रपेट बाजाराची : सुधीर जोशी
गेल्या सप्ताहाच्या पहिल्या तीन दिवसात विविध कारणांमुळे बाजारावर मंदीचे सावट होते. अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या बैठकीत काय निर्णय होतो या काळजीने अमेरिकेतील बाजार सावधतेने व्यवहार करीत होते. चीनच्या सरकारने चीनमधील ई-कॉमर्स व विशेषत: ‘ऑनलाईन’ शिक्षण देणाऱ्या मोठय़ा कंपन्यांवर आर्थिक निर्बंध आणायचे ठरविले. त्यामुळे आशियाई बाजारात विक्रीची लाट आली. गुरूवारच्या मासिक सौदापूर्तीच्या दिवशी पोलाद व अन्य धातू क्षेत्रातील कंपन्यांमधे मोठी तेजी आली. साप्ताहिक तुलनेत हिंडाल्को १३ टक्कय़ांनी तर चीनकडून पोलाद निर्यातीवर आणखी निर्बंध लादले जाण्याच्या शक्यतेने अन्य पोलाद कंपन्यांचे समभाग सहा ते १२ टक्कय़ांनी वधारले. बाजार किरकोळ घसरणीने बंद झाला असला तरी धातू क्षेत्राचा निर्देशांक ७.७८ टक्कय़ांनी वाढला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in