* मुंबई शेअर बाजाराचा ग्राहकोपयोगी उत्पादने (बीएसई एफएमसीजी) हा एकच निर्देशांक आहे जो २००३ पासून सतत वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीच्या जवळ आहे. २००८ साली आलेली बाजारातील मंदीही याची वाढ थांबवू शकली नाही. आयटीसी, हिंदुस्तान युनिलीव्हर या सारख्या समभागातील वाढ याला कारणीभूत असून साबण, तेल या दररोज वापरावयाच्या गोष्टीचा भारतातील मोठय़ा लोकसंख्येमुळे होणारा प्रचंड खप हे त्याचे मूळ आहे.
* मुबई बाजार गृह बांधकाम हा निर्देशांक मे २००८ पासून प्रथमच मासिक आलेखावर दीर्घकालीन EMA भेदून वर गेला. पण २ नोव्हेंबर २०१२ पासून एकमार्गी वर गेल्याने यात गुंतवणूकदर फायदा पदरात पडून घेत असलेले दिसत आहे. यातील समभागांची वरच्या पातळीवरील खरेदी जपून करावी हे निश्चित.
* मुबई बाजार आरोग्य निर्देशांकही २००३ पासून सतत वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीच्या जवळ आहे. २००८ साली आलेल्या बाजारातील मंदीत याने थोडी विश्रांती घेतली तेवढीच. भारतातील मोठी लोकसंख्या व सुशिक्षित लोकांची आपल्या आरोग्याबद्दलची सजगता याला कारणीभूत आहे .
* मुबई बाजार भांडवली माल निर्देशांक २.९३% आपटी खाणारा आठवडय़ातील सर्वात जास्त घटणारा निर्देशांक ठरला
* मुबई बाजार तेल व वायू निर्देशांक सरकारने गेल्या महिन्यात डिझेल तसेच एलपीजीबाबत घेतलेल्या निर्णयांच्या परिणामी फार वेगाने वर गेला, त्यामुळे सध्या तो विक्रीचा मारा सहन करीत आहे.
* मुबई बाजार वाहन निर्देशांकही आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठून आता खाली येत आहे.
* मुबई बाजार बँक निर्देशांकाने १३४५३चा त्रमासिक अवरोध गेल्या त्रमासिकात तोडला असून तो आता १५१०८चा त्रमासिक अवरोध तोडण्यास झेप घेत आहे. पण ही झेप याच महिन्यात होईल की नाही ते पाहावे लागेल. कारण आठवड्याचा फरक नकारात्मक संकेत देवू लागला आहे. रिझर्व बँकेची पतधोरणाची घोषणा बाजाराच्या पचनी पडलेली दिसत नाही. त्यामुळे स्टेट बँकेसारखे दिग्गज खाली येत असल्याने हा निर्देशांक घरंगळत आहे.