काही कंपन्यांची उत्पादने कंपनीच्या नावापेक्षा प्रसिद्ध असतात त्यातलीच टाइड वॉटर ऑइल ही कंपनी असावी. सुमारे ८५ वष्रे भारतातील तेल आणि वंगणाचे (लुब्रिकंट्स) विपणन करणारी ही एक सुप्रसिद्ध कंपनी. वाहनांसाठी इंजिन ऑइल, गियर ऑइल, ग्रीस इ. प्रमुख उत्पादने ही कंपनी भारतात पाच ठिकाणांहून उत्पादित करते. वीडॉल, टबरे, प्रायमा, टेक ऑफ इ. उत्तम ब्रॅण्ड्स कंपनीकडे असून भारतभरातील सुमारे ५० वितरक आणि ६५० डीलर्सकडून सुमारे ५०,००० रिटेल विक्रेत्यांकडून कंपनी आपली
उत्पादनाचे वितरण करते. कंपनीची उत्पादने प्रामुख्याने वाहन क्षेत्रासाठी उदा. स्कूटर्स, मोटरसायकल्स, कार्स, ट्रॅक्टर्स, ट्रक्ससाठी वापरली जातात. सार्वजनिक उपक्रमातील अँड्रय़ू युल समूहातील ही एक कंपनी असून ग्राहकांच्या मांदियाळीत हीरो मोटोकोर्प, होंडा मोटर्स, यामाहा मोटर्स, एलएनटी, ईसुजू इ. कंपन्या मोडतात. दोनच वर्षांपूर्वी कंपनीने बीपीकडून वीडॉलचे सर्व शेअर्स ताब्यात घेऊन त्याचे जागतिक वितरण हक्कदेखील विकत घेतले. त्यामुळे आता आखाती देश, आशिया खंड आणि युरोपातही कंपनी आपले स्थान पक्के करीत आहे. यंदाच्या वर्षांत नेदरलॅण्ड्समध्ये वीडॉल इंटरनॅशनल बीव्ही स्थापन करण्यात आली आहे. पुढील आíथक वर्षांत युरोपात कंपनी उत्तम प्रगती करेल अशी आशा आहे. अतिशय छोटे भांडवल असलेली ही कंपनी आपल्या उत्तम कामगिरीमुळे शेअर बाजारात कायम तेजीतच राहिली आहे. कुठलेही कर्ज नसलेली, उत्तम उत्पादने आणि अर्थात उत्तम व्यवस्थापन असलेली टाइड वॉटर ऑइल ही एक सुरक्षित आणि उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पोर्टफोलिओत ठेवाच.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2014 रोजी प्रकाशित
नसेल अल्पमोली, पण बहुगुणी!
काही कंपन्यांची उत्पादने कंपनीच्या नावापेक्षा प्रसिद्ध असतात त्यातलीच टाइड वॉटर ऑइल ही कंपनी असावी.
First published on: 28-04-2014 at 07:41 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tide water oil ltd and shares