१९६२ मध्ये दिवंगत अमृत मोदी यांनी युनिकेम लॅबोरेटरीज्ची स्थापना केली. ५० वर्षांहून अधिक काळ कंपनी कार्यरत असून तिची आतापर्यंतची कामगिरी लक्षणीय आहे. मोजक्या कर्जमुक्त कंपन्यांपकी ही एक कंपनी असून गेल्या ५० वर्षांत कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातही मनाचे स्थान पटकावले आहे.
मुंबईमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीची भारतात पाच उत्पादन केंद्रे – रोहा, गोवा, पिठमपूर (म.प्र.), गाजियाबाद आणि हिमाचल प्रदेशमधील बड्डी येथे आहेत. या पाचही उत्पादन केंद्रांना आयएसओ मानांकनाखेरीज एमसीसी (दक्षिण आफ्रिका) टीएजी (ऑस्ट्रेलिया), डब्ल्यूएचओ (जिनिव्हा) इ. अनेक आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकनेही मिळाली आहेत. हृदयरोग, मानसिक आजार, मधुमेह, न्यूरोलॉजी, अ‍ॅण्टीबॅक्टेरियल, अ‍ॅण्टी-इन्फेक्टिव्ह, इत्यादी अनेक औषधांच्या निर्मितीसाठी युनिकेम उत्पादने करते.
गेल्या आíथक वर्षांकरिता कंपनीने १,००५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १२७.६ कोटींचा नक्त नफा कमावला आणि २२५% लाभांश दिला होता. यंदाचे आíथक वर्ष तसेच पुढील आíथक वर्षांतही विक्री आणि नफ्यात सरासरी १६% वाढ अपेक्षित असून ब्रिटन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि आर्यलड येथील उपकंपन्यांकडूनदेखील उत्तम कामगिरी अपेक्षित आहे. सध्या १६५ रुपयांच्या आसपास असणारा हा मिड-कॅप शेअर वर्षभरात तुम्हाला २५% परतावा देऊ शकेल. सध्याच्या अनिश्चित वातावरणात ही खरेदी सुरक्षित आणि फायद्याची वाटते.

शेअरहोिल्डग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५०.०२
परदेशी गुंतवणूकदार  ३.७२
बँका / म्युच्युअल फंडस्    ९.९७
सामान्यजन  व इतर ३६.२९

Story img Loader