टायटन म्हटले की डोळ्यासमोर येतात ती उत्तोमत्तम घडय़ाळे आणि अर्थात तनिष्क! एचएमटी या सरकारी कंपनीची मक्तेदारी मोडून टायटन हा ब्रॅण्ड भारतात लोकप्रिय करण्यासाठी कंपनीने केवळ ३-४ वष्रे घेतली. अर्थात यासाठी टाटावरचा जनतेचा विश्वास आणि त्यांची गुणवत्ता हेच कारणीभूत आहेत. आज भारतातील घडय़ाळे बनवणारी सर्वात मोठी आणि जगातील सहाव्या क्रमांकावर असलेली टायटन आता चष्मेही (टायटन आय-प्लस) उत्पादन करू लागली आहे. सध्या १२०००हून अधिक दुकानांतून टायटनच्या सोनाटा, नेब्युला, टायटन रागा, फास्टट्रॅक, ऑक्टन आणि झायलस इ. ब्रॅण्ड्सची विक्री होते. हिरे, सोने आणि प्लॅटिनमचे दागिने तनिष्कच्या १००हून अधिक शोरूममधून विक्री केले जातात. पाच वर्षांपूर्वी जोधा-अकबर या चित्रपटासाठी ४२७ दागिने बनवणाऱ्या तनिष्कने त्या वर्षांत ५००० हून अधिक नवीन उत्पादने बाजारपेठेत आणली. आपल्या ग्राहकांप्रमाणेच भागधारकांनाही कंपनीने कायम खूश ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत सोने खरेदीवर आलेल्या र्निबधांमुळे टायटनचा शेअर खूपच खाली आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने घातलेल्या काही अटी उदा. सोन्याची आयात आता १०० टक्के मार्जनिवरच करावी लागेल, तसेच लीज किंवा कर्जावर सोने घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही अटी कंपनीसाठी जाचक वाटत असल्या तरीही कंपनीची उत्तम आíथक परिस्थिती आणि दागिन्यांची वाढती मागणी लक्षात घेता पुढील आíथक वर्ष चांगलेच असेल. यंदाच्या आíथक वर्षांच्या कामकाजावर मात्र परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा कंपनीकडून १२००० कोटी रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा असून, २०१५ साठी संपणाऱ्या आíथक वर्षांकरिता कंपनीची उलाढाल १४००० कोटींवर जाईल. सध्या २२०च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर दोन वर्षांत चांगला परतावा देऊ शकेल. तुमच्या पोर्टफोलियोत हा दागिना ठेवाच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा