उत्तर : करदात्याचा जर उपरोक्त आíथक वर्षांत मृत्यू झाला तर मृत व्यक्तीचे प्राप्तीकर विवरण पत्र आणि त्याचा कर भरण्याची जबाबदारी ही त्याच्या वारसाची आहे. त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंतचे उत्पन्न हे मृत व्यक्तीच्या नावाने दाखवून आणि त्याचा TDS विचारात घेऊन विवरणपत्र भरावे लागेल. सर्व कर सवलती आणि वजावटीसुद्धा घेता येतात. मृत्यूच्या दिवशी नंतरचे उत्पन्न हे वारसदाराच्या उत्पन्नात गणले जाते आणि त्यावर त्याला कर भरावा लागतो. मृत व्यक्तीचे करदायित्व हे वारसदाराचे करदायित्व होते. हे करदायित्व त्याला मृत व्यक्तीकडून मिळालेल्या मालमत्तेपुरते मर्यादित असते. जर विवरणपत्र हे संगणकाद्वारे भरावयाचे असेल तर वारसदार म्हणून नोंद करावी लागेल त्याचबरोबर काही कागदपत्रे (जसे मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या PAN ची प्रत, वारसदाराच्या PAN ची स्वयंप्रमाणित प्रत, वारसदार असल्याचे प्रमाणपत्र, वगरे) ‘झिप’ करून ऑनलाईन दाखल करावी लागतील. हे निवेदन प्राप्तीकर प्रशासकाने तपासून मंजूर केल्यानंतर विवरणपत्र दाखल करता येते. जर डिजिटल हस्ताक्षराद्वारे विवरणपत्र दाखल करावयाचे असेल तर डिजिटल हस्ताक्षर ऑनलाईन रजिस्टर करावी लागेल. जर विवरणपत्र संगणकाद्वारे भरावयाचे नसेल तर वरील कागदपत्रे प्राप्तीकर अधिकाऱ्याकडे दाखल करावी लागतील. जर विवरणपत्रात कर परतावा (REFUND) दर्शविण्यात आला असेल तर कर परतावा हा मृत व्यक्तीच्या नावाने संयुक्त खाते असेल तर त्या खात्यात जमा करता येतो.
प्रश्न : मी डिसेंबर २०१३ मध्ये ३८ लाख रुपयांना घर घेतले आणि मुद्रांक शुल्क, नोंदणी आणि इतर खर्च २.६५ लाख रुपये झाला. हे घर मी २ एप्रिल २०१४ रोजी ४९.५० लाख रुपयांना १,२१,३५,८०० रुपयांचे नवीन घर विकत घेतले. त्या साठी मी बँकेकडून ६५ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. मला घर विकल्यामुळे कर भरावा लागेल का? – डॉ. सुरेश सुद्गे.
उत्तर : आपण घर डिसेंबर २०१३ मध्ये विकत घेऊन लगेच एप्रिल २०१४ मध्ये विकले. घर खरेदी केल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यामुळे लघुमुदतीचा नफा झाला आहे. हा कर वाचवण्यासाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जरी ते पसे आपण घरामध्ये गुंतविले असले तरी लघुमुदतीचा नफा असल्यामुळे पूर्णपणे करपात्र आहे. करपात्र नफा हा (विक्री किंमत ४९.५० लाख रुपये वजा घर खरेदी किंमत ३८ लाख रुपये वजा खर्च २.६५ लाख रुपये) ८.८५ लाख रुपये इतका आहे. त्यावर टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. नवीन घरामध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा हा दीर्घ मुदतीचा नफा असेल तरच होतो.
प्रश्न : मी एक भारतीय नागरिक असलेल्या परंतु नोकरीसाठी गेली १० वर्षे अमेरिकेत असलेल्या अनिवासी भारतीयाकडून घर विकत घेण्याचा विचारात आहे. त्याला पसे देताना काय काळजी घेतली पाहिजे? – विजय आपटे.
उत्तर : मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निवासी भारतीयाकडून ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास प्राप्तीकर कलम १९४ कअ प्रमाणे १% ळऊर करावा लागतो. जर अनिवासी भारतीय व्यक्तीकडून स्थावर मालमत्ता खरेदी केली तर कलम १९५ नुसार TDS करावा लागतो. या TDS साठी किमान विक्री रकमेची मर्यादा नाही. जर या विक्रीवर अनिवासी भारतीयाला कर भरावा लागत असेल तर ळऊर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मालमत्ता विक्री करणाऱ्या अनिवासी भारतीयाकडून भराव्या लागणाऱ्या करविषयी घोषणा पत्र घ्यावे. आणि त्यामध्ये दर्शविण्यात येणारा देय कर इतका TDS करावा. जर अनिवासी भारतीयाने कलम १९७ नुसार प्राप्तीकर खात्याकडून TDS कमी दराने किंवा न करण्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्या प्रमाणे TDS करावा.
प्रश्न : मी लग्नापूर्वी माझा PAN घेतला होता. आता लग्नानंतर माझे नाव आणि पत्ता बदलला आहे. मला माझे नवीन नाव आणि पत्ता कसा बदलून मिळेल? – एक वाचक.
उत्तर : यासाठी नवीन PAN कार्ड आणि PAN मधील माहिती बदलासाठी असणारा फॉर्म भरून तो PAN स्वीकृती केंद्राकडे जमा करावा. त्याबरोबर काही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. २ छायाचित्रे, नाव बदलासाठी विवाह प्रमाणपत्र किंवा राजपत्र अधिसूचना इत्यादी; पत्ता बदलासाठी आधार कार्ड, पारपोर्ट, वाहनचालक परवाना इत्यादी कागदपत्रे जोडावीत.
आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
मृत व्यक्तीचे विवरण पत्र वारसदाराने भरावे
प्रश्न : करदात्याचा २०१३-१४ या आíथक वर्षांत मृत्यू झाला आहे. तेव्हा प्राप्तीकर विवरण पत्र कसे व कोणी भरावे? आणि उत्पन्नावर झालेली कर कपात (TDS ) विवरणपत्रात कशी दाखवावी? - अमोल तांबे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-07-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dead persons pay statement fill up by nominee