सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

युद्ध फारसे लांबणार नाही या आशेवर बाजार आहे. बाजार पूर्णपणे सावरायला सहा महिने जरी लागले तरी हा काळ संयमाची परीक्षा पाहणारा आणि धीराला लाभ मिळवून देणारा ठरेल, हे लक्षात घेतले जावे..

loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
onion crisis in maharashtra loksatta analysis how long shortage of onion remain in india
विश्लेषण : कांद्याचा तुटवडा का आणि किती दिवस?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!

गेले काही दिवस युद्धाच्या उलटसुलट बातम्यांनी दोलायमान झालेल्या बाजाराला, रशिया – युक्रेनमधील युद्धाचा जबरदस्त तडाखा बसला. मासिक सौदापूर्तीच्या दिवशी – गुरुवारीच युद्धाला सुरुवात झाल्याची बातमी झाली त्यामुळे बाजाराच्या अस्थिरतेला मोठेच बळ मिळाले.

सप्ताहाचा शेवट मात्र युद्धाची व्याप्ती कमी राहण्याच्या कयासाने अमेरिकन बाजाराबरोबरच भारतीय बाजारही सावरला. तरीदेखील सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकानी सप्ताहाची अखेर साडेतीन टक्क्यांच्या नुकसानीने केली.

गेल्या दोन महिन्यांत अमेरिकी बाजारातील सूचिबद्ध तंत्रज्ञान कंपन्यांचा निर्देशांक ‘नॅसडॅक’ २० टक्क्यांनी खाली आला आहे. सध्या अमेरिकी बाजारात असलेल्या अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोतीलाल ओसवालच्या ‘नॅसडॅक १०० ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करता येईल. हा ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ (ईटीएफ) असल्यामुळे समभागांसारखे त्याचे व्यवहार बाजारात करता येतात.

बाजारात नजीकच्या काळात येऊ शकणाऱ्या अशा मोठय़ा घसरणीचा फायदा घेण्यासाठी मध्यम आकाराच्या पण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही कंपन्या खाली सुचवीत आहे.

माईंड ट्री : कंपनीची मिळकत सलग चौथ्या तिमाहीत पाच टक्क्यांहून जास्त प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत ही वाढ ३६ टक्के आहे. कंपनीला नफ्याचे प्रमाणही ३४ टक्के राखता आले आहे. कंपनीला ‘क्लाउड टेक्नॉलॉजी’वर आधारित सेवांसाठी १० नवीन कंत्राटे गेल्या तीन महिन्यांत मिळाली. कंपनीला लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे पाठबळ आहे आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडील समभागांचे प्रमाण फक्त साडेतेरा टक्के आहे.

टाटा एलेक्सी : टाटा एलेक्सी ही ऑटोमोटिव्ह, ब्रॉडकास्ट, कम्युनिकेशन्स, हेल्थकेअर आणि ट्रान्सपोर्टेशन अशा उद्योगांसाठी जगातील आघाडीच्या डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. क्लाउड, व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अद्ययावत तंत्रज्ञान क्षेत्रातील ही कंपनी टाटा समूहाचा भाग आहे.

डाबर इंडिया : डाबर इंडिया या आयुर्वेदिक औषधे, खाद्यपदार्थ व आरोग्यनिगा क्षेत्रातील अनेक नामवंत उत्पादने बनविणाऱ्या कंपनीमध्ये सध्याच्या बाजारभावात गुंतवणुकीची संधी आहे. एफएमसीजी कंपन्यांत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या या कंपनीकडे पुदीन हरा, डाबर च्यवनप्राश, ग्लुकोज डी, डाबर लाल तेल, ओडिनिल, ओडोमॉस, ओडोपिक, वाटिका, गुलाबरी, डाबर रेड टूथपेस्ट यासारख्या अनेक नाममुद्रांची मालकी आहे. कंपनी नवनवीन उत्पादने बाजारात आणून, गेली काही वर्षे विक्रीमध्ये १० टक्क्यांहून जास्त वाढ करीत आहे. गेल्या वीस वर्षांत बाजारात कंपनीच्या समभागांची किंमत दर पाच वर्षांनी दुप्पट होण्याचा इतिहास आहे.

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स : गुडनाइट, सिंथॉल, ईझी, मॅजिक हँडवॉश, एअर पॉकेट अशा घरगुती वापरातील कीटकनाशक, जंतुनाशक व स्वच्छतेशी निगडित नाममुद्रांची मालकी असणाऱ्या या कंपनीचे समभाग त्यांच्या गेल्या वर्षांतील उच्चांकावरून बरेच खाली आले आहेत. कंपनीच्या मुख्य़: संचालकपदी हिंदूस्तान युनिलिव्हरमधून २२ वर्षांचा अनुभव घेऊन आलेले सुधीर सितापती यांची काही महिन्यांपूर्वी नेमणूक झाली आहे. कंपनीने जम्बो फास्ट कार्ड, शाम्पुयुक्त केसाचा रंग, पावडर स्वरूपातील हँडवॉश अशी नव कल्पनांवर आधारित उत्पादने नुकतीच सादर केली आहेत.

बजाज फिनसव्‍‌र्ह : किरकोळ ग्राहकांना विविध प्रकारची कर्जे देणाऱ्या या कंपनीची बजाज फायनान्समध्ये ५५ टक्के तर बजाज अलियान्झमध्ये ७४ टक्के मालकी आहे. घरगुती वापराच्या वस्तू सुलभ हप्तय़ांवर घेताना जवळजवळ प्रत्येक मोठय़ा दुकानात बजाज फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी ग्राहकांना कर्ज पुरविण्यास तत्पर असतात. एक लाख दुकानदार व उत्पादक कंपनीने जोडलेले आहेत. सध्याची ग्राहक संख्या ५० लाख असून त्यात पाच – सहा लाखांची भर दरवर्षी होते. कंपनी रोजचे व्यवहार डिजिटल करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहे.

गेली दोन वर्षे करोना संकटाशी सामना करून मूळपदावर येऊ लागलेल्या उद्योगांना रशिया-युक्रेन युद्धाच्या नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. रशियावर लादलेल्या व्यापार निर्बंधांचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही. रशियाबरोबरचा भारताचा व्यापार नगण्य आहे. रशियाबरोबरच्या आयात-निर्यातीचे प्रमाण एकूण व्यापाराच्या दोन टक्क्यांहून कमी आहे. युक्रेन व रशिया हे खनिज तेल, गहू, जव, तेलबिया, अ‍ॅल्युमिनियम यासारख्या कच्च्या मालाचे निर्यातदार असल्यामुळे जागतिक बाजारात त्यांच्या किमती वाढून आपल्याकडे देखील महागाई वाढेल. १०० डॉलर पलीकडे गेलेले खनिज तेल भारतासाठी मोठे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे वाढणाऱ्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेला समावेशी धोरण संपवून व्याजदर वाढ करावी लागेल. युद्ध फारसे लांबणार नाही या आशेवर बाजार आहे. आतापर्यंतच्या अशा घटनांनंतर बाजार तीन ते सहा महिन्यांत सावरतो हा इतिहास आहे. या परिस्थितीत जरी गुंतवणूकदारांच्या भागभांडारामध्ये मोठी घसरण झाली तरी घाबरून विक्री करणे कधीच फायद्याचे होत नाही. हा काळ संयमाची परीक्षा पाहणारा आणि धीराला लाभ मिळवून देणारा असतो. त्यामुळे जर रोकडसुलभता असेल तर चांगल्या समभागांची बेगमी करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा

* वेदान्त लिमिटेड, ईआयडी पॅरी, व्हीआयपी इंडस्ट्रीज या कंपन्या अंतरिम लाभांशाची घोषणा करतील.

* यूपीएल इंडिया समभागांच्या पुनर्खरेदीची (बायबॅक) घोषणा करेल. * ‘ओपेक’च्या सभेत खनिज तेल उत्पादनात वाढीबाबत चर्चा होईल.