पहिल्या सप्ताहापर्यंत जर निर्देशांक सेन्सेक्सवर ३०,००० ते ३१,७०० आणि निफ्टीवर ८,८०० ते ९,३०० मध्येच वाटचाल करीत राहिल्यास / पायाभरणी केल्यास आता चालू असलेल्या आर्थिक सुधारणा, सवलतींचे खतपाणी निर्देशांकाला मिळून निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३४,४०० आणि निफ्टीवर १०,००० असे असेल.
तथापि, निर्देशांक – सेन्सेक्सवर ३०,००० आणि निफ्टीवर ८,८०० चा भरभक्कम आधार राखण्यास अपयशी ठरल्यास, सेन्सेक्स २८,८००, तर निफ्टी ८,५०० पर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे.
समभाग संच बांधणीचे निकष:
काही कंपन्या आपल्या उत्कृष्ट आर्थिक कामगिरीमुळे,आलेख रचनेमुळे चर्चेत असतात. आयओएल केमिकल्सने मार्च २०१८ च्या वार्षिक नफ्यात तब्बल ५५० टक्कय़ांची वृध्दी नोंदवत (करपूर्व नफा ५ कोटींवरून २८ कोटी) प्रथम प्रकाशझोतात, व नंतर सर्वाच्या नजरेत आली. कंपनीचे एखादे वर्ष दिमाखदार,चमकदार असू शकते. पण हेच सातत्य २०१९ साली देखील प्रत्ययास आले. कंपनीचा निव्वळ नफा २८ कोटींवरून २३७ कोटींवर झेपावला. उत्पन्न प्रती समभाग हे ४१ रुपये, पुस्तकी मूल्य ११३ रुपये असा आकर्षक खजिनाच हाती गवसला व २०१८ साली आलेखावर समभागाचा नीचांक ८० रुपये, तर मार्च २०१९ सालचा नीचांक १९० रुपये होता व बरोबर एक वर्षांंने ६ एप्रिला २०२०ला मंदीच्या रेटय़ात हाच समभाग पुन्हा १९३ रुपयाला उपलब्ध झाल्याने ही संधी वाचकांनी सोडता कामा नये. या उद्देशाने हा समभाग सुचविला व याचे फळ अवघ्या दीड महिन्यात दामदुपटीने आले आणि बाजारभाव १९३ वरून ४०० रुपयांवर झेपावला.
शब्दांपेक्षा कृती जास्त बोलकी असते. आयओएल केमिकल्स ही विशिष्ट,उच्च प्रतींच्या विविध रसायनांच्या निर्मितीत १९८६ पासून कार्यरत आहे. या रसायनांचा उपयोग औषध निर्मिती, वस्त्रोद्योग,अन्नधान्यांवरील प्रक्रिया,रंग,व कृषी कीटकनाशक या क्षेत्रांमध्ये होतो. आताच्या घडीचा परवलीचा शब्द ‘औषध कंपन्या’ आयओएल केमिकल्सची उत्पादने ही उच्च रक्तदाब, मधुमेह, मेंदूच्या विकारांवर उपयोगात आणतात. भविष्यात या कंपनीकडून गुंतवणूकदारांना ‘विटॅमिन एम’चा अखंड पुरवठा होत राहो ही सदिच्छा.
आगामी निकालांचा वेध..
१) लुपिन लिमिटेड
तिमाही निकाल – गुरुवार,२८ मे
२२ मेचा बंद भाव – ८९२.८५ रु.
निकालानंतर केंद्रबिंदू स्तर – ८४५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८४५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९०० रुपये. भविष्यात ८४५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,०८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ८४५ ते ९०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : ८४५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७४० रुपयांपर्यंत घसरण.
२) टीव्हीएस मोटर्स कंपनी लिमिटेड
तिमाही निकाल – गुरुवार,२८ मे
२२ मेचा बंद भाव – ३१३.९० रु.
निकालानंतर केंद्रबिंदू स्तर – ३०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३५० रुपये.भविष्यात ३०० रुपयांचा
स्तर सातत्याने राखल्यास ३८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ३०० ते ३५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : ३०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २७५ रुपयांपर्यंत घसरण.
३) ३ एम इंडिया लिमिटेड
तिमाही निकाल – शुक्रवार,२९ मे
२२ मे चा बंद भाव – १७,६९०.२० रु.
निकालानंतर केंद्रबिंदू स्तर – १६,७०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १६,७०० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य १९,००० रुपये. भविष्यात १६,७०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २१,४००च्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : १६,७०० ते १९,००० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : निकालानंतर १६,७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १५,३०० रुपयांपर्यंत घसरण.
* लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.