अजय वाळिंबे

शेअर बाजारात काय किंवा इतर क्षेत्रांत काय कितीही मंदी असली तरी औषधे, खाद्यपदार्थ आणि दारू यांची विक्री कायम चालू राहते. त्यामुळेच एफएमसीजी, औषधी कंपन्या आणि अर्थात मद्य विक्री करणाऱ्या कंपन्या पोर्टफोलियोत असल्या तर मंदीवर यशस्वीपणे मात करता येते.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

आज सुचविलेल्या युनायटेड स्पिरिट्सचा इतिहास तसा मोठाच म्हणावा लागेल. १८२६ मध्ये मद्रासमध्ये अँगस मॅकडोवेल या स्कॉटिश माणसाने स्थापन केलेली मॅकडोवेल ट्रेडिंग कंपनी अनेक स्थित्यंतरे पाहात २००६ मध्ये युनायटेड स्पिरिट्स झाली आहे. मधल्या काळात ती विठ्ठल मल्या आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र विजय मल्या यांच्याकडे होती. २००६ नंतर कंपनीने ब्रॅण्ड व्हॅल्यूला महत्त्व देऊन अनेक नामांकित ब्रॅण्ड ताब्यात घेतले. २०१४ मध्ये डिआज्जिओ पीएलसी या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीने ५४.८ टक्के हिस्सा ताब्यात घेऊन युनायटेड स्पिरिट्सला आपली उपकंपनी केले. आज देशभरात कंपनीची ५० उत्पादन केंद्रे असून बंगलोरमध्ये अत्याधुनिक टेक्निकल सेंटरदेखील आहे. स्थानिक लोकांच्या चवीनुसार मद्यनिर्मिती करण्यासाठी २५ तंत्रज्ञ येथे काम करीत आहेत. कंपनीने स्वत:चे निर्माण केलेले मॅकडोवेल नं. १, रॉयल चॅलेंज आणि सिग्नेचर हे ब्रॅण्ड भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याखेरीज कंपनीकडे जवळपास ५० जगप्रसिद्ध ब्रॅण्ड आहेत. यांत प्रामुख्याने जॉनी वॉकर, ब्लॅक डॉग, स्मिरनॉफ, वॅट ६९, डायरेक्टर स्पेशल, बॅगपाईपर, अँटिक्विटी, जे अ‍ॅण्ड बी, बेलीज आयरिश क्रीम आदींचा समावेश होतो.

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ६२ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे, तर सरासरी वय २८ वर्षे आहे. म्हणजेच बहुतांश लोकसंख्या तरुण आणि कमावती आहे. तसेच कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत देशी दारू विक्री बंद केली आहे, त्याचा फायदा युनायटेड स्पिरिट्ससारख्या कंपन्यांना होऊ शकतो.

डिसेंबर २०१९ साठी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने २५८७.६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २३५.३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १५ टक्क्यांनी अधिक आहे. गेली पाच वर्षे कंपनीने सरासरी २२.२३ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनी लाभांश देत नाही तसेच मद्यनिर्मितीच्या क्षेत्रातील इतर कंपनीचे प्राइस अर्निग (पी/ई) गुणोत्तर पाहता तुलनेत युनायटेड स्पिरिट महाग वाटू शकेल. मात्र डिआज्जिओ पीएलसी या सुप्रसिद्ध आणि बलाढय़ कंपनीची उपकंपनी, अनुभवी आणि उत्तम प्रवर्तक तसेच कंपनीचा ब्रॅण्ड पोर्टफोलियो पाहता युनायटेड स्पिरिट्स एक आकर्षक दीर्घकालीन खरेदी ठरू शकते.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचवलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२४३२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ५३०/-

लार्ज कॅप                                                              : पुस्तकी मूल्य :       रु. ४७.१७

प्रवर्तक : डिआज्जिओ पीएलसी                              : दर्शनी मूल्य : रु.२/-

उद्योग क्षेत्र : मद्यनिर्मिती                                   : लाभांश :      –%

बाजार भांडवल : रु. ३९,५२२ कोटी                           : प्रति समभाग उत्पन्न :        रु. १०.७५

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :  रु.  ७४३/ ४४३         : पी/ई गुणोत्तर :       ५०.६

भागभांडवल भरणा : रु. १४५.३३ कोटी                   : समग्र पी/ई गुणोत्तर : ४३.१२

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)                                      : डेट इक्विटी गुणोत्तर : ०.७७

प्रवर्तक ५६.७५                                                      : इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :    ६.१४

परदेशी गुंतवणूकदार      २२.३४                             : रिटर्न ऑन कॅपिटल :   २०.११

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ७.२१                              : बीटा :       ०.८

इतर/ जनता     १३.७०

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.