आशीष ठाकूर
सरलेल्या सप्ताहात सेन्सेक्सला ३६,९६३ आणि निफ्टीला १०,८८५ च्या पल्याड झेपावण्यास २०० दिवसांची चलत सरासरी अडथळा ठरू शकते, असे गेल्या लेखातील वाक्य होते. निर्देशांक ही २०० दिवसांची चलत सरासरी पार करण्यास अपयशी ठरल्यास सेन्सेक्स ३५,८४१ आणि निफ्टी १०,५५० पर्यंत खाली घसरू शकते, असे भाकीतही केले गेले होते. त्याची प्रत्यक्ष प्रचीती गेल्या आठवडय़ात मंगळवारी येऊन गेली.
या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ३७,०२०.१४ / निफ्टी : १०,९०१.७०
जगात कितीही वाईट घटना घडोत. अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, भारत-चीन सीमेवरील तणाव, करोना रुग्णसंख्येत होणारी लक्षणीय वाढ, करोनामुळे सामाजिक व आर्थिक विश्वात होणारे निराशाजनक बदल या सर्व दाहक मंदीकारक घटनांची व्याप्ती निफ्टीवर अवघी ३५० अंशांमध्ये सीमित व याची परिणती निफ्टी निर्देशांक १०,९०० वरून १०,५५० पर्यंतचीच घसरण.
आता निफ्टी निर्देशांक बरोबर १०,५५०च्या आसपास आल्यावर, उत्साहवर्धक बातम्या.. भारत-चीन सीमेवरील तणाव निवळला अथवा सर्व समस्येचे मूळ असलेल्या करोनावर रशिया, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना लस सापडल्याच्या वृत्तावर निफ्टी निर्देशांक पुन्हा १०,५५० वरून १०,९०० वर. असे हे अचूक ३५० अंशांच्या परिघातले निफ्टीचे जे तेजी-मंदीच आवर्तन चालू होत ते पाहून.. ‘व्वा लाजवाब’! असे उद्गार निघून जातात.
गेल्या लेखात आपण सेन्सेक्सवरील १,१२२ अणि निफ्टीवरील ३५० अंशांच्या सामान्य मार्गक्रमण पट्टय़ाचे (बॅण्डचे) आलेखन व विवेचन केले होते, ते सरलेल्या सप्ताहात आपण प्रत्यक्ष अनुभवलेदेखील. त्याचाच आधार घेत आता भविष्यात डोकावू या.
येणाऱ्या दिवसांत निर्देशांक सातत्याने सेन्सेक्स ३७,००० आणि निफ्टीवर १०,९०० च्या वर सातत्याने टिकल्यास निर्देशांकाचे प्रलंबित असलेले वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,५०० ते ३८,०८५ आणि निफ्टीवर ११,०५० ते ११,२३५ असे असेल.
१) बजाज ऑटो लिमिटेड
* तिमाही निकाल – बुधवार, २२ जुलै
* १७ जुलैचा बंद भाव – २,९९५.१० रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,८०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,००० रुपये. भविष्यात २,८०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३,१५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : २,८०० ते ३,००० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : निकालानंतर २,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,६५० रुपयांपर्यंत घसरण.
२) लार्सन अँण्ड टुब्रो लिमिटेड
* तिमाही निकाल – बुधवार, २२ जुलै
* १७ जुलैचा बंद भाव – ९२५.५० रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९०० रुपये
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९५० रुपये. भविष्यात ९०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,०५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ९०० ते ९५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८०० रुपयांपर्यंत घसरण.
३) आयटीसी लिमिटेड
* तिमाही निकाल – शुक्रवार, २४ जुलै
* १७,जुलैचा बंद भाव – १९४ रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १८० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २०० रुपये. भविष्यात १८० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २२५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : १८० ते २०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : १८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १६५ रुपयांपर्यंत घसरण.
४) आयसीआयसीआय बँक
* तिमाही निकाल – शनिवार, २५ जुलै
* १७ जुलैचा बंद भाव – ३५३.८५ रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३४० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३४० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ३८० रुपये. भविष्यात ३४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ३४० ते ३८० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशादायक निकाल : ३४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३०० रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.